मन
मन
तुला पाहून मन माझं भरतंय
चंद्राच्या चांदणीला रूप तुझ खटकतय
तुझं ते लाजणं तुझं ते बोलणं
विजेसारख काळजावर आघात करतय
आकाशाच्या इंद्रधनुत रूप तुझ दिसतय
फुललेला निसर्गही तुझंच गुंण गातय
तुझं ते चालणं तुझं ते पाऊल टाकणं
प्रत्येक वाटेलाही हव-हवसं वाटतं
बेधुंद हा वाराही तुझ्याच भोवती फिरतोय
तू ! सुंदर असल्याच प्रत्येक फुलाला सांगतोय
तुझी ते काळोखे केस तुझी ती नागिणी चाल
वेगा पेक्षाही तुझी ती वेगवान हालचाल
सुंदरतेलाही सुंदरतेचा वाटावा हेवा
आरशात तु पाहतान थोडसं त्यान लाजावा
तुझं ते हसन तुझं ते एकटक पाहन
वेळ-वेळेलाही टिपुन घ्यावसं वाटतय

