STORYMIRROR

Punam Tawade-Lokhande

Romance

3  

Punam Tawade-Lokhande

Romance

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर...

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर...

1 min
1.1K

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर

तरी...(ऐक ना)...

त्याहीपेक्षा जास्त करायची इच्छा आहे...

तुझ्यावर खूप प्रेम करण्याची ईच्छा आहे


तू भेटतोस जेंव्हा जेंव्हा

ते क्षण हृदयी साठतात

तरी तुझा विरहही

नयनी जपण्याची ईच्छा आहे

तुझ्यावर खूप प्रेम करण्याची ईच्छा आहे


तुझ्या हिरवळीवर

मी विसावतेच रे सुखाने

तरी तुजसोबत मृगजळातही

तृप्त होण्याची ईच्छा आहे

तुझ्यावर खूप प्रेम करण्याची ईच्छा आहे


माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance