Priti Yawalikar

Tragedy Inspirational

3.6  

Priti Yawalikar

Tragedy Inspirational

शहीद-ए -आजम

शहीद-ए -आजम

2 mins
26


    भगतसिंह - गत या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे, गेलेल्या काळाचा इतिहास हा येणाऱ्या कित्येक काळासाठी अजरामर असून प्रेरणादायी ठरणार हे ज्यांचा नावात आधीच नमूद होते ते भगत.

 एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचं तर त्या व्यक्तीच्या आधिच्या पिढीचा इतिहास ही तेवढाच महत्त्वाचा. असंख्य प्रश्न निर्माण होताच त्याचे उत्तर मिळविण्यासाठी खटपट सुरू होते. देशप्रेमाने ओथंबलेल्या घरात झालेला जन्म . कोणाला माहिती होते की एवढ्या लहान वयातच आयुष्याचा त्याग करावा लागेल. बालपणी वडीलांसोबत शेतात गेल्यावर डोक्यात असंख्य प्रश्न पडणारे भगत बंदुकीची शेती करायची इच्छा व्यक्त करत होते. हसत वडिलांनी विचारले तेव्हा बोलायला लागले ...

मैं तो बंदूक बो रहा हुं

ताकी मैं अपने देश को आझाद कर संकु 

ओर मेरे चाचा की रीहाई हो सके!

 त्यांचे काका म्हणजे सरदार अजित सिंह ज्यांनी "पगडी संभाल जट्टा" आंदोलन राबविले होते. १९०७ मध्ये बांके दयाल यांनी ही कविता रचली. त्यांच्या काकांच्या जन्माची तारीख आणि भगत सिंह यांच्या फाशीची तारीख एकच. ज्या दिवशी कित्येक बलिदानानंतर देश स्वतंत्र होणार होता त्याच दिवशी भगत सिंह यांचा काकांचा मृत्यू झाला. स.अजित सिंह हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनण्यायोग्य आहेत, असे टिळकांचे मत होते.

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं

देखना है जोर कितना बाजु-ए-कातील मैं है

करता नहीं क्यों दूसरा कोई बातचीत

देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी मैफील में है

  हिच ती कविता जी भगतसिंह नारा देत असे. १९२१ मध्ये बिस्मिल अजिमाबादी यांनी रचली आणि HRA (Hindustan Republic Association) चे सचिव रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी होणार होती तेव्हा ते हेच गित गात होते.

  सायमन कमिशन विरुद्ध नारेबाजी करतात लाठीचार्ज मुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला आणि आता बदला घायचा म्हणून जेम्स ए स्कोट ची हत्या करण्याची योजना आखण्यात आली. शिवराम राजगुरु - लाठी काठी, दांड पट्टा यामध्ये तरबेज HSRA चे शूटर आणि त्यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथूनच व्यायामविशारद पदवी घेतली होती. सुखदेव - लाहोर मध्ये भगत सिंह सोबत शिकत होते तेव्हापासून तर फाशी होईपर्यंत सोबत असणारे मित्र.स्कॉट ला ओळखण्याची जबाबदारी जयगोपाल यांच्याकडे दिली मात्र जयगोपाल यांना ओळख न पटल्यामुळे, जॉन साँडर्स ला राजगुरू मारतीलच तेवढ्यात त्यांनी इशारा केला त्यांच्या इशारा लक्षात येताच त्यांनी बंदुक खाली टाकली हे बघून भगतसिंह ला वाटले की आपला सहकारी घाबरला म्हणून त्यांनी बंदूक घेऊन चुकून जॉन साँडर्स याला ठार केले पण त्यांना जेम्स स्कॉट याला ठार करायचे होते. 

  सेंट्रल असेम्ब्ली मध्ये टाकण्यात आलेला बॉम्ब ,झालेला तुरुंगवास.जे शांत बसून सर्व बघत बसतील ते भगत थोडीच.सामान्यांच्या हक्कासाठी तुरुंगात होणारी उपोषण .. एवढी भयंकर स्थिती आणि त्यात गमावलेले सहकारी यांचा झालेला त्रास आणि काही दिवसात साँडर्स केस Re-open . जयगोपाल हे माफिचे साक्षीदार झाले,आणि फाशीची घोषणा झाली. तुरुंगात असताना कित्येक पुस्तकी वाचलीत , लिखाण केलं आणि शेवटी देखील (Reminiscences of Lenin ) पुस्तक वाचण्याचीच इच्छा व्यक्त केली. 

शतश: नमन


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy