कवी अनिकेत मशिदकर

Tragedy


3  

कवी अनिकेत मशिदकर

Tragedy


प्रेम की यातना - भाग २

प्रेम की यातना - भाग २

3 mins 471 3 mins 471

भाग २

               आला सप्टेंबर महिना. गणपतीचा सण. त्याला कावेरीने घराच्या बाजूला मंडळ होतं. तिथल्या आरतीला बोलवलं. तिथे खूप कार्यक्रम होणार होते. त्या मध्ये कावेरीने गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा तो तिथे आला. काही क्षणांत नाव पुकारलं (कावेरी पोफळे स्टेज वर एक गाणं सादर करणार आहे.) कावेरी स्टेजवर आली पण तिची नजर त्याला शोधत होती. तो अखेर दिसला त्याला बघताच ती गालातल्या गालात हसली. गाणं सुरू झालं...

          पाहिले न मी तुला तू मला न पाहिले

           ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले...

   

या तिच्या ओळी ऐकताच तो आनंदून गेला. त्याच्या मित्राला म्हटला की आरे आक्या ही आपल्यासाठी गाणं म्हणते काय रं? आक्या म्हटला हा बे ती तुला गाण्यातून प्रपोज करतेय. त्याला काय करू अन् काय बोलू हे समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दोघं पण भेटले. पण काहीच बोलत नव्हते. असे लाजत होते जणू कोवळ्या फुलाची कळी अलगद उमलते. काही दिवस खूप मजा केली,फिरले आणि सोबत राहण्याचे वचन पण घेतले. खूप सुंदर लाईफ सुरू असतानाच कावेरीच्या घरच्यांना भनक लागली.

            

कावेरी घरी खोटं बोलून बाहेर त्याला भेटायला गेली. घरी सांगितलं की मी मैत्रीणीकडे चालली. घरी तर पहिलेच संशय आला होता. तिचे बाबा(पप्पा) तिला बघायला गेले. तिच्या मैत्रीणीला विचारलं की का गं कावेरी तुझ्या घरी आली होती का? तर तिची मैत्रीण म्हटली नाही काका! ती नाही आली माझ्या घरी! बाबा संतापले आणि घराच्या दिशेने निघाले इतक्यात वाटेत त्यांना कावेरी आणि तो दोघेही हातात हात घालून फिरताना दिसले. बाबा काहीही बोलले नाही. घरी गेले इतक्यात कावेरी पण घरी आली. बाबाने (पप्पांनी) विचारलं. कावेरी... बाळा... इकडे ये! ती जरा घाबरलीच होती. तरीही जवळ गेली. बोला बाबा काय म्हणता? बाबाने कावेरीला विचारलं. काय गं बाळा कुठे गेली होतीस? कावेरी गडबडली. तिने घाबरले अवस्थेत विचारलं काय झालं बाबा? असं का विचारताय? बाबा जोरात ओरडले आणि तिच्या गालात चापट मारली. आणि ओरडून विचारलं खरं खरं सांग कुठे गेली होतीस? कावेरी रडायला लागली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. घाबरत घाबरत सांगू लागली. बाबा एक मुलगा आहे त्याच्यावर मी खूप प्रेम करते. हे ऐकताच तीच्या बाबांची "तळ पायाची आग मस्तकात गेली. " म्हटले कोण आहे तो नालायक? त्याला बोलव त्याला चांगलीच जन्माची अद्दल घडवतो. माझ्या मुलीला नादाला लावतो काय? कावेरी बाबांना सावरत म्हटली नका ना बाबा त्याला काही करू नका. तरीही बाबांनी काहीही न ऐकता त्याला बोलावून घेतलं. त्याला विचारलं का रे नालायक? तू माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं? तो खूप घाबरला. काही बोलणार इतक्यात त्याला मारायला सुरुवात केली. इतकं मारलं इतकं मारलं की त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याला कावेरीचे बाबा बोलले की, अरे टपोरी कुठचा कोण आहे तू? तुझी शिक्षणाची लायकी नाही आणि माझ्या मुलीला फसवून घरावर आमच्या इस्टेटवर डोळा ठेवतो का? निघ आणि यापुढे जर आमच्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलास तरी तंगडं तोडून हातात देईन. मात्र हे सारं काही कावेरी गपगुमान बघत होती आणि रडत होती.

            

 काही दिवस गेले. दोघांना एकमेकांची सवय झाली होती. करमत नव्हतं. काय करावं समजत नव्हतं. मग त्याने असा निर्णय घेतला की कोणी विचारही करू शकणार नाही. कारण तो खूप मनातून खचून गेला होता. खूप मोठं पाऊल उचललं. अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सारं काही संपून गेलं. जेव्हा हे सारं काही कावेरीला कळलं तेव्हा तिला खूप मोठ्ठा धक्काच बसला. तिने खाणं-पिणं सोडून दिलं. कोणाशी बोलायची नाही. मनातल्या मनात खचून गेली होती ती पण. एक दिवशी तिला खूप त्रास व्हायला लागला. श्वास पण घेता येत नव्हता. हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं. काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिनेही प्राण सोडले. या जगाचा निरोप घेऊन दोघं मुक्त झाले.

           शेवटी मात्र एकच प्रश्न निर्माण होतो. याला प्रेम म्हणायचे की यातना. कारण यात प्रेम हे मिळालेच नाही. तर फक्त यातनाच मिळत गेल्या. दोघंही जरी शरीराने दूर गेले या जगापासून दूर गेले. तरी आत्मा हा दोघांचा एकमेकांत अडकला. प्रेम हे अमर झाले‌.

         प्यार सच्चा हो तो जनाब

             पूरी कायनाय हे लढ सकते हो

         जमाने मैं गम तो बहोत है पर

          प्यार मैं सारे गम को भूला देते हो...

समाप्त...


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design