STORYMIRROR

Kavita Shirke

Tragedy Others

4  

Kavita Shirke

Tragedy Others

ओढ लावणारं माझं घर

ओढ लावणारं माझं घर

2 mins
299

     या विश्र्वामध्ये प्रत्येक माणसाला, पशुला कशाची ना कशाची ओढ असते. ओढ म्हटलं की एखाद्या ठिकाणाची, माणसाची, प्राण्याची, कामाची इ. असं आपल्याला वाटतं. पण मला मात्र ओढ लागते, ती घराची !

      घर या नावातच सगळी दुनिया सामावल्या सारखी वाटते. माझे गाव आहे कोकणात. कोकण म्हटलं की, लांब समुद्र किनारा, उंच उंच नारळाची झाडं, काजू, आंबा, फणसाची झाडे, कौलारू घरे, घराच्या बाहेर चुल्हा हे सगळं डोळ्यासमोर येत. असच माझं घर समुद्रकिनारी आहे. घर मस्त कौलारू आणि दुमजली आहे. घराला लाकडाचे वासे आहेत.घराच्या बाहेर मस्त मोठे अंगण आहे. अंगणात तुळस, वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत. घराच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. घरामध्ये स्वयंपाक घर, माजघर, खोली, पडवी अशाप्रकारे विभागलेले आहे. घराच्या पाठीमागे शेत, विहीर आहे. 

        घरामध्ये भरपूर माणसे राहत असल्यामुळे माणसाची सुद्धा सवय झाली आहे. पण शहराकडे तसं नसल्यामुळे याची सुद्धा ओढ लागते . घराच्या कानाकोपऱ्यात पूर्वजांचा सहवास जाणवतो. पूर्वजांनी सांगितलेल्या रीती, परंपरा हे घर त्याच्या हळुवार नजरेत सांगत असतं. घराची एक एक भिंत आपल्याला लहानपणीची आठवण करुन देत असते. जणूकाही घर आपल्याशी बोलत आहे. घरात जमीन असल्यामुळें अजूनही शेणाने जमीन सारवली जाते. घरामध्ये जमीनवर बसून जेवण्यात जी मज्जा येते ना, त्याची सर मुंबईच्या डायनिंग टेबलला नाही.आईने सकाळी अंगणात घातलेला सडा मंत्रमुग्ध करीत असतो. देवघरातील घंटा फक्त माणसांना नाही तर संपूर्ण घराला जागं करीत असते. घरामध्ये सूर्याची किरणे येतात. त्यामुळे घरातअगदी प्रसन्न वाटते. घराला खिडक्या असल्यामुळें प्रकाश सुद्धा भरभरून येतं. घर समुद्रकिनारी असल्यामुळें वरच्या गच्चीवरून सूर्य मावळताना देखील दिसतो.

      घरामध्ये एक गावाकडचं घर म्हटलं की अंगणात किंवा गच्चीवर खाट टाकून त्यावर झोपून चांदणे पाहायची मज्जा काही औरच असते. रात्रीच्यावेळी गच्चीवर येणारी काजवे मनाला आनंदित करीत असतात. मला तरी असं वाटतं, गावाकडे जेवढे पारंपरिक घर तेवढी गावाला जायची ओढ लागते. असं समुद्रकिनारी असलेलं घर, का नाही ? माणसाला ओढ लावणारं !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy