कुणा दोष देणे ...........
कुणा दोष देणे ...........
कुणी मारली ती लंकेश गौरी
म्हणे धाडसी ती सावित्री होती
कशी जाहली ती वैरी कुणाची
म्हणे लेखणी तिची गोड होती...
गाथा चोरांची लिहिली असावी
खोट्यात वाटा पचणारा नाही
असावा कुणीही रक्तात माखून
कुणीही इथे वाचणारा नाही...
खुनी खेळ झाला खेळून आता
खरी चौकशी कशाने करावी
म्हणे दोष सारा सत्तेचा आहे
ती सत्ताच आहे हमीही ती द्यावी...
उगा नाव घेता ठरवायचे दोषी
पुराव्या अभावी बोलणे न काही
करावा निषेध समर्थनात नक्की
कुणा दोष देणे असे योग्य नाही..