वेळ
वेळ
अपना टाईम आयेगा कृष्ण देवराया गाणे म्हणत होता ते हि आनंदात हे पाहून तेनाली रामा ने उत्साहित होऊन विचारले काय महाराज काय झाले आणि हे गाणे अरे रामा मी आज खूप खुश आहे पण का अहो आमचे मेहुणे साहेब नेहमी आपल्या कडे रेंज रोव्हर गाडी आहे म्हणून बढाया मारायचा आणि आमची हि सुद्धा त्या रेंज रोव्हर ची स्तुति करायची पण आता अपना टाईम आयेगा बढाया मारने का
म्हणजे महाराज तुम्ही तीच गाडी घेत आहात
छे छे तीच घेऊन काय मी मिरवणार मी तर त्याच्या नाकावर टिचून दुसरी महागडी गाडी घेणार आणि बघ तू रामा त्याच्या तोंडावर कसे बारा वाजवतो ते
हळू महाराज हे महाराणी ऐकले तर
हो हो ते हि आहे तर मी म्हणत होतो त्याच्या पेक्षा महागडी गाडी मी घेणार आणि हे गुपित फक्त आपल्यात मला राणीला पण दाखवयाचं आहे
ह्म्म्म म्हणजे तुम्ही तुमची वेळ अचूक निवडली
हो तर हीच ती वेळ माझ्या मेहुण्याला दाखवायचे कि मी हि त्याच्या पेक्षा कमी नाही
ते आहेच महाराज मला हि तुमच्या मेहुणे साहेबाचा स्वभाव आवडत नाही पण मी तुम्हाला कधी म्हटले नाही
हो का बघ तू पण माझ्या मताशी सहमत आहे
बरं महाराज आपण कसली गाडी घेता
अरे लॅम्बरजीनी
काय वाह महाराज खरंच तुमची वेळ आली आणि माझी पण बढाया मारण्याची
