akshata alias shubhada Tirodkar

Comedy

3.2  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

2 mins
413


अकबर राजा सकाळी सकाळी राजदरबारी उपस्तिथ होते खरे पण त्याच्या चेहरा आज उतरलेला होता. बिरबला हे जाणवले एकदाचा दरबारातील सभा संपली आणि बिरबलाची उत्सुकता हि त्याने राजाला विचारले 

"महाराज काय झालं मागास पासून पहातो तुम्ही आज ठीक नाही दिसत "?

"खरं आहे बिरबल तूच एकटाच माझ्या मनातले ओळखू शकतो "

"पण महाराज कसे काय झाले "

"मला स्वतंत्र्य हवंय "?"

"म्हणजे महाराज आपलं राज्य तर स्वतंत्र्य आहे "

"राज्य नाही रे मला कोणी स्वातंत्र्य करा"" 

"म्हणजे महाराज"?

"अरे मला महाराणी पासून स्वान्त्र्य हवाय "

"म्हणजे काडीमोड महाराज तुम्ही तर केवढे प्रेम करता महाराणीं वर आणि हे "

"नाही रे काडीमोड नाही पण तसेच 'काहीतरी "

"म्हणजे काय "?

"काय सांगू सकाळी सकाळी मला महाराणी माझं आरोग्य फिट राहण्यासाठी काढा देते "

"मग बरेच आहे ना तसे हि तुमचे वजन हल्ली खूप वाढले "

"तू हि बोल मला आता बरे काय बरे तो काढा एव्हडा कडू आहे तो पिऊन तर माझं डोकंच फिरत असूनही तो वास नकोच "

"म्हणजे तुम्हाला त्या काढयापासून स्वतंत्र्य हवंय "

"हो रे बिरबल काही कर ना कि महाराणी मला तो काढा देणंच बंद करेल "

बिरबल पांच मिनिटे अकबरला पाहता राहिला हे पाहून अकबर म्हणाला "अरे बिरबल सांग ना काहीतरी यातून सुटण्यासाठी "

"महाराज माफ करा हे स्वान्त्र्य ज्याच्या हातात आहे त्याच्याविरोधात लढाई करणे मुश्किल पेक्षा असंभव आहे "

"म्हणजे रे "

"महाराज तुम्हीच एकदा मला म्हणालात होतात कि मी राजा तुमच्यासाठी महाराणीचा तर गुलाम मग गुलामाने बंड पुकारले तर कसे वाहायचे "

"मग आता काय बिरबल "

"प्या काढा कडू कडू व्हा फिट हळू हळू "


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy