SHASHIKANT SHANDILE

Tragedy

3.0  

SHASHIKANT SHANDILE

Tragedy

तिच्या गर्भधारणेला ग्रहण!

तिच्या गर्भधारणेला ग्रहण!

3 mins
69


नशिबाने छडलेल्या आणि समाजाने वाऱ्यावर सोडलेल्या, आदीकालापासूनच नको त्या वेदनांना पेलत आजच्या काळात येवून पोहोचलेल्या स्त्रीत्वाला मान वर करून जगण्याची संधी देणारी आधुनिक यंत्रणा म्हणजेच In Vitro fertilization (IVF). 

वंशाचा दिवा देवू शकत नाही म्हणून कित्येक निरागस स्त्रियांना वांझ स्त्री संबोधून तिचा मानसिक खच्चिकरण केल्या गेलं, तिच्यावर शारिरीक अत्याचार केला गेला आणि ती स्त्री नशिब म्हणून गपगुमान तिच्यावर होणारा अन्याय सहण करत गेली. परंतू कालांतराने वैज्ञानिक दृष्टीकोणातून नवनवे शोध लावून मनुष्य जातीने कित्येक असहज वाटणाऱ्या गोष्टी सहज सोप्या केल्या आणि अशाच एका शोधाने चमत्कार घडवला आणि ती स्त्री जी कालपर्यंत वांझ होती, जी बाळाला जन्म देवू शकत नव्हती, तीलाही कुणीतरी हाक दिली “आई…”. 

आई या हाकेची खरी किंमत ती स्त्री समजू शकते जी कालपर्यंत वांझ होती, अबला होती, लाचार होती पण आज नैसर्गिकरित्या नसला तरी नऊ महिने पोटाट वाढवून तीने तिच्या बाळाला जन्म दिला व तीचा हरवलेला आत्मसम्मान तिला परत मिळाला. ज्या In Vitro fertilization (IVF) यंत्रणेने स्त्रीयांच्या जिवनात चमत्कार घडवला, त्यांना आई होण्याचं अमुल्य सुख दिलं, त्याच In Vitro fertilization (IVF) यंत्रणेवर आता धोक्याचे सावट उमटू लागले आहेत. 

केंद्र शासनाद्वारा In Vitro fertilization (IVF) बाबत काही दिशा निर्देश तयार करण्यात आल्याबाबत माहिती मिळाली. In Vitro fertilization (IVF) यंत्रणा भारतात व्यवसायाचे स्वरूप घेत असून, आई होवू पाहणाऱ्या स्त्रियांच्या जिवाला धोका होवू नये, आई-वडील होवू पाहणाऱ्या जोडप्यांची आर्थिक फसवणूक होवू नये किंवा पैशांच्या हव्यासापोटी या यंत्रणेचा गैरवापर होवू नये, या आषंकेने In Vitro fertilization (IVF) यंत्रणेवर शासनाचे नियंत्रण असावे याबाबत गुगलच्या माध्यमाने माहिती मिळाली. अर्थातच कोणत्याही यंत्रणेचा गैरवापर करणे, किंवा स्वहीतासाठी सामान्य नागरीकांची मानसिक व आर्थिक फसवणूक करणे हे नियमबाह्यच नाही तर मानुसकीला तळा लावण्याचे कृत्य आहे. यावर नियंत्रण व दंडणीय कार्यवाही योग्यच आहे. परंतू या सर्व प्रकरणात IVF यंत्रणा चालविणारे तज्ञ आणि केंद्र शासनाचे आपापले अभिमत आहे.

वैयक्तिकरित्या शहरातील एका नावाजलेल्या IVF Centre ला भेट दिली असता, तीथल्या तज्ञांचे म्हणने होते की, लवकरात लवकर या IVF यंत्रणेचा फायदा जनसामान्यांनी करून घ्यावा तसे आम्ही लक्षात असलेल्या जोडप्यांना सांगतोच आहोत कारण शासनाने निर्धारीत केलेल्या नियमानुसार या यंत्रणेचा खर्च वाढण्याची व आई-वडील होवू पाहणा-या कुटुंबीयांवर या यंत्रणेच्या उपयोगाचा आर्थिक बोझा वाढण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. सामान्य माणूस म्हणून बघता, शासन आणि IVF Centre चालवणारे चिकीत्सक यांचे आपापले तर्क आहेत परंतू यावरून आजच्या आधुनिक काळातही स्त्री वांझपणाच्या यातना तशीच झेलत लाहणार की काय, अशी शंका निर्माण होवू लागलेली आहे. 

कारण गरीब वा सर्वसाधारण कुटूंबीयांच्या आटोक्यात नसलेला हा खर्च आपणही आई-वडील होवू शकतो या आनंदाने व बाळाच्या मोहाने नको ती तळजोळ करून एखादं कुटूंब In Vitro fertilization (IVF) या यंत्रणेचा फायदा घेवून बाळाचे सुख घेतो पण यातही कित्येक जोडपे पैसा नसल्या कारणाने आजही या सेवेचा या चमत्काराचा फायदा घेवू शकत नाही याला या देशाची लाचारी म्हणावी लागेल. हो देशाची, कारण आधुनिक भारत म्हणून वाटचाल करत असतांना किंवा विविध योजनेद्वारा गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य करत असतांना In Vitro fertilization (IVF) यंत्रणेचा उपयोग करून मातृत्व मिळवणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय महिलांना काही सवलत देण्याऐवजी जर त्यांच्यावर अधिकचा बोझ या शासन निर्णयान्वये पडत असेल तर ही या देशाचीच लाचारीच म्हणावी लागेल. 

ज्यांना मुल बाळ होत नाही त्यांच्याकरीता In Vitro fertilization (IVF) वरदान असून गरीब व मध्यमवर्गीय लोकांना शासनाने सवलत द्यावी की त्यांच्यावर अधिकचा आर्थिक बोझ वाढवावा याबाबत विचार करूनच शासनाने निर्णय घ्यावा तसेच IVF Centre च्या विद्वानांनी विज्ञानाने दिलेल्या या अमुल्य यंत्रणेचा स्वहीतासाठी नाही तर समाजहितासाठी उपयोग करावा इतकीच सामान्य मानुस म्हणून विनवणी करता येईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy