STORYMIRROR

Dr. D C Sawant

Romance

4  

Dr. D C Sawant

Romance

मनातील ठरलेल्या प्रतिमा

मनातील ठरलेल्या प्रतिमा

1 min
331

काही क्षण असे असतात की ते

मनात खोलवर रुतून बसतात,

नकळत निरागस झालेल्या

आठवणीत गुंतून जातात

पानातील दवबिंदूसारखे...


दवबिंदूचा हळुवार होणारा 

स्पर्श, वाऱ्याच्या झुळकेने 

क्षणात निसटतो वेदनेसारखा,

मनातील प्रेमाच्या अपेक्षेतून,


त्याच बिंदूची तलम देहावरून

ओघळताना जीव कंठात येतो,

मनाच्या प्रतिक्षेत जाऊन बसतो,

मनातील शहारे गुणगुणत राहतो, 


विराहातील ठरवलेल्या स्पर्शाने

द्विगुणित होतो आणि लगेचच 

भ्रमनिरास होतो काही क्षणातच

नेहमीप्रमाणे काहीही न मिळताच,


तुझ्या विरहातून बाहेर येण्या

आधीच मनातील नभांत

दृष्टीव्याकुळ मेघांची दाटी 

झालेली असते,


तुझी आठवण होताच मनातील

आभाळाच्या अंतरंगात विरघळत

जातो तो वेदनेचा तरंग....अन

उठतात मनातील प्रतिमांच्या

ज्वाला शब्दाच्या रूपाने,


मनात अडकेलेली कोवळी किरणे

कासावीस होऊन जातात एका

क्षणांत....आणि आठवणीत

जातात तूझ्या नेहमीप्रमाणे,


हृदयातीळ श्वास मोकळा होण्या-

आधीच प्रतिक्षेची मर्यादा

अवतरते डोळयांसमोर नभातील

निरभ्र आकाशासारखी......


तुझी आठवण करत असताना

माझ्या मिटलेल्या डोळ्यात मैत्री

ओथंबते पाण्यासारखी.....


आतुरतेने वाट पाहणाऱ्या मनाला

कधीही कोणाच्याही आशेवर

विसंबून न राहता जगता आले

पाहिजे हे जगण्याचा प्रयत्नातून


अर्पण केलेली ही प्रेम विरह कविता

फक्त तुझ्यासाठी आणि माझ्या प्रेमासाठी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance