घटस्फोट
घटस्फोट


७-८महिण्यातच गौरी च लग्न तिच्या रंग रुप आणि तिच्या माहेरच्या ची आर्थिक परिस्थिती बेताची या सर्व बाबी वरुन तिच्या नवऱ्याने तिला "घटस्फोट घेऊ या, पुढे आपण संसार करू शकत नाही" असं म्हटल्यावर ती एक क्षण विचारशुन्य झाली.. संसार वाचविण्यासाठी ती खूप प्रयत्न करू लागली. पण संसाराची गाडी एका चाकावर चालू शकतं नाही. शेवटी त्यांच्या इच्छेनुसार झालं. न्यायालयात गेल्यावर कागदपत्रे वर स्वाक्षरी करताना अक्षरशः हात थरथरत होता. लग्नाच्या वेळी घेतलेले वचन एका सहीत संपुष्टात आले... त्याला आपल्या मित्रा सोबत हसत न्यायालयातुन निघताना पाहून तिला विचार आलं "काय पुरुष आहे, एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून हसु कसं शकतो. सौभाग्यवतीच शेवटचं दागिना मंगळसूत्र गौरी ने बाबा (सासरे) कडे दिले शरिरात प्राण आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी जगायचं होतं आई वडील भाऊ बहीण साठी. त्यावेळी एक च निश्चय घेतला "शुन्यातून विश्व निर्माण करण्याचं"