Rajiv Masrulkar

Tragedy

3.4  

Rajiv Masrulkar

Tragedy

ऑनलाईन दु:ख

ऑनलाईन दु:ख

7 mins
2.1K


: hi

:hello, Priti.

:ge

:good evening

:कसा आहेस

:मी मजेत. तू?

:मी ही

:ब-याच दिवसांनी भेटतीयेस. आणि तीही ऑनलाईन?

:हो ना

:आज कशी काय आठवण आली माझी

:गप.

:गप काय गप, सांग ना

:तून ऑनलाईन दिसला म्हणून

:ह्या.. खोटं. फेकू नकोस.

:ok, bye

: 🙄 बरं बरं.. बोल मग. काय चालूये?

:काही नाही

:असं कसं? काही तरी चालू असेलच की?

:टीव्ही चालू आहे.

: 😭 अगं, तुझं काय चालुये

: बोलतीये ना मी तुझ्याशी

: 🙄 ... बरं, जेवण झालं?

:हो

:काय खाल्लं?

:खिचडी

: ऑ....?

:तू जेवला का

:हो

:काय खाल्ल

:वरण भात भाजी पोळी

: 😜

: हसते काय अशी?

:माझ्या खिचडीला का ऑ केलं मग

: 😩

:गंमत रे... रडतोस की काय

:नाही. अजून काय चाल्लं मग

:काही नाही रे

:सुखात आहेस ना तू....?

:ऑफ्कोर्स. का रे, असं का विचारलं?

:सहजच आपलं

:शक्यच नाही. काहीतरी कारण असेलच.

:नाही गं. खुशाली विचारली मी

:hummmm...

:🙄

:तू आहेस ना सुखात

: ......... हो

:वहिनी... कशी आहे?

:छानै ती. झोपलीये

:मुलगी?

:तीही मस्तै. झोपलीये तीही

:तुला येत नाहीये झोप?

: ........... ............... ,तुझं कुटुंब काय म्हणतं?

:मजेत आहे. ते थोड्यावेळापूर्वीच आले ड्युटीवरून. जेवले. थकले होते. झोपले.

:मुलगा कसा आहे तुझा?

:छानै

:झोपला

:नै. टीव्ही पाहतोय. 10 वाजल्याशिवाय झोपत नाही तो

:हं..... तुला येत नाहीये झोप?

:humm...

:बरीयेस ना?

:झकास आहे रे मी

:मला नै वाटत तसं. खरं सांग

:अरे काहीच नाही रे. मस्त आहे मी

:आज का बोलावसं वाटलं माझ्याशी?

:सहजच

:आठवण आली होती माझी?

:गप रे

:खरं सांग

:असं काहीही नाहीये रे

:मग कसं आहे?

:काही नाही. जा. Bye, Gn

:ok ok.... विषय बदलून बोलूया का?

: 😏

: सॉरी. गंमत केली गं.

:😏

:बरं मला सांग. तुझ्या मैत्रिणी कशा आहेत?

:तुला काय करायचंय त्यांच्याशी

:अगं तसं नाही. विषय बदलायचा म्हणून सहज विचारतोय मी. तुम्ही तीन वर्गांनी मागे होत्या माझ्यापेक्षा, तरीही सोबत खेळायचो ना आपण त्यावेळी. म्हणून आठवलं. चिंकी, मनी, आर्ची.. कशा आहेत?

:मला नै माहित

:का गं? असं कसं?

: तुला काय करायचंय? मी नै बोलत त्यांच्याशी

:का? भांडण झालं होतं?

:नै... लै शहाण्याहेत त्या. बोलणं बंद केलं मी

:स्वभाव चांगलेहेत पण त्यांचे

:तुला कशाला इतका पुळका रे त्यांचा ? तुला बरी आठवण येते त्यांची? काय?

:नाही... आपलं सहजच.

:कोणी आवडत होती का रे त्यांच्यातली ..... छुपा रूस्तम... आं?

:छे गं.

:अंहं... काही तरी नक्कीच आहे. अशी थोडीच आठवण येते कुणाची

: जाऊ दे मग. तुला जे समजायचं ते समज. 😩😏

:रागावलास

:अंहं

:किती छान दिवस होते नै का रे ते?

:एकदम मस्त

:मज्जा करायचो आपण. लंगडी, चंफुल,सागरगोटे, दोरीवच्या उड्या,लपाछपी... काय काय खेळायचो आपण

:हो ना.

:मला अभ्यासातलं काही जमलं नाही तर मी यायचे तुझ्याकडे समजून घ्यायला. चित्रही काढून घ्यायचे तुझ्याकडून. आठवतं मला अजूनही

:हं

:खूप हुशार होतास तू शाळेत. हेवा वाटायचा मला तुझा. गल्लीत तुझ्या अभ्यासाचीच चर्चा असायची.

:हो का? आयला... आणि इतर मुलींना काय वाटायचं?

:इतर म्हणजे कोण नेमकी? स्पष्ट नाव सांग. मग सांगते

:🙄 तसं नै. मी आपलं जनरल विचारतोय. जाऊ दे. फिरकी नको घेऊ

: 😜😅

:मग काय म्हणतेस अजून

:कै नै

:फेसबुकवर आल्यापासून आज वेळ मिळाला का बोलायला

:नाही रे. वेळ असतोच. पण आज बोलावं वाटलं.

:बोल ना मग

:बोलतीचै की

:कसं कायै तिकडे वातावरण?

:कुठे? औरंगाबादला?

:हो

:छानै. थंडी आहे खूप. मी अंगावर दोन रजया घेऊन बोलतीये तुझ्याशी.

:भारीये मंग.

:कसलं भारी रे....? बरं, गावाकडे कसं आहे

:तसंचै. गारठून गेलोय थंडीत.

:बरंय. बोरं आले असतील ना गावाकडे भरपूर

:हो. खूपेत. तुला आवडतात बोरं?

:खूपच आवडतात. गावरान बोरं, काकडी बोरं. शेतात जाऊन बोरीच्या झाडाची बोरं पाडून खायचे मी लहानपणी. तुलाही दिलेले कितीकदा. आठवतं?

:आठवतं ना. अजून काय काय आवडतं तुला?

:आंबे, पेरू... त्या त्या ऋतूत आलेलं सगळं आवडतं मला. तुला?

:अरे वा... माझ्यासारखंच आहे मग तुझंही. मलाही तसंच आवडतं.

:खरंच? ऐ... रंग कोणता आवडतो रे तुला?

:सावळा

:ऐ मस्करी नको. खरं सांग.

:हो गं. कृष्ण नव्हता का सावळ्या रंगाचा. हे संपूर्ण विश्वही सावळंच तर आहे. म्हणून आवडतो मला सावळा रंग.

:किती छान बोलतोस तू? तुझ्या कविता वाचत असते अधुनमधून तुझ्या वॉलवर. छान लिहितोस.

:थँक्स. तुझा कोणता आहे आवडता रंग?

:मला गुलाबी आवडायचा आधी, पण आतापासून सावळा आवडायला लागलाय.

:अरे वा.... भारीचे मग.

:आवडता विषय

:तुला माहितीये ना? समजलं नाही की मी गणित सोडवून घ्यायला यायचे तुझ्याकडे. तू लगेच समजावून सांगायचास. तोच माझा आवडता विषय.

:माझाही. आवडतं गाणं?

: तू जब जब मुझ को पुकारे मै दौडी आऊ नदियाँ किनारे...

:वॉव.... लहानपणापासून हे गाणं माझंही आवडीचं आहे. तुला माहितीये ना... गल्लीच्या कोप-यावर शंकरची टपरी होती टेपरेकॉर्डर सुधारायची? तो कायम हे गाणं लावायचा मोठ्या आवाजात.... ए धरती चाँद सितारे........ व्वा

: मी ही तेच सांगणार होते.

:बाळ झोपलं का तुझं?

:हो रे. टीव्ही पाहता पाहताच झोपला बघ तो. अरे बाप रे 11 वाजलेत रात्रीचे.

:हो ना.. मला झोप येतेय आता. नंतर बोलुयात का?

:झोपतोस?

:हो. सकाळी लवकर उठायचंय मला. उद्या शनिवारे ना? हाफ डे...

:ठीके. झोप मग. मी ही झोपते. Bye Gn

:Gn. Sd

:cu

: ..........

..........

..........

..............

झोप ना. ऑनलाईन आहेस अजूनही. दुस-या कोणासोबत बोलतेस का?

: 🙄 .. गप रे. यादीतल्या सर्वांना अन्फ्रेंड केलंय मी.

:का?

:असंच

:असं कसं

:करावं वाटलं म्हणून.

:मग आता ऑनलाईन का आहेस केव्हाची?

:झोप येत नाहीये

:आत्ता तर येत होती

:😩 येतीय पण अन नाही पण

:का गं?

:माहित नै

: .........

......... काही बोलायचंय का तुला मनातलं?

:hummm...

:काही प्रॉब्लम असेल तर नक्की सांग. काही मदत हवी असेल तर ते ही सांग.

:काही विचारायचंय रे तुला

:विचार ना मग बिन्धास्त

:नाही, नको.

:अगं विचार गं.

:नको, तू रागावशिल.

:नाही रागावणार. विचार.

:आधी मला वचन दे. तू माझ्यावर रागावणार नाहीस.

:दिलं.

:मी सांगतीये ते कोणाला सांगणार नाहीस

:का गं? असं काये त्यात

:दे

:दिलं

:गैरसमज करून घेणार नाहीस?

:ठीकै. अजून काही?

:अंहं

:विचार मग आता

: ....................

....................

.................... मी तुला आवडायची का रे?

:का गं, असं का विचारतेयस?

:तू सांग फक्त.

:hum.....

:सांग ना

:तसा काही विचार नव्हता केला मी तुझ्याबाबत.

:😩

:म्हणजे तुला काही वाटायचं का माझ्याबाबत

:हं

:काय

:प्रेम होतं रे माझं तुझ्यावर . अजूनही आहे...

:काय? ..... मग सांगितलं नाही कधी तू? मला कधी जाणवलं पण नाही तसं. तू..... तू दादा म्हणायचीस मला. मग मी पाहूच शकलो नाही तुझ्याकडे तसं...

:अरे कुणाला शंका येऊ नये म्हणून म्हणायचे मी तसं. काय होतं त्यानं. आतेभाऊ-मामेबहिण हे ही तसंच नातं असतं ना... होतात ना त्यांची लग्नं? खूप प्रेम आहे रे माझं तुझ्यावर....

:...... 😩

:जर मी त्यावेळी बोलले असते मनातलं, तर केलं असतं का तू माझ्यावर प्रेम

:.............. ही जर तर ची गोष्ट आहे प्रिती. आता बोलून काय उपयोग? खूप उशिर झालाय आता.

:तसं नाही रे. माझ्या मनाच्या समाधानासाठी का होई ना, सांग ना प्लिज. मी तर मनातून स्वत:ला तुलाच अर्पण केलं होतं. सांग ना

:हे बघ. माझं लग्न होऊन संसार सुरू आहे. तुझंही लग्न झालंय. आता काही अर्थ उरलाय का?

:मी रंगाने काळी आहे, म्हणून तू टाळत होतास ना मला?

:नाही गं. तू काळी नाहीचेस. सावळी आहेस आणि सावळा रंग माझा आवडीचाय.

:मग का आवडत नव्हते मी तुला

: .......

:मी त्याचवेळी सांगितलं असतं तर तू केलं असतं माझ्यावर प्रेम? केलं असतं लग्न माझ्याशी?

:..... तू वेडी झालीयेस का?

:हो. वेडीच होते मी आणि आजही आहे तुझ्या प्रेमात

:जीव घेणारेस का आज माझा?

:तुझा कशाला जीव घेऊ मी? जीव देऊ शकते तुझ्यासाठी.

:नवरा प्रेम नाही करत का तुझ्यावर?

:करतो रे. जीवापाड करतो. जपतोही मला.

:मग

:मन नाही भरत माझं

:दिसायला माझ्यासारखाच तर आहे तो. वाईट नाही काही.

:हो रे, म्हणूनच विसरून गेले होते मी तुला लग्नानंतर काही वर्ष.

:मग आता का पुन्हा असं?

:पण सणावाराला माहेराला आले की आठवायचास तू. दिसायचासुद्धा.

:मला माहिती असतं तर नसतो दिसलो.

:वेड्या, तुला नाही कळणार माझ्या मनातलं. तू प्रेम केलं असतं तर कळलं असतं.

: ............ मग पुढे?

:मग अचानक फेसबुकवर तू दिसलास. तुला फॉलो करणं सुरू केलं. आज हिंमत करून बोलतीये.

:हे बघ, हे चूकीचं आहे सगळं. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्याची फसवणूक करतीये.

:फसवणूक नाही रे. मी काहीच कमी पडू देत नाही त्यांना.

:तुझा मुलगा आहे 2 वर्षांचा. तरीही तू माझ्यावर प्रेम करतेस?

:हो.... काय चूक करतेय मी. मनापासून प्रेम करतेय तुझ्यावर. एकतर्फीच करत होते. फेसबुकवर भेट झाली नसती तरी करतच राहिले असते तुला न सांगताच. त्यांच्यात तुला पाहत समर्पित करत आले आहे, पुढेही तेच केलं असतं. फेसबुकनं वेडी आशा जागवली. वाटलं विचारावं तुला... तुलाही कधी माझ्यावर प्रेम करावंसं वाटलं होतं का म्हणून. तुझ्या तोंडून "I love you" ऐकायला आतुरले होते मी. वेड लागलं होतं मला. चुकलंच माझं.

:..................... सॉरी गं. मला जाणवलंच नाही कधी तुझं प्रेम. तूही जाणवू नाही दिलंस कधी. आणि आता वेळ निघून गेली आहे.

: Ok....

......... पण भावनेच्या भरात मी हे काय करून बसले? प्लिज, तू हे कोणाजवळ बोलू नकोस. वरचे सगळे मॅसेज डिलीट कर. आणि प्लिज हे सगळं विसरून जा. मला ब्लॉक कर.

:तसं कशाला? मी प्रेम करत नसलो तरी एक मित्र म्हणून आपण बोलत राहू ना यापुढेही.

:नकोच. तू राहशील मित्र म्हणून. आजपर्यंतही राहत आलास, पण माझं तसं कुठे आहे? मी जुन्या आठवणी विसरू शकणार नाही. तुझ्या वॉलवर डोकावल्याशिवाय जमणार नाही मला. प्लिज ब्लॉक कर मला. इच्छा असूनही यापुढे मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही. तुझ्यासमोर कोणतं तोंड घेऊन उभं राहू मी? माझी मलाच लाज वाटतेय आता. गावाकडेही मी कधीच तुला तोंड दाखवू शकणार नाही. माफ कर मला आणि प्लिज विसरून जा सगळं. ऑफलाईन होण्याआधी सगळी चॅटींग डिलिट कर. मीही करते. बाय.गुड नाईट. Love u... 😘😭😩

: प्रिती........

(मनातल्या मनात) कसं सांगू तुला माझंही तुझ्यावर प्रेम होतं म्हणून? अफाट प्रेम होतं माझंही तुझ्यावर. पण सांगू शकलो नाही कधी. घाबरायचो मी जगाला. आपली जात वेगळी. दोघांच्या कुटुंबांत गरीबश्रीमंतीची मोठी दरी. तू यायचीस माझ्या घरी. मस्त बोलायचीस, हसायचीस. खेळायचीस माझ्यासोबत. स्पर्श व्हायचे... शहारायचो. अभ्यासातही हुशार होतीस तू. तुझ्या लग्नात तू मला नक्कीच शोधलं असशील. मुद्दाम आलो नव्हतो मी. तू फेसबुकवर दिसल्यावर कोण आनंद झाला होता मला. बोलण्याचीही इच्छा व्हायची. कित्येकदा तुझे फोटो बघायचो वॉलवर जाऊन.... सगळं सगळं आठवतंय, पण काय उपयोग? मी माझ्या बायकोमुलांसोबत प्रतारणा नाही करू शकत. तू ही तुझ्या कुटुंबासोबत तसं करू नये म्हणून नाही म्हणालो. तू म्हणतेस तसं तुला ब्लॉक करणंच योग्य. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्यासमोर. अलविदा... मिस यू.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy