Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Hrushikesh Patil

Tragedy


5.0  

Hrushikesh Patil

Tragedy


सुरुवात !

सुरुवात !

3 mins 16.7K 3 mins 16.7K

ट्रेनच्या जनरल डब्ब्यात एक आई आपल्या १०-१२ वर्षाच्या मुलासोबत बसलेली आहे. वयोमानानुसार मुलगा अवतीभवतीच्या अनेक तऱ्हा डोळ्यांत टिपतोय. अचानक छक्क्यांचा एक गुथ्था डब्यात घुसतो. त्यांचं आपलं नेहमीचंच पैसे मागणं. जगानं स्वीकारलं नाही म्हणून उगाचच भीक मागून पोट भरणं. आई आणि मुलगा दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलतात. मुलाच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक उत्सुकता आहे याउलट आईला मात्र भीती आणि किळस वाटतीये. त्यांचं जवळ येणं तिला आणखीनच भयभीत करतंय. छक्क्यांचा स्पर्शाने मुलाच्या चेहऱ्यावर गूढ हसू उमटलंय पण आई मात्र रागाने लालबुंद झालीये.

तोच बेल होते आणि विनय स्वप्नातून जागा होतो. गेली पंधरा-सोळा वर्ष तो हे स्वप्न जवळपास रोजच पाहतोय. या स्वप्नाचा अर्थ त्याला अजूनही उमगला नाहीये. त्याच्यातील मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला ही बाब आणखीनच छळतेय. हा तास त्याला रिकामाच आहे. पूर्ण स्टाफरूम रिकामीच असल्याने तो त्या स्वप्नावर आणखीनच खोल विचार करू लागतो.

तोच तिथे मानसी येते. मानसी शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी. तिला विनयबद्दल प्रेम आहे. आकर्षण आहे. तिने अनेकदा विनयला याबद्दल सांगितलंय. पण विनय तिला बधायला तयार नाहीये.

विनयचा तोल जातो. तो मानसीला आपल्या बाहुपाशात ओढतो. एक-एक करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. तिचा प्रतिकारही चालूच आहे. ग्राऊंडवरच्या मुलांच्या गोंधळात तिचा आवाज दाबला जातोय. विनय आता तिच्या अंगावर राहिलेल्या शेवटच्या कपड्यावर हात टाकण्यासाठी पुढे सरकतोय.

"प्रिन्सिपल सरांनी बोलावलंय" विनयला स्वप्नातून गदागदा हलवून शिपाई जागा करतो. विचित्र मनस्थितीत विनय प्रिन्सिपल केबिनकडे चालू लागतो.

प्रिन्सिपल केबिनमध्ये एक वेगळंच संकट उभं राहिलंय. मानसीने तिच्या पोटात विनयचं बाळ असल्याची तक्रार केलीये. विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विनयचा तिरस्कार करणारे शिक्षक सगळेच त्याला जाब विचारताहेत. विनयला काहीच बोध होत नाहीये. तो नुकताच पडलेल्या स्वप्नाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय. तोच एक कार्यकर्ता त्याची कॉलर पकडून कानाखाली मारतो. फटका एवढ्या जोरात बसतो की विनय खालीच कोसळतो. त्यानंतर एकावर एक असा लाथा-बुक्क्यांचा मार त्याच्या शरीरावर पडतोय. त्याच्या शरीराला मात्र त्याची काहीच जाणीव होत नाहीये.

खूप प्रयत्नांनी तो उठतो. प्रतिकार करतो. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगायचा केविलवाणा प्रयत्न करतो. प्रिन्सिपलसहित सर्वच पुराव्यांची मागणी करतात. कसलातरी गंभीर विचार करून तो आपल्या पर्समधून एक कागद काढून प्रिन्सिपल सरांच्या हातात देतो. प्रिन्सिपल अगदी विचित्र नजरेने एकदा कागदाकडे तर एक विनयकडे बघत राहतात. सर्वांनाच कागदात काय आहे ते जाणून घ्यायचंय. विनय अगदी किंचाळून बोलतो,

"होय. बरोबर वाचलंत. मी तृतीयपंथी आहे. म्हणजेच तुमच्या भाषेत छक्का. एवढा पुरावा बास की आणखी काही हवंय ?"

गर्दी विचित्र हसते. काहींना आपण एक छक्क्याच्या हाताखाली शिकलो याची किळस वाटते. काही हळहळतात. आई-बहिणीच्या नको त्या शिव्या देत गर्दी पांगते. मुलं वर्गात चर्चा करत बसतात.

विनयला जिन्याकडे जातांना पाहून जमिनीवर थुंकून काही वेड-वाकडं तोंड करतात. टेरेसवरून कोणीतरी पडल्याचा आवाज येतो. पुन्हा गर्दी होते. विनयच्या मेलेल्या शरीराकडे बघून नको त्या चर्चांना उधाण येतं. काही हळहळतात तर काही थुंकतात. काही फोटो काढत बसतात.

धाप! आवाजासरशी आई धक्क्याने उठते. भिंतीवर मुलाचा हार लावलेला फोटो पाहून तिचे डोळे पाणावतात....


Rate this content
Log in

More marathi story from Hrushikesh Patil

Similar marathi story from Tragedy