ओळख
ओळख
७-८ महिन्याच्या लग्नाला शेवटी १वर्षात पुर्ण विराम लागलं. गौरी समोर नवीन आव्हान उभे ठाकले, आता घटस्फोटीत महिला म्हणुन समाजात वावरताना येणाय्रा प्रश्नांना सामोरे जायचे होते. पुरुष कितीही चुकीचे वागले तरीही स्त्रीला च दोषी म्हणुन ग्राह्य धरतात. गौरी ला पण दोषी ठरविण्यात आले... ति कुणा सोबत संसार करू शकत च नाही असं आरोप लावण्यात आले. गौरी च्या अंगावर सौभाग्य च एक ही दागिना नसतांना पण तिला विचारायचे तुझें पती काय करतात? त्यावेळी ति थोडं वेळ स्तब्ध होऊन जायची ,"आता माझं घटस्फोट झालं आहे "हे सांगितल्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. पण तरीही ती ताठ मानेने समाजात वावरत होती.तिला एक प्रश्न नेहमी पडायचा आता तिची ओळख काय आहे? ७ महिन्याच्या लग्नामुळे तिची ओळख बदलली. "ना ती कुमारिका आहे ,ना ती विवाहित, ना ती विधवा. "आयुष्य एका कागदावर कलेल्या स्वाक्षरी मुळे किती बदलते ह्याची जाणीव गौरी ला त्यावेळी झाली आणि न केलेल्या चुकांची शिक्षा आजन्म भोगावं लागणार. सोबत नवीन ओळख "अर्धी विवाहित". म्हणजेच घटस्फोटीत" ...