Vinod Neve

Tragedy Others

3  

Vinod Neve

Tragedy Others

*" प्रेमाची परिक्षा"*

*" प्रेमाची परिक्षा"*

4 mins
219


 

    एके दिवशी मी मुलाला पोहचवण्यासाठी स्टेशनला गेले असता अचानक ममताची भेट झाल्यामुळे आम्हा दोघींना अतोनात आंनद झाला. ती पण मुलालाच पोहचविण्यासाठी आली होती. गाडी गेल्यानंतर आम्ही गप्पा करण्यासाठी बाकावर बसताना ममता मला म्हणाली, "तु कशी आहेस? व मुलांचे काय चालू आहे? सध्या कुठे रहाते?" आम्ही जळगावलाच रहातो व सर्व   मजेत आहोत असे मी ममताला सांगितले. 

              बर ममता आता सांग तुझे कसे काय चालू आहे? ममता म्हणाली, "माझे आयुष्य म्हणजे एक प्रकारची कथाच आहे" आणि ती सांगू लागली," अग माझे आणि अजयचे एकमेकांवरती जिवापाड प्रेम असल्याचे तुला माहितच होते. तुझ्या लग्नानंतर आम्हीही आमचे प्रकरण घरापर्यंत नेणेचे ठरविले. अजयने त्याचे घरी व मी पण आईला सांगितले. तसे माझे वागणेवरुन आईला कुणकुण लागलीच होती. आईच मन या गोष्टी अचूक टिपते. दोन्ही बाजूने होकार मिळाला. पण अजयला उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जावे लागले. परिस्थिती नसल्याने मी शिक्षण तेथेच थांबविले. त्याकाळी पदवी पर्यंत शिक्षण म्हणजे फार मोठी गोष्ट होती'"

                " त्यादरम्यान अजयची आजी त्याचेकडे आली. त्याचे घर म्हणजे" न स्त्री स्वातंत्र्यमर्हति." या प्रकारचे होते. स्त्रीला घराबाहेर कुठे जायची परवानगी नव्हती. मी जरी शिक्षित असले तरी अजयचे प्रेमापोटी मी घरीच रहाणेस तयार झाले. विचार केला की बाईच घराला सांभाळूनही मुलांचे संगोपन चांगले रितीने करु शकते. म्हणतात ना  .......            


"जिच्या हाती पाळण्याची दोरी |ती जगाते उध्दारी.|.         

ऐसी वर्णिली मातेची थोरी | शेकडो गुरुहुनिहि |"                  

आई जगाचा उद्धार करु शकते कारण ती शंभर गुरुपेक्षाही महान असते. जिजामाताने शिवबांना उत्तम घडवून महाराष्ट्राला एक थोर राजा दिला. अजयने त्याचे आजीला आमचे लग्नाबद्दल सांगितले. पण आंतरजातीय विवाह असलेमुळे तीला ते मान्य नव्हते. असे अजयकडून मला समजले. परंतु आमचे दोघांचे मत याला संमत नव्हते. कारण व्यक्तीला जातीपातीपेक्ष त्याच्या कर्तृत्वानेच मोठेपणा मिळतो. अजयचे आईवडिलांनी खूप सांगुनही आजी लग्नाला तयार नसलेचे अजयचे पत्रावरून कळाले. . त्यामुळे मन खिन्न झाले. कशा कश्यात म्हणून लक्ष लागेना. जसे रात्रीच्या अंधारातही उद्दाची पहाट असते, तशीच पहाट आपले आयुष्यात येईल अशी एक वेडी आशा उराशी बाळगून मी एक एक दिवस पुढे ढकलत होते". 

            " आमच्या पत्रांची देवाण घेवाण आता काहिशी थंडावली होती. दरम्यान अजयला तेथीलच काॅलेज मधील कविता नावाचे मुलीने मागणी घातली. तिचे अजयवर एकतर्फी प्रेम होते. साधी रहाणी उच्च विचारसरणी असलेल्या अजयच्या हे लक्षात आले नाही. पण म्हणतात ना प्रेम आंधळे  असते. तसेच काहीसे कविताचे बाबतीत झाले. ती एका सधन बापाची एकुलती एक मुलगी असलेमुळे, तीचा शब्द घरात फुलासारखा झेलला जायचा. तसेच ती अजयचेच जातीची असलेने, दुग्ध शर्करा योग. येत्या लक्ष्मीला नाही म्हणू नये म्हणून अजय कडील सर्व लग्नाला तयार झाले. अजयलाहि कविताचा पैसा दिसु लागला. परंतु पैसा म्हणजे सर्व सुख नाही याचा त्याला विसर पडू लागला. पहिल प्रेम हि आटत चालले होते.कविताची नोकरीची अट असतानाहि आजीने लग्नाला परवानगी दिली. कारण आईबाबांनी आजीला पटवून दिले कि स्त्रीने घराला हातभार लावणे काळाची गरज आहे. स्त्री ही कुटूंबाबरोबर देशाचाहि आधार असते. अजय कविताचे प्रेमात आकंठ बुडालेने माझ्या प्रेमाचे त्याला भानही राहिले नाही. "

             " अजय आणि कविताचे लग्न ठरलेची बातमी अचानक कानावर आल्याने, माझे पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. नैराश्याचा डोंगरच पुढे उभा राहिल्यामुळे माझे वडिलानचे मनावर एवढा मोठा आघात झाला की, त्यातच हार्ट अ‍ॅटॅकने त्यांचे निधन झाले.त्यामुळे मन फार खिन्न झाले. नियतीने अजुन काय काय वाढून ठेवले आहे.? असे मनात आले. दरम्यान अजय आणि कविताचे लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली होती. आहेराचे, मानपानाचे, दागदागिने सगळं सगळं घेऊन झाले होते. आणि लग्न आठ दिवसांवर आले होते. घरी परत जाणेचे अगोदर एकदा दोघांनी भेटायचे ठरले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती त्याला भेटायला पायीच निघाली असता रस्ता दाट झाडीतून असलेमुळे रस्तात एका भयानक सर्पाने दंश केला. सर्पदंशाचे जबरदस्त धक्काने कविताचा दारुण अंत झाला. "

   

        " तिच्या आई-वडिलांच्या दुःखाला पारावार उरला नाही. ही बातमी अजय पर्यंत पोहोचताच त्यालाही दुःख अनावर झाले व पुढील कार्यक्रमावरही पाणी फिरले. हताश होऊन अजय परत येथे आला. मधल्या काळात बाबा गेल्याने मी एक छोटीशी नोकरी करत होते. एके दिवशी बातमी कळाली की माझ्या ऑफिस मध्ये रिक्त जागेवर कोणाची तरी नियुक्ती झाली आहे. सकाळी ऑफिसच्या केबिनमध्ये गेल्यावर माझा काळजाचा ठोका चुकला| समोर अजयच उभा होता. मन संभ्रमावस्थेत गेलं कळत नव्हतं की प्रेम व्यक्त करावे की राग? पण तेवढ्यातच अजयनेच त्याची कहाणी सांगुन दिलगीरी व्यक्त केली. व परत एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखविली. मी पण त्याला संमती दिली. आणि प्रेमाचाच विजय झाला आम्हाला नियतीने परत एकत्र आणले. आमचे लग्न झाले विधात्याने लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात याची प्रचीती आली. "प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे" प्रेमावर विजय मिळवणारी मी तुला आज दिसते आहे. चल मला उशीर होतो आहे. आपण परत भेटूच.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy