STORYMIRROR

Subhash Patil

Tragedy Others

2  

Subhash Patil

Tragedy Others

​फाटकं व्यक्तीस्वातंत्र्य

​फाटकं व्यक्तीस्वातंत्र्य

1 min
74


उद्या १५ ॲागस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोक उत्सव साजरा करणार, पण मग आपण खरच स्वतंत्र झालो आहोत का?

आजही आपल्या घरातली स्त्री बाहेर जातांना जिव मुठीत घेउन चालते, चालतांना तिच्यारोखाने पडणाऱ्या वासनांध नजरा चुकवण्यासाठी तिचा केविलवाना प्रयत्न मनाला घायाळ करित असतो.

आजही स्त्री गर्भाची नकारात्मकतेची किड अडाणी कुटूंबापासुन तर शिकले सवरलेले आईवडील ते उच्च शिक्षीत डाॅक्टरांपर्यंत पसरलेली दिसुन येते.

आजही शिक्षणप्रणालीतला गोरखधंदा राजरोसपणे चालतांना दिसतोय. आणी आपण साक्षर असुनही जास्तीची फि भरून आपलीखोटी ईभ्रत मिळवण्याचा

प्रयत्न करतोय.

आजही सरकारी कार्यालयांमध्ये हक्काचे अधिकार मिळवण्यासाठी बाजारबूनग्यांसमोर लाच देउनही गुडघे टेकावे लागतात.

आजही ईथे विकासाची कारण सांगुन सर्रास जंगलतोड केली जाते आणी रोजगार निर्मीतीच्या नावाखाली शुध्द हवेत धूर अन् निर्मळपाण्यात विष मिसळले जाते.

आजही उच्च शिक्षीत प्रशासकीय यंत्रणा जबरदस्त बदलाची क्षमता असतांनाही राजकिय स्वार्थापूढे पांगळी होउन अडाणचोट नेत्यापूढे नाचतांना दिसते.

आजही राजकिय शक्तीवर पोसलेल्या गावगुंडांपुढे कायदा सुव्यवस्था नागडी करून भरचौकात टांगलेली दिसते.


कोण जबाबदार असेल ह्या गोष्टींना? कदाचीत आपणच?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy