STORYMIRROR

Vishu Dhanvate

Others

3  

Vishu Dhanvate

Others

आई

आई

1 min
196

शब्द पडले अपुरे भावनांना सीमा कसली,

'आई' तुझ्या अफाट कष्टापुढे एक छोटीशी 

कविता सुचली


तुझ्यामुळेच लिहू शकलो कवितेच्या चार ओळी,

कोणत्या जन्माचं पुण्य म्हणावं की तू मला मिळाली


आज तू नसताना तुझी महती पटते,

खरं सांगू 'आई' मला रोज तुझी चिंता वाटते


तुझे जीवन जणू धगधगते अग्नीकुंड,

खुप मायेने वाढवतेस गं सगळी भावंड


मोठा साहेब जरी झालो तरी पाहायला मात्र तुच नाही,

मनाच्या कणा कणा वर फक्त तुझेच नाव आहे आई


तुझ्यातल्या मायेचा सागर खूप मोठा आहे,

तुझ्या कर्तृत्वासमोर तो हिमालय ही छोटा आहे


माझे स्थान नेहमीच तुझ्या चरणापाशी आहे,

तुच जोडले माझे ही नाते या जगाशी आहे


मावळतीच्या सूर्याकडे पाहून आपसुख डोळे मिटले,

तुझ्या आठवणीत 'आई' कित्तेकदा माझे मन तुटले


 प्रार्थना करतो की तू कायम स्मरणात रहावी,

असेल पुढचा जन्म तर तूच 'आई' मिळावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन