Amruta shinde

Romance

4.0  

Amruta shinde

Romance

राजकुमारीच्या प्रेमाची गोष्ट (PART1)

राजकुमारीच्या प्रेमाची गोष्ट (PART1)

2 mins
227


राजकुमारी खूप वेगळी होती खूप साध्या विचाराची थोड्या गोष्टीत सुख मानणारी मनापासून बोलणारी खूप निरागस अशी ती राजकुमारी होती ती. तिच्या राजकुमाराची वाट पाहत होती तिला हवा असणारा राजकुमार नव्हता मिळाला. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तिच्या खूप चढ-उतार आले होते. नविन सुरुवात म्हणून कॉलेजला ऍडमिशन घेतले खूप अभ्यास करू आपण असे तिने ठरवले. वर्गामध्ये सगळ्यांशी बोलत नसायची. मोजक्या मुले-मुलीक्षी बोलायची तिच्या मनामध्ये खूप हालचाली चालू असायच्या. तिच्या मना मधील कधीच ती कोणाला काय सांगत नसायची एकदा ती राजकुमारी लवकर कॉलेजला आली तेव्हा ती पुस्तक वाचत बसली. तिची नजर मागे मागे गेली तेव्हा एक मुलगा नुकताच वर्गात तिच्या येत होता तिला त्याला पाहून मनामध्ये ती खुश झाली. न बोलता तिच्या मनात त्याने जागा केली होती राजकुमारीला पण नवलच वाटले असे कसे होऊ शकते? मनामध्ये आनंद होता त्या मुलाशी बोलावेसे वाटत होते तिला. पण राजकुमारी खूप लाजाळू होती दुसऱ्या दिवशी राजकुमारी ची मैत्रीण त्या मुलाशी बोलली. राजकुमारीने त्याचा आवाज ऐकला त्याचे डोळे पाहिले त्याचा साधापणा पाहीला. खूप हुशार आणि साधा निर्मळ मनाचा होता तो. राजकुमारी पन त्याच्याशी बोलली खूप छान तो तिच्याशी बोलला. राजकुमारीला बोलताना त्याच्या काही गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे मुलींचा आदर, प्रामाणिकपणा, समंजसपणा, समजून घेणे ,माणुसकी अशा परिपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये तिने पहिल्या. राजकुमारी च्या मनात तर तो अगोदरच बसला होता पण हे पाहून त्याचा अजून जास्त आदर आणि प्रेम राजकुमारी च्या मनात वाढले होते ."राजकुमारी ला वाटले हाच तिचा राजकुमार असेल" आणि जे माझ्या मनामध्ये आहे तेच त्याच्या हि मनामध्ये असेल असे तिला वाटले तसेच तिला जाणवले .काही दिवस गेले आणि तिलाही समजले की तोही तिच्या प्रेमात आहे मनापासून करत आहे तिला खूप आनंद झाला. राजकुमारीने पायावर बसून सगळ्या क्लास पुडे शिक्षकांपुढे त्याला प्रपोज केला हे पाहून त्याला ही खुपच आनंद झाला आणि राजकुमारीला तिचा राजकुमार मिळाला तेव्हा तिने ठरवले कि काही झाले तरी राजकुमाराला गमवायचे नाही ............(पुढील गोष्ट काहि दिवसानी)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance