Umendra Bisen

Tragedy Inspirational

4.0  

Umendra Bisen

Tragedy Inspirational

वेळेचे महत्त्व/उपयोग

वेळेचे महत्त्व/उपयोग

1 min
181


    एकदा एक मातीचा दिवा एका घराच्या कोपऱ्यात टीमटीम अगदी शांत जळत होता. त्याच्या बाजूला एक विजेचा दिवा त्या टीमटीमत्या जळणाऱ्या दिव्याला हसत विचारतो की तुझ्या जळण्याचा फायदा काय माझ्या प्रकाशासमोर तुझा प्रकाश शून्य आहे.

'कशासाठी ही तळमळ?'पण त्या मातीच्या दिव्याने काहीच न बोलता आपलं जळणे सुरूच ठेवले.परत विजेचा दिवा त्याला म्हणाला माझ्या प्रकाशाने सगळं आवार घरं चकाकल आहे.यामुळे तुझ्या प्रकाशाला काहीच महत्त्व नाही.

    'तू निरूपयोगी आहेस' पण तरीही मातीच्या दिव्याने त्याला काहीच न बोलता स्मित हास्य करत गप्प बसला.पण त्याच वेळी अचानक विजांचा गडगडाट सूरू झाला अन् विज खंडीत झाली.जोराने पाऊस कोसळू लागला व त्यामुळे 'विज खंडीत झाली व विजेचा दिवा विझला'.पण मातीचा दिवा आपला टीमटीम शांत जळत होता.हा दृश्य बघून विजेच्या दिव्याला कळून चुकले की वेळेनुसार ज्याचे त्याचे महत्त्व असते.ज्यावेळी वातावरण अगदी साफ होते त्यावेळी मला ह्या गोष्टीचा गर्व झाला की माझ्या प्रकाशासमोर ह्या मातीच्या दिव्यांचे अस्तित्व काहीच नाही.

   विजेच्या दिव्याला कळून चुकलं की प्रत्येकाचं महत्व त्याच्या उपयोग वेळेनुसार अनन्यसाधारण आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy