STORYMIRROR

Nik Patil

Classics

2  

Nik Patil

Classics

आठवते का रे तुला

आठवते का रे तुला

1 min
1.2K

आठवते का रे तुला, आपली पहिली भेट

प्रेमाचा तो रंगमंच सजलेला,

जिथे गाव आपलं दोघांचं

त्या गावातला तो तू आणि ती मी 

माहीत नव्हतं रे प्रेम काय असतं 

तूच बोललेलास ना दोन जीव एक म्हणजे प्रेम 


दोन हृदय, दोन जीव आणि एक श्वास म्हणजे प्रेम 

आठवतंय मला आज ही तुझे ते प्रेमशब्द

आयुष्याची ती वाट जिथे फक्त तू आणि मी 

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चा 

लिहिलाय मी कवितेत माझ्या 


आपण सजवलेली स्वप्न त्या प्रेम नगरीतली 

आठवते का रे तुला, आपली पहिली वहिली भेट?

शांत परिसर , गार हवा , पावसाची कुजबुज

आणि त्यात तुझ्या शब्दाची लुडबुड 

आठवतंय का तुला, आपला पहिला स्पर्श 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics