स्त्री अत्याचार
स्त्री अत्याचार
1 min
47
गुलामगिरीच्या अंधारातुन सोडवू कशी मी मला,
आज पाहते चारही दिशांमध्ये अंधःकार हा सारा
कधी खैरलांजी,कधी हाथरस,तर कधी दिल्लीची
घटना होते,
न्यायासाठी मात्र ती अशीच तडफडत राहते
ती जगाची निर्मिती करते,
अपार कष्ट यातना सोसते,
मग नेहमी माझ्यावरच अत्याचार का?
हाच विचार ती करत बसते
ती ओरडते आहे,साद कोणीच देत नाही,
ती बोलावते आहे,जात मात्र कोणीच नाही
प्रगतीशील देशामध्ये चर्चा तर खूप होते,
पण दुसऱ्याच दिवशी लावले जाते तिचे जातीशी नाते
अत्याचारांच्या त्या रात्री संपण्याचे नाव घेत नाहीत,
न्यायाच्या दिवसापर्यंत दुर्दैवाने 'तीच' राहत नाही
ती वाट पाहते आहे एक दिवस नक्की येईल,
स्त्री भ्रूणहत्या,स्त्री अत्याचार,या जगातून कायमचा
हद्दपार होईल
