कवी अनिकेत मशिदकर

Tragedy


3  

कवी अनिकेत मशिदकर

Tragedy


प्रेम की यातना

प्रेम की यातना

3 mins 328 3 mins 328

         एक मुलगा अतिशय टपोरी, सतत हिंडत असायचा. त्याचं साधं शिक्षण पण पूर्ण नाही. अहो जो १० वी मध्ये ६ विषयात नापास होतो त्याचं काय शिक्षण पूर्ण असणार? त्याचे मित्र पण तसेच न शिकलेले. नाक्यावरच्या कट्ट्यावर रोज बसून मुलींवर लाईन मारायची हेच काय ते त्यांचं काम. त्याची ती टपोरी भाषा फारच विचित्र होती. " काय साला आज आपल्याला यक पण पोरगी पटली नाय." एक दिवस असाच तो त्याच्या मित्रांसोबत बसला होता. तेव्हा त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ती त्याने कधी विचार पण केली नसेल. गोड आणि सुंदर दिसणारी मुलगी त्याच्या समोरून गेली. तो तिच्या प्रेमात एका क्षणात पडला. त्याला काहीच उमजेना जणू काही त्याच्या मनाचं पाखरू तिच्या मागे-पुढे करायचं. जिथे तिथे त्याला तिच दिसे.

      उसकी यादों मैं वो खोने लगे

    पलको मैं उसका सपना सजाने लगे...//

   


अशी काहीशी स्थिती त्याची झाली. त्याने ठरवलं की तिला सांगायचं की आपलं तिच्यावर प्रेम आहे. उगवला दुसरा दिवस आणि तो रोजच्या जागेवर तिची वाट पाहत बसला होता. तो खूप बेचैन झाला. त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की मी त्या मुलीवर प्रेम करतो. पण हे त्याच्या भाषेत. " अय आक्या आपल्याला ती पोर लई आवडली यार लय भारी आहे ती. त्याच्या मित्राने सांगितलं की अरे भाऊ त्या मुलीकडे पाहू पण नकोस. त्याने विचारलं का रं भावा का विचारू नाय मी? आक्या म्हटला आपण तिच्या लायकीचे नाहीत. खूप शिकलेली आणि सुशिक्षित फॅमिली आहे भावा ती. तिला प्रपोज करायचा विचार सोडून दे. तो खूप निराश झाला. कसं तिला प्रपोज करायचं हा विचार करु लागला. काहीही झालं तरी मी तीला प्रपोज करणार हे त्याने मनात पक्कं केलं होतं. तो एकदा तिच्या मैत्रिणी ला भेटला पण त्या मुलींनी त्याला दूर लोटलं तरी या पठ्ठ्या हारला नाही. नाव अखेर विचारलंच. नाव ऐकून जणू तो तिच्या प्रेमात हरवून गेला. नाव पण खूप छान होतं. ते म्हणजे कावेरी. दिसायला इतकी सुंदर होती की अप्सराच! ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना याने तिला अडवलं आणि जसा बाऊन्सर जातो तसा डायरेक्ट तिला विचारायला गेला. आणि म्हटला "आपलं तुज्यावर लय पिरेम हाय" कावेरीने ऐकताच सरळ त्याच्या एक मुस्काटात वाजवली. म्हटली तुला अशी छेड काढताना लाज नाही वाटली का? तो म्हणाला अगं माजं यकदा ऐक ना! आपल्याला खरंच तू लय आवडतेस.

      

उसके प्यार मैं दिवाना हो गया

      दिल उसका अफसाना हो गया...//

    

ती मात्र न बघताच निघून गेली. त्याला खूप वाईट वाटले. तरी खचला नाही. रोज तिच्या घराच्या समोरून चक्कर मारायचा. तो दिवस तर त्याला अजूनही आठवतो तो म्हणजे कावेरीचा वाढदिवस. तो कॉलेजच्या आवारात आला. तेव्हा कावेरी तिथेच होती तो तिच्याजवळ गेला. नुसता गेला नाही तर सोबत कॅडबरीपण सोबत घेऊन गेला. म्हटला माझा एकदा ऐक ना कावेरी खरंच जाम पिरेम करतो गं! हे ऐकताच कावेरी पिघळली. म्हटली मी तुझ्याशी मैत्री करू शकते. मैत्री तर झाली पण आता मैत्री चं रूपांतर प्रेमात कसं करायचं हा विचार करत होता. काही दिवस गेले. त्याचा खोडकरपणा त्याची ती भाषा ऐकून हळूहळू त्याच्या‌ प्रेमात पडली. प्रश्न असा होता की कावेरी त्याला हे सांगणार कसं? की ती पण त्याच्यावर प्रेम करते ते? 


     दिल की बातें आँखों से बयॉं करो

     तुम्हारे प्यार को जरा संभालकर रखो

        प्यार कभी भी बदल‌ सकता हैं

      पर दिल कभी बदल नहीं सकता...//


(क्रमशः)


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design