यशोगाथा
यशोगाथा
आपला भारत देश हा आता प्रगती करू लागला आहे. भारतातील आता अनेक युवकांनी यशाच्या मार्गावर पाय ठेवायला सुरवात केली आहे. भारतातील मागासवर्गीय आणि दुर्गम भागातील लोक पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशामध्ये आता यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी उच्च-नीच असा भेदभाव राहिलेला नाही.
आता सर्व जाती धर्मातील लोक यश प्राप्त करीत आहेत. गरीब लोक देखील त्यांच्या हक्कासाठी,यशासाठी पुढे येत आहेत. आताच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये आदिवासी समाजातील थोर महिला द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. ही खरचं आनंदाची बाब आहे. द्रौपदी मुर्मू ही ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथील आदिवासी नेत्या आहे. द्रौपदी मुर्मू ही एक प्रेमळ स्वभावाच्या नेत्या आहे जिने तिच्या कठोर परिश्रमाने ओडिशाच्या राजकारणात प्रवेश केला. 2007 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा विधानसभेचा सर्वोत्कृष्ट आमदार (विधानसभा सदस्य) साठी नीलकंठ पुरस्कार मिळाला. द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी मी काय बोलणार? त्यांचं व्यक्तिमत्त्व केवढ महान आहे.आदर्श शिक्षिका, आदर्श राजकारणी, आदर्श मंत्री आणि आदर्श राज्यपाल या भूमिकांनंतर आता राष्ट्रपती पदाची नवी जबाबदारी देखील अशाच आदर्श पद्धतीने सांभाळतील, हे निश्चित. त्या भरपूर कष्ट आणि जिद्दीने पुढे आलेल्या आहेत. त्यांचा संघर्ष केवढा मोठा आहे. प्रत्येक माणसाने त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या कामात यश मिळवले पाहिजे. प्रत्येक समाजातील माणसांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शालेय शिक्षणातसुद्धा राजकारणातील घडामोडी, व्यवहारज्ञान आणि त्याचबरोबर आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवावे हा अभ्यासक्रम देखील असला पाहिजे. प्रत्येक जाती धर्मातील लोकांना पुढे येण्याची संधी मिळत आहे. हे ऐकून खूप बरे वाटले.
