Umendra Bisen

Tragedy Inspirational

4.0  

Umendra Bisen

Tragedy Inspirational

जीवन संघर्षाचा

जीवन संघर्षाचा

2 mins
196


    नंदू अतिशय गरिबीतून सामान्य स्तरावर आलेला गृहस्थ. वयाच्या १६ व्या वर्षी वडील वारले आणि सुरू झाला संघर्षाचा प्रवास. गावातील श्रीमंत व्यक्ती रघू पाटील यांच्याकडे काम करू लागला. रघू पाटील हा खूप स्वार्थी आणि कामकाढू व्यक्ती तो लोकांना काम देत असे पण मोबदला खूप कमी द्यायचा. अडचणीचा फायदा कसा घेता येईल चांगले ठाऊक होते त्याला. त्याचाच फायदा नंदू कडून घ्यायचा एके दिवशी नंदूला झाडं कापायला सांगितले आणि मोबदला ठरवीला. पण जेव्हा झाडं कापून झाला लगेच कमी मोबदला देत नंदूला म्हटलं की तू निट झाडं कापलास नाही म्हणून मोबदला कमी केला आहे.

  नंदू बिचारा गपगुमान मोबदला घेऊन घरी परतला. घरी त्याचे चुलते नागपूर वरून गावाकडे आलेले होते. त्यांना कळलं की नंदूच्या भोळ्या पणाचा, गरिबीचा फायदा घेतात. त्यांनी नंदूला एक सल्ला दिला तू नागपूरला चल पैसे कमव आणि पुढचं शिक्षण पूर्ण कर. तो सल्ला त्याला आवडला. तिथं गेल्यावर काही काम मिळाले नाही. आयुष्यात आपल्या शेवटी संघर्ष खूप आहे. *आलीया अंगावर घेतलं शिंगावर* यानूसार आता जो काम मिळेल तो करायचे ठरवून त्यांने गवंडी चे काम सुरू केले.

  *कमवा आणि शिका* या उक्तीप्रमाणे त्याने गवंडी कामाला जायचे व मिळालेल्या पैशातून शिक्षण घ्यायचा ,घरी पैसे पाठवणे,चुलत्यास घर भाडे देणे असे अनेक संकटे त्यांच्या जीवनात आली. पण संघर्ष करणे हाच एकमेव पर्याय आणि तो मी करणार व सुगीचे दिवस आणणार हाच आत्मविश्वास त्यांच्या अंगी होता.

   एकदा तो एका अभियंता यांच्या घरी गंवडी कामा निमित्त गेला.त्याचे चुलते त्यांच्याबरोबर होते. त्या गृहस्थाने एवढ्या कमी वयात या मुलाला का कामाला घेऊन येता असा प्रश्न केला. त्याची आपबिती त्या अभियंताला

कळाली. नंदूच्या दैनंदिन कामावर त्याच्या व्यवहारांवर त्या अभियंत्यांचे लक्ष होते. नदूंचा स्वभाव त्यांना खूप आवडला त्यांनी त्याला आपल्या घरी एक खोली रहायला दिली व अभ्यास कर आणि थोड घरचे काम कर असे सांगितले आणि नंदूच्या संघर्षाचा बोजा कमी झाला. अशी देव माणसं भेटणे हे संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला देवदूतच.

====================


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy