मी आणि माझी डायरी
मी आणि माझी डायरी


आज अचानक कितीतरी दिवसानंतर हाती डायरी घ्यावीशी वाटली,विचार करत होते की एकदाचं या अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावी. किती बदलतं ना हो, अचानक सर्व. क्षणातचं वाटल की सगळं संपलय,सगळं उध्वस्त अगदी त्या मावळत्या सुर्यासारख .
सहन न होणार होत सर्वकाही.अचानक हे वादळ आयुष्यात येण. कठीण होत बरं का मानसिक आधाराने स्वतःच स्वतःला सावरण .
मृत्यूनंतर देहाची चिता पेटवावी तसं काही सर्व अपेक्षा,स्वप्नांना क्षणातचं पेटवुन फक्त आयुष्य जगण्यासाठी धड्पड करनं . आता मात्र ठरवलं की, ना कसला विचार,ना कसली चिंता बिंधास्तपने आयुष्य जगायचं. पुन्हा एकदा आभाळाला कवेत घेण्याकडे पाउले निघालीत ...! किती सुंदर होत माहितीय का ते सर्व ? मी नाही हह्हह सांगणार .
शेजरच्या काकु पण गाण म्हणतायतं
.
.
" हा यही रस्ता है तेरा तुने अब जाना है, हा
यही सपना है तेरा तुने अब पेहचाना है "
आयुष्यातला प्रत्येक क्षण अगदी त्या निरागस,बाळाच्या हसण्याप्रमाने खुलवुन जातोय, खरयं इंद्रधनुष्याप्रमाणे आयुष्य रंगवुन टाकतात हो ही संकटे.