The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Hrushikesh Patil

Tragedy

0.8  

Hrushikesh Patil

Tragedy

पसंत !

पसंत !

4 mins
15.8K


गेलं वर्षभर घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावला होता. घरच्यांच्या समाधानासाठी मी दोन-चार मुली पाहूनही आलो. पण तिच्यासोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्याने येणारी सर्व स्थळे जाणूनबुजून टाळली जात होती. आणि आज प्रत्यक्ष तिचंच स्थळ सांगून आलं. यात सगळी कृपा होती ती आमचे परम मित्र 'श्री' यांची.त्याने आमचं लव्ह सुद्धा arrange marriage म्हणून घडविण्याचा विडाच उचलला होता.

आमची मैत्री तशी जुनीच. अगदी लहानपणापासूनची. पण कुठल्याही बाबतीत आमचे विचार जुळत नाहीत. मला एकदाच प्रेम झालं आणि तेही आता थेट लग्नापर्यंत पोहोचलं होतं. आणि तो... त्याला तर प्रत्येक महिन्याकाठी वेगळ्या मुलीवर प्रेम व्हायचं. आणि त्याला तश्या मुलीही मोक्कार भेटायच्या. आमच्या आर्थिक परिस्थितीचंही थोडंस तसंच होतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून तर तो श्रीमंत बापाची औलाद.

मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरला. सुरुवातीला आम्ही दोघांनीच जायचं ठरवलं. घरच्यांनाही आढेवेढे घेतले नाहीत. तसं तिच्या घरी नेहमी जाणं येणं व्हायचंच. पण ते लपूनछपून. आज प्रत्यक्ष समोरून जात होतो. कसलीही भीती न बाळगता.

"यार... ती समोरच्या बंगल्यात मुलगी बघ किती सुंदर आहे" श्री.

तिची सुंदरताच एवढी होती की मलाही एक-दोन मिनिटं काही बोलावं सुचतच न्हवतं.पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक स्मशान शांतता पसरली होती.

"तू कधी सुधरणार आहेस? तुला आधीच गर्लफ्रेंड आहे हे विसरलास?आणखी किती मुलींच्या आयुष्याशी खेळणार आहेस तू?" मी.

"चुकतोस तू मित्रा... मुलींना जे हवं ते मी त्यांना देतो आणि मला जे हवं ते त्या मला देतात... This is the simple economics yaar" तो.

"म्हणजे?"

"अरे पोरगी म्हणजे वारा... पकडून ठेवता येत नाही... फक्त स्पर्शाने अनुभवता येते" तो.

त्याच्या या फिलॉसॉफीवर काय बोलावं मला सुचतच न्हवतं. शेवटी आम्ही तो विषय तिथेच बंद केला. कारण यामुळे आधीच्या ठरलेल्या प्लॅनवर त्यामुळे मोठं संकट येण्याची शक्यता होती. हा नक्कीच त्या मुलीचा विषय घरात काढेल म्हणून मी त्याला आधीच बजावून ठेवलं.

कार्यक्रम छान झाला. तिच्या घरच्यांना मी आवडलेलो वाटलं. निघता निघता अचानक याने त्या मुलीचा विषय काढला. मला तर धडकीच भरली होती. याने नेमकी इथेच माती का खावी? असा प्रश्न मला पडला होता. मला आपसूकच आमच्या लग्नाची चिंता लागली होती.

"बाटलेली आहे ती" तिथे उभ्या असलेल्या एका बाईने अगदी किळसवाणे तोंड करून सांगितलं.

"म्हणजे?" आम्ही दोघेही एकदमच.

"बलात्कार की काय तो झालाय तिच्यावर काही दिवसांपूर्वी" बाई.

शब्दही न बोलता आम्ही घरातून काढता पाय घेतला.गाडी घराच्या दिशेला लागली होती. त्याची नजर शून्यात होती. एवढं विचारमग्न मी त्याला अजूनपर्यंत कधीही पाहिलं न्हवतं.

"ती मुलगी मला खूप आवडलेय" तो.

"तू काय बोलतोस ते कळतंय का तुला श्री?"

"होय... मला तुझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणतोस ना? माझी एक मदत करशील?"

"बोल!"

"माझं लग्न लावून देशील तिच्याशी?"

●●

माझ्या लग्नानंतरच्या तिसऱ्याच दिवशी घरच्यांनी भर दुपारी मला फैलावर घेतलं.

"श्रीने एका बलात्कार झालेल्या मुलीसोबत लग्न केलं आणि तुला ते आम्हाला सांगावसंही वाटलं नाही?" आई.

खरंतर श्री च लग्न जमवण्यासाठीच खूप कष्ट पडले होते. एका बलात्कार पीडित मुलीसोबत लग्न समाजाने स्वीकारणं जेवढं कठीण होतं तेवढंच कठीण ते तिच्या घरच्यांनी आणि तिने स्वतः स्वीकारणं होतं.आमचे काही मोजकेच मित्र आणि आणि त्यांचे थोडेफार नातेवाईक अश्या मोजक्याच सरंजामात विवाह सोहळा पार पडला.श्री लग्न केल्यानंतर तो काही काळ देश सोडून जाणार होता. तसं आमच्यात ( मुलीच्या घरचे आणि आम्ही) ठरलं होतं.

पण माझ्या ऐन लग्न लागण्याच्या वेळी श्रीने बायकोसोबत लग्नमंडपात एन्ट्री केली आणि मोठा गोंधळ उडाला.आमच्या हिच्या घरच्यांनी तर खूपच नाटकं केली. सगळं सावरतांना मी अगदी रडकुंडीला आलो होतो.

"काय सांगणार आई? श्री एका बलात्कारपीडित मुलीसोबत लग्न करतोय हे अगदी सहज तुम्ही स्वीकारलं असतं काय? हो असेल तर आम्ही चुकलो हे मी मान्य करतो. आणि नकार असेल तरीही आम्ही सांगायला हवं होतं असं तुम्हाला वाटते का ?"

एवढं कसंबसं बोलून मी सरळ घराबाहेर पडलो. श्रीने तिच्यासोबत लग्नाचा एवढा अट्टहास का करावा? हा प्रश्न खरंतर मलाही सतावत होता. लगेचच फोन करून मी त्याला आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर बोलावलं.

"बोल.एवढ्या घाईत का बोलावलंस मला?"श्री.

"एक श्री.तुला हवं तसं अगदी तुझ्या मनासारखं झालंय आता. विषय फिरवून बोलणं मला आवडत नाही म्हणून डिरेक्टच विचारतो. तुला तिच्यासोबत लग्न करण्याची एवढी गरज का पडली होती? दुसऱ्या मुली मेल्या होत्या का ?"

"हाहाहा. हा प्रश्न कधीतरी कोणाकडून तरी येणारच हे मला माहिती होतं. फक्त तुझ्याकडून येईल असं वाटलं नव्हतं."

"तू जसं समजत असशील तसं. पण मला आज पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे."

"ठीक आहे. ऐक तर मग. तुला रेणू आठवतेय का? आपल्यासोबत दहावी पर्यंत होती साधारण"

रेणू नाव ऐकल्याबरोबर मी भूतकाळात शिरलो. आमच्याच वर्गातली मुलगी. दिसायला सुंदर, हुशार, सर्वांशी प्रेमाने वागणारी.श्रीचं खूप प्रेम होतं तिच्यावर. तिचंही असावं कदाचित. तसं तिच्याकडे पाहून वाटायचं सर्वांना.दहावीपर्यंत आमच्याच सोबत होती. दहावीनंतर कॉलेज बदललं आणि भेटी कमी झाल्या. नंतर काही दिवसांनी अचानक ती गेल्याची बातमी समजली. कशाने गेली ते मात्र समजलं नाही. पण श्री तेव्हा खूप रडला होता.

"तिचं काय?" मी.

"मला हिच्यामध्ये रेणू दिसली रे" तो.

"कसं शक्य आहे. रेणू आणि हिच्यामध्ये कितीतरी फरक आहे."

"मी दिसण्याबाबत बोलत नाहीये रे."

"मग?" मी.

"रेणू कशी गेली हे तुला माहितीये का ?" तो.

"नाही. अपघात झाला होता एवढंच कळालं होतं ना तेव्हा ?"

"नाही. अपघात नव्हता तो. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. सामूहिक बलात्कार.त्यातच ती गेली. रेणू तेव्हा वाचली असती तर तिची परिस्थिती आज हिच्यासारखीच असती ना?"


©Hrushikesh Patil

9673917659


Rate this content
Log in

More marathi story from Hrushikesh Patil

Similar marathi story from Tragedy