STORYMIRROR

sanjeev dighe

Romance

3  

sanjeev dighe

Romance

कवि म्हणजे

कवि म्हणजे

1 min
173

कविता करणारा फक्त कवि नसतो..

नकळत का होईना..

तो नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात असतो..!

°

तो सगळीकडे नीट लक्ष देत असतो..

व्यक्त ही होत असतो..

तरी सुद्धा तो काही तरी लपवत असतो.. कारण , ,

तो नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात असतो..!

°

तो विचारात जगत असतो..

जगाच्या विचारात असतो..

पृथ्वीवरच असतो.. पण नभात हिंडत असतो..

कारण , ,

तो नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात असतो..!

°

तो सतत् कल्पने सोबत फिरत असतो.. 

तिच्याच विश्वात हरपून ही बसतो.. मगं.. 

तो तिला शब्दपुष्पांनी श्रृंगारतो, साकारतो..

कारण , , 

तो नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात असतो..!

°

तो मित्रां सोबत असतो, तरीही.. त्यांच्यात नसतो ;

पण.. तो त्यांच्या मैत्रीला गुंफत असतो..

कारण , , 

तो नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात असतो..!

°

अक्षर त्याची कोशिका तर..

शब्द त्याचा ऊतक असतो..

त्याचा संपूर्ण देहच शब्दप्रेमात बुडालेला असतो..

फक्त कवितेलाच माहित असतं, कि.. 

कवि नक्की कोणाच्या प्रेमात असतो..!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from sanjeev dighe

Similar marathi poem from Romance