पाषाण ह्रदयी
पाषाण ह्रदयी
आई.किती मृदु शब्द आहे ना.पण काही आया निर्दयी असतात.पैशा करीता,इस्टेटी करीता स्वत:च्या मुलांचा पण विचार करत नाही.अशाच एका आईची कथा सांगणार आहे.कथा काल्पनिक आहे.
पवन शिंदे अतिशय गुणी मुलगा.आईचा एकुलता एक.मध्यम वर्गीय कुटुंब. वडील सरकारी नोकरीत क्लार्क म्हणुन कामाला होते व आई गृहीणी पण दोघांचे स्वभाव टोकाचे त्यामुळे दोघांच्यात सतत वाद होत.बिचार्या पवनची मधल्यामध्ये कुचंबणा होत असे.शेवटी आई वडील विभक्त झाले.व पवन आई जवळ राहीला.त्या वेळेस तो लहान होता.
आईला आर्थिक मदत कुठुनही नव्हती.वडिलांनी पोटगी म्हणुन त्यांना जमेल तेवढे आईला पैसे दिले.कारण त्यांचा पगार बेताचा होता.पण ते पैसे किती दिवस पुरणार.व पवन पण लहान होता.आपल्याला व पवनला आधार मिळेल हा विचार करुन आईने दुसरे लग्न केले.पवनला नविन बाबा मिळाले.हे वडिल अतिशय चांगले होते.त्याला सांभाळुन घ्यायचे.या वडिलांन कडे बर्यापैकी सुबत्ता होती.पस्तीस एकर बागाईत जमीन रहायला स्वत:चे घर.त्या मुळे आई व पवनचे बरे चालले होते.पवन पण या घरात येऊन खुष होता.पण त्या नंतर दैवाचे फासे उलटे पडले आईला या संपत्तीचा मोह आवरता आला नाही.कधी न पाहीलेली संपत्ती विनासायास पदरी पडल्यावर माणसाची मती गुंग होते.तसेच आईचे झाले होते.पैशापुढे तिला काहीच दिसेनासे झाले.पैशाची हाव फार वाईट असते.तर इतकी सुबत्ता पाहुन तिचे विचार बदलायला लागले.पवन लहान असतांना या घरात आल्यावर नविन वडिलांनी आईला सांगितले कि आपण थोडी बहुत संपत्ती पवनच्या नावावर करु.पण आईला हे पटले नाही.ती म्हणाली अजुन तो लहान आहे.कशाला आत्ता पासुन त्याच्या नावावर संपत्ती करायची.पुढे बघु.असे पुढे पुढे करता करताती वेळ कधीच आली नाही,नंतर पवनला दोन सावत्र भाऊ झाले.पवन मोठा होत होता.आईचा स्वभाव फार हट्टी झाला होता.पुढे पुढे वडिलांचे पण ऐकत नसे.हळु हळु तिने सर्व संपत्ती आपल्या नावावर करुन घेतली.काही गोष्टी पवनला आईच्या खटकायच्या तो तिला तिच्या बेछुट वागल्या बद्दल बोलायचा.आईला त्याच्या या बोलण्याचा राग यायचा.तिला वाटायचे हा कोण मला सांगणार.ती सर्वांना तुच्छ समजायला लागली होती.कारण पैशाची धुंदी चढली होती ना.तो एक प्रकारचा माजच होता.
त्याचे जन्मदाते वडिल चांगले नव्हते.त्या मुळे त्यांना सोडले ते चांगलेच केले.व आत्ताचा सगळा प्रवास सावत्र वडिलांन बरोबर चालू होता.आणि ते चांगले होते.पण आईची मती फिरल्या मुळे ते पण बिचारे काहीच करु शकत नव्हते.आई खुप खंबीर झाली होती.स्वत:च्या भावा बहिणींना पण विचारत नव्हती.पुढे मुले मोठी होत गेली.आईच सर्व कारभार पाहायची.शेतीच,बाहेरच सर्व व्यवहार तिच्या हातात होते.त्यात कोणी लुडबुल केलेली तिला चालायची नाही.
पवन मोठा त्याने बारावीं पर्यंत शिक्षण पुर्ण झाले.त्याने स्वत:च्या पायावर उभे रहायचे ठरवले.सावत्र भावंडे पण मोठी होत होती,पवन छोट्या मोठ्या नोकर्या करु लागला.घरात सुबत्ता होती.पण आई सख्या मुलाला पाण्यात पहायची.तिला वाटायच आपल्या पेक्षा कोणीच वरचढ होऊ नये.तिने सासरची पण नाती गोती काही अंशी तोडली होती.सर्व एकसुत्री कारभार चालला होता.
आता पवन लग्नाच्या वयात आला होता,त्यांच्याच नात्यातली मुलगी पाहुन लग्न लावून दिले.मुलगी सुशील आणि समजुतदार होती.सर्व कामे तिला येत होती.नाव छान होते राची.राची ऊंबरठ्या वरील माप ओलांडुन घरात आली आणि आईने त्याच दिवशी पवनला सांगितले की तू तुझ्या बायकोला घेऊन घरा बाहेर पड मी माझ कर्तव्य केलेल आहे.तुझ लग्न करुन दिल आहे.आता तू तुझ बघ.अचानक आलेल्या या वाक्या मुळे पवन निशब्द झाला.त्याला काय करावे कुठे जावे काहीच समजे नासे झाले.कसा उदरनिर्वाह करावा.कारण आता आपल्यावर आपल्या बायकोची जबाबदारी आहे.आईला त्याच्या बायकोचा खर्च उचलायचा नव्हता.त्यामुळे त्यांना बॅगा उचलुन निघायला सांगितले.अंधारात पवन लग्नाच्याच रात्री मानलेल्या मावशी कडे पोहोचला.तिला सर्व हकीकत सांगितली.तिला पवनची आई मुलाशी कशी वागते याची थोडीफार कल्पना होती.तीने या दोघांना थोडे दिवस आपल्याकडे ठेऊन घेतले.पवन चांगली नोकरी शोधायला बाहेर पडायचा पण दोघांचा उदरनिर्वाह चालेल इतपत पैसे मिळतील अशी नोकरी मिळत नव्हती.त्यानी विचार केला की आता शहरात जाऊन चांगली नोकरी शोधावी तो कार चालवायला शिकला होता.त्याने विचार केला की चांगल्या कंपनीत साहेबांच्या गाड्यांनवर ड्रायव्हर म्हणुन नोकरी केली तरी आपल्याला चांगला पगार मिळेल.त्या करीता सर्व प्रथम बायकोला माहेरी पोहोचविले.नुकतेच लग्नाला पंधरा दिवस झाले होते.पण काय करणार नाईलाज होता.नोकरी तर करण भाग होत,त्या सासुबाईंना सर्व काही सांगितले.पवन रामनगर नावाच्या मोठ्या शहरात नोकरी करीता आला.काही दिवस हालाकीत काढले.कोणी ओळखीचे नाही.वडापाव खाऊन दिवस ढकलायचा.धर्मशाळेत झोपायचा.नोकरी करीता फिरायचा.असे करता करता एका मोठ्या कंपनीत ड्रायव्हर म्हणुन नोकरीला लागला.त्या कंपनीच्या गाड्या चालवणे हे याचे काम होते.त्यांचे एक मालक होते.ते कोणाला परगावी जायचे असेल तर भाड्याने कार द्यायचे.त्या गाडीवर हा ड्रायव्हर म्हणुन जायचा.याच्या चांगल्या स्वभावामुळे व सर्वांना मदत करण्याच्या वृतीमुळे हा सर्वांना आवडु लागला.हळु हळु त्याने भाड्याने खोली घेतली,राचीला शहरात घेऊन आला.व शून्यातून आपल्या हिंमतीवर संसार सुरु केला,संसार बर्यापैकी सुरळीत सुरु झाला.पुढे त्याच्या संसारवेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशी दोन फूले फूलली.एवढ्या हाल अपेष्टेत दिवस काढत होता पण सख्या आईने एका शब्दाने पण त्याची विचारपुस केली नाही.त्या काळात त्याच्या चांगल्या स्वभावामुळे लोकांशी सगळीकडे ओळखी झाल्या.
त्याचे सावत्र भाऊ पण मोठे होत होते.आता मोठ्या सावत्र भावाचे म्हणजे याच्या पेक्षा लहान भावाचे लग्न करायचे होते.त्याच्या करीता मुली बघणे चालु झाले.एक मुलगी पसंत पडली आणि लग्न पण झाले.पण याला आईने काहीच सांगितले नाही.याला दुसरी कडुन कळले की भावाचे लग्न झाले,त्याला अतिशय वाईट वाटले,पण त्या वर त्याने काहीच प्रतिक्रीया दिली नाही.कधी तरी सावत्र भाऊ याच्याशी बोलायचे पण त्यांनी पण याला सांगितले नाही.ते आईच्या विरुध्द कधीच बोलायचे नाही.कारण त्यांना आरामात जगायचे होते.घरात वेडवाकड घडत असतांना सुध्दा त्या कडे सोईस्कर रीत्या काना डोळा करायचे.कारण आउ त्यांना पोसत होती.ती पैशाची अफरातफरी पण करायची.सावत्र भावंड बघुनही न बघितल्या सारखे करायचे.पण पवनला आईचे हे वागणे अजिबातच पटायचे नाही.तो आईला सतत या बद्दल टोकायचा.त्यामूळे आईने त्याला खड्या प्रमाणे बाजुला काढून फेकून दिले.
पवनला वाटायचे थोडे खावे पण सच्चाईने खावे.कोणाची संपत्ती हडपकरुन रुबाब दाखवू नये.सच्चेपणाने वागावे.आणि हेच आईला खटकायचे.भावाच लग्न झाल भावाने पवनला किती तरी दिवसांनी लग्न झाल्याचा फोन केली.तसेतर त्याला बाहेरुन कळलेच होते.त्या वर त्याने आनंद व्यक्त केला.चला बर झाल.भाऊ संसाराला लागला.याचा स्वभाव असा की सगळ्यांना चांगलच बघायचा.पवन मनाने खुप चांगला होता.सगळ्यांच भल चिंतणारा.याने मुलीचे नाव,गाव विचारले.सगळी माहिती विचारली.आईने मुलीच्या घरची खोलात जाऊन काहीच चौकशी केली नाही,त्यांनी लग्नपण घाईघाईत उरकले.आणि हेच पवनला खटकले.पण तो त्या वेळेस काही बोलला नाही.लग्नानंतर एक वर्ष बरे गेले आणि त्या नंतर भावाच्या बायकोने आपले रंग दाखवायला सुरवात केली.पुढे पुढे तिच्या मोठ मोठ्या मागण्यासुरु झाल्या.ऊठसुटे माहेरी पळणे,दागिने माहेरी नेऊन ठेवणे.रोज भावाशी भांडण करते आणि केस करणे हे तिचे सुरु झाले.त्याला केस मध्ये कडकवुन तुरुंगाची हवा पण खायला लागली.कारण तिला पण इस्टेट हवी होती.सारखी भावावर खटले लावायला लागली,आणि त्या करीता तिच्या माहेरचा पण पाठींबा होता.सतत तिच्या अशा वागण्याने भाऊ कटाळला.व त्याने ही गोष्ट पवनला सांगितली.व म्हणाला मला यातुन बाहेर काढ.पवन तर मनाचा दयाळु व आपले हे कर्तव्य आहे असे समजुन त्याला यातुन सोडवायचे असे त्याने ठरवले.त्याने त्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरवात केली.आधी तिची माहेरची सर्व माहिती काढली.तिथे जाऊन लांबुन लांबून माहिती गोळा केली.त्यात त्याला असे कळले की हे सर्व जण फ्राॅड आहे.लोकांना लुबाडने हाच यांचा धंदा आहे.याच्या आधी तिची दोन लग्ने झाली होती.पण ही एक दोन महिने राहुन लुबाडुन निघुन जायची.पण तिला बोलायला गेल तर केस करुन कडकवायची.पहिल्या व दुसर्या नवर्याला असेच तिने फसवले दर वेळे गाव बदलत तिचे कुटुंब फिरायचे.त्यांचा हाच धंदा.पण पहिल्या नवर्याने त्यांच्यावर पोलीस केस केली होती.पण जामिनावर सुटली.
या गोष्टीला कंटाळुन दोन्ही नवर्यांनी घटस्फोट घेतला.या सर्वात तिचे आई वडिल सामील असायचे.कसेतरी करुन भावाला पवनने यातुन सोडवले.त्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला त्यांना शिक्षा झालीही केस पेपरात पण छापुन आली.हे प्रकरण खुप गाजले.पवनने सर्व व्यवस्थित केले.भावाला घटस्फोट मिळवुन दिला.पण काहीच महिन्याच्या अंतराने आईने न सांगता भावाचे दुसरे लग्न लावून दिले.म्हणजे संकटात आल की पवनचा त्यातुन सोडवण्या करीता वापर करुन घेत होते.हे जेव्हां पवनच्या लक्षात आले.तेव्हां पवनने सांगितले याच्या पुढे तुम्ही तुमचे निस्तरा मला बोलवायचे नाही.तुम्ही तुमच्या फायद्या करीता मला बोलावता.एका पैशाची तरी मला मदत कराता.मग मला बोलवायचे नाही.तुमचा पैसा पण नको आणि काही नको.असे पण आई त्याला शेतातले धान्य पण देत नव्हती.भावाची दुसरी बायको पण तशीच निघाली.सारखी म्हणायला लागली माझ्या नावावर घर करून द्या.शेवटी कंटाळुन आईने दुसरे घर तिच्या नावावर करुन दिले.तिने नवर्याला घरातुन हाकलुन दिले.ती पण नालायक निघाली.दुसर्या सावत्र भावाचे लग्न झाले,त्याच्या पण बायकोने हाच धिंगाणा घातला,तिने तर सर्व रहात होते तेच घर बळकावले. व सर्वांना बाहेर काढले.सर्व जण शेतातल्या घरात रहायला लागले.पण एवढ सगळ होऊन ही आईने शेत व शेतातल्या घरावरचा हक्क काही सोडला नाही,सावत्र मुलांनी इतका त्रास दिला.त्या सर्वातुन पवनने भावांना सोडवले.तरी पण आईला त्याच्या बद्दल काहीच वाटले नाही.शेवटी पवनने सांगितले याच्या पुढे तुमचे काय प्रोब्लेम असतील ते तुमचे तुम्हीँ सोडवा,मी मोठा भाऊ म्हणुन माझे कर्तव्य केले,
पवनचा मुलगा चांगले शिकला.व चांगल्या कंपनीत कामाला लागला.मुलगी पण चांगली शिकली.पवनच बस्तान व्यवस्थित बसल.म्हणजे बघा देव त्याच्या पाठीशी होता.आईने वार्यावर सोडले पण देवाने तारले.सावत्र भावांच्या संसाराचं वाटोळ केवळ त्यांच्या बायकांन मुळे झाल.पवनची बायको खुप समजुतदार व संस्कारी तिने तिचा प्रपंच व्यवस्थित सांभाळला.एवढा पैसा असुन आईला कुठल्याच प्रकारे सुख मिळाले नाही.एवढा पैसा असुन काय कामाचा.सावत्र नातवंडांच सुख नाव सुनांच पण सुख नाही.सर्वच खेळखंडोबा,मुल पण सैराभैरा झाली,एकाही मुलाच कुटुंब व्यवस्थित राहील नाही,केवळ पैशाची हाव,पवन व पवनची बायको चांगली होती तर त्यांना घरातून हाकलून दिल काय मिळवल त्या आईने.पवनशी तर तिने किती वर्षापासुन बोलणे सोडले,पवन त्या नंतर कधीच आईकडे गेला नाही,त्याने जवळ जवळ सर्वांशीच नाते तोडले पण असे नाते तुटत नाही ना.आठ दहा वर्षांनी त्याच शहरात काही कामानिमित्त आई आली.लाजेकाजेस्तव पवन कडे चक्कर मारुन गेली.सुनेशी धड बोलली नाही.जेवायला पण थांबली नाही.
शेवटी पवनने हेअसेच राहणार असे मनाचे समाधान केले.व आपण असेच पुढे चालायच.अशी मनाशी खुणगाठ बांधली.
अशा दुदैवी मुलाची ही कथा.पण त्याने आपले एक आनंदी विश्र्व उभे केले व तो त्यात रममाण झाला.
