Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Patil

Drama

4.3  

Pallavi Patil

Drama

मैत्री

मैत्री

4 mins
709


सकाळी सकाळी दारात येऊन जोरजोरात हॉर्न वाजवत होता, आईने खालूनच आवाज दिला, "जा गं लवकर.." दारात दिसल्याशिवाय काही हॉर्न थंबला नाही. हेल्मेटमधूनच डोळे दिसले जेव्हा घड्याळ दाखवत, "बस पटकन किती हा उशीर!!"

उशीर होतोय हे नकळत जाणवून दिलं.

  

बाकी रुची, श्रेया, हर्षद, अभी, योग्या हे ऑलरेडी गाडीपाशी थांबले होते, निल फक्त श्रेयासाठी सकाळी बाईक घेऊन तिच्या घरी आणायला गेला होता कारण तीच एकटी लांब राहत होती.


सकाळी ६ ला निघायचं ठरलं, पण ईशाला इतकं लवकर पोहचता नव्हतं येणार मग कसं करायचं हा विचार करत, शेवटी निल म्हणाला,

"मी येतो तुला घ्यायला, म्हणजे वेळेत निघू शकू आपण."


निल हे कार्टून फार सभ्य मुलांपैकी एक. चलेगा म्हणत प्लॅन ठरला. निल वेळेच्या बाबतीत फार काटेकोर.

     

स्कूल-कॉलेजनंतर व्हाॅट्सॲपवर गप्पा व्हायच्या आणि बोलता बोलता इशाने एक दिवस ग्रुपवर फर्मान सोडलं, "नेक्स्ट मन्थ आपण वन डे ट्रिप प्लॅन करतोय."

सगळ्यांनी रिप्लाय करा म्हणत तिने दिवस आणि तारीख सांगितली.

   

नाही होय नाही होय करत २ दिवसांनी सगळे तयार झाले.

मग जायचं कसं हा प्राॅब्लेम ,इशा म्हणाली, "एसटीनेच जाऊया का वेगळा थ्रिल." सगळेच शांत झाले आणि मग परत गप्पांचा रंग चढू लागला... ईशाने सगळं प्लॅन केलं, प्रत्येकाला एक जबाबदारी दिली व म्हणाली, "तुम्ही सगळे या ठिकाणी जमा तिथून निघू कारण आपल्याला लवकर निघावं लागेल. मग कुठे वेळेत परत येऊ."

   

निल म्हणाला, "मी रिसॉर्ट बुक करतो फॅमिली टाइप आहे एव्हरीबडी विल बी कम्फर्टेबल."

सगळ्यांनी त्याला, "ग्रेट थॅन्क यू..." म्हणत सहमती दर्शवली.


श्रेयाचा जरा प्रॉब्लेम होता ती फार आढेवेढे घेत होती, तिला ईशाने सांगितलं, "तू आईकडे ये मग जाऊ काही प्रॉब्लेम होणार नसेल तर..." तशी श्रेया तयार झाली.

 

रुची तयार होती आणि एक्साईटेडही. तसंच मुलांनी मुलांचा प्लॅन केला. योग्या जे म्हणेल त्यावर फक्त "ओके" म्हणायचं, पण योग्याकडे वर्गणीची जबाबदारी.


अभी तर जाम बिझी माणूस, आमच्यातला खोडकर मुलगा, येईल की नाही शंका होती पण पेनल्टी जबरी होती सो धाडस कुणी करणारं नव्हतं.

 

हर्षदसाहेब गल्ल्यावर बसणारा माणूस, त्याचं शॉप होतं, तिथेच सगळ्यांनी जमा व्हायचा प्लॅन. त्याने लागेल तो खाऊ स्पाॅन्सर केला होता.

  

जायच्या एक दिवस आधी सगळ्यांनी ठरलेला प्लॅन परत रिकाॅल केला व ठरलं की एक फोर व्हिलर आणि जमलं तर बाईक घ्यायची. सगळे मनातून खूप खुष होते. ऑफिसच्या धावपळीत सगळे फार गुरफटलेले आणि आता लाईफच्या रिस्पाॅन्सिबिलिटीच्या पटरीवर सगळे स्वार झाले होते.

  

मनातून भेटायची कुठेतरी सगळ्यांना इच्छा होती पण म्हणतात ना "जमतच नाही", "वेळच नाही" तसं होतं प्रत्येकाचं.

  

गप्पा-गोष्टी चालूच होत्या सगळ्यांच्या, बाईकने पोहचतोय न पोहचतोय तोवर रुचीने घट्ट मिठी मारली, "फायनली ईशा वी आर गोईंग!"


अभी म्हणाला, "हॅलो मॅडम आम्ही पण आहोत."


"होय रे..." म्हणत ईशाने श्रेयाची बाजू घेतली व सगळे हसायला लागले.

  

हर्षद मधेच म्हणाला, "चला एक एक कटिंग घेऊ मग करू सुरुवात पुढच्या प्रोग्रॅमची."


सगळेच खूप आनंदात होते. योग्याच्या गाडीतून सगळ्या मुली-रुची, श्रेया, ईशा आणि निल जायचं ठरलं, मुलींसाठी गाडी-हा बेत. ठरलेल्या रिसॉर्टवर सगळे पोहचलो.


मस्त नाॅनव्हेज फिशमध्ये ऑर्डर दिली आणि सगळे फ्रेश होऊन बसले. प्रत्येकाचे रंग वेगवेगळे जरी असले तरी शाळेपासूनची मैत्री आणि आताची भेट यात खूप फरक होता.

 

मस्त कॉफी मागवली, कारण कॉफी सगळ्यांची फेवरेट एक सिप घेऊन एकमेकांकडे बघू लागलो आणि मग हलकंसं हसू आलं चेहऱ्यावर. मस्त एकमेकांचं अात्तापर्यंतच स्ट्रगल, कोण कसा कुठून कुठे पोचलो हे सगळ्यांनी शेअर केलं. अगदी व्यसन आहेत नाहीत, आता यचे आपण आणि शाळेच्या वेळचे आपण, मग ती चिडवा चिडवी. गप्पांच्या ओघात जेवणाची वेळ झालेली कळलंच नाही.

  

चापून चोपून जेवलो. मग सगळे समुद्र किनारी फिरायला गेलो, तेही भर उन्हात, आमच्यासारखे वेडे आम्हीच. पण वेळ कमी होता आणि प्रत्येकाला काही न काही शेअर करायचं होतं.

  

ईशा, श्रेया आणि रुची आज जाम खुष होत्या. आज खूप वर्षानंतर असं मन मोकळं करता येत होतं. असं वाटत होतं आजचा दिवस फार छोटा आहे.

 

सगळ्यांनी मस्त फोटज काढले, सावल्यांचे, प्रत्येकाने वेगवेगळी शक्कल लढवून, फ्रेंडस लिहून वाळूवर एक मस्त फोटो क्लिक केला व ग्रुप प्रोफाईल पिक सेट करून निघालो तिथून.

 

रिसॉर्ट जवळच होतं, रस्त्यात मस्त झाडी होती. एकमेकांना आपल्या शाळेतील नावांनी चिडवत मस्त निघालो, थोडा वेळ का होईना, सगळे अपल्या कोशातून बाहेर पडून आनंद लुटत होते.

 

येता येता परत कधी भेटायचं ठरवून रिसॉर्टवर पोहचले आणि कॉफीची ऑर्डर देऊन जायची तयारी करू लागले.


"सासरी" पाठवणी करताना जी मनात भावना येते तशीच गत प्रत्येकाची झाली होती पण बोललो तर आपल्यालाच चिडवतील म्हणून सगळेच गप्प होते. पण ईशाच्या नजरेतून काही हे सुटलं नाही.

 

तसंही येताना ईशाने सर्वांसाठी गिफ्ट्स आणले होते पण दिले नव्हते. आजचा दिवस फार भारी गेला यार. ईशा पण भावुक झाली होती पण न दाखवता ती कॉफी घेऊन आली आणि मस्त मजेत सगळ्यांना टोपण नावाने बोलवलं.


तसं सगळे कॉफीसाठी जमा झाले. तिने प्रत्येकाच्या कॉफीसोबत एक गिफ्ट ठेवलं होतं. हे बघून सगळे चाट पडले. गिफ्ट!! करत सगळे एक्साईट झाले पण तिने एक अट घातली, "आधी कॉफी मग गिफ्ट तेही सगळ्यांनी एकत्र ओपन करायचे."

 

सगळ्यांनी जड मनाने कॉफी रिचवली व गिफ्ट्स घेऊन उघडू लागले, पाहिलं तर त्यांचा मस्त एक फोटो जो स्कूल टाइमचा होता तोही फक्त तिच्याचकडे होता तो फ्रेम करुन तिने, त्यामध्ये "बेस्ट बडी" लिहिलेलं आणि प्रत्येकाच्यावर "बेस्ट कोट" जे तिने केले होते तेही लिहिले होते, ते वाचून न राहून सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

 

सगळ्यांनी एकत्र येऊन तिला मिठीत घेतलं. सगळे म्हणाले, “हे असलं तुलाच सुचत बरं गं... कसं काय जमतं तुला?"


ईशा म्हणाली, "मित्रांसाठी काहीही कधीही...”


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama