लोभाने सारं गमावलं
लोभाने सारं गमावलं
शिवा आज खूप आनंदी होता. त्याचे मागील 3 वर्षांचे स्वप्न आज पुर्ण झाले होते. खूप हालअपेष्टा सहन करत तो आज नोकरी वर रुजू झाला होता. एका नामांकित कंपनी मध्ये मॅनेजर ची पोस्ट त्याला मिळाली होती. रमा देखील खूप खूश झाली. रमा शिवा ची प्रेमिका...
4 वर्षे झाली दोघे सोबतीने हेे नातं खूप आनंदात जगत होते... अशीच काही महिने उलटली सारं कसं आनंदात चाललं होत, तेव्हा अचानक एक संकट रमा आणि शिवाच्या साखरपुड्याच्या दिवशीच वादळासारखं आलं आणि सर्वकाही क्षणात उध्वस्त करून गेलं.
साखरपुडा मोडला, रमा शिवाला सोडून गेली. शिवा मात्र तिच्याकडे एकटक बघत राहिला जोपर्यंत तिची प्रतिमा दिसत होती तिथवर बघत राहिला. मग भानावर आल्यासारखा ओरडला... ओरडला म्हणजे किंचाळला च... रमा$$$
आलेले पाहुणे शांतपणे निघून गेले. शिवा स्वतःला दोष देत राहिला आणि सावरत बेडरूम कडे गेला, आतून कडी लावून ढसाढसा रडला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली परंतू वेळ निघून गेली होती....
शिवाने मागच्या महिन्यात त्यांच्या कंपनी चे (food product) प्रोडक्ट सोबत घेतले होते. गाडीत बसलेला असता त्याला बाहेर एक मुलगा कचऱ्याच्या पेटीतून काहीतरी उचलतोय असं वाटलं शिवा बघत होता नक्की याला काय हवंय??? सिग्नल लागल्या मुळे तो ते दृश्य स्पष्ट बघत होता... त्याला दिसले की तो मुलगा त्या कचऱ्यातून पोट भरण्यासाठी धडपड करतोय. तितक्यात शिवाने स्वतः जवळ असलेले प्रॉडक्ट त्याला जवळ बोलावून खायला दिले. तो मुलगा खूप खूश झाला आणि शिवा चे आभार मानून पळत सुटला...
त्याच दिवशी सायंकाळी शिवाला कंपनी मधून फोन आला लवकर हजर राहा अशी ऑर्डर अली होती. तो थोडा दचकला आणि तसाच धावत गाडीकडे गेला. स्वतः गाडी चालवत तो कंपनी मध्ये गेला बघतोय तर काय पोलिस आलेली होती. त्याला हळूच चपराश्या ने घडलेला प्रकार सांगितला. तो जरा घाबरला आणि शांत उभा राहिला. पोलिसांनी शिवा कडे वळताच शिवा थरथरायला लागला म्हणून पोलिसांना लक्षात आले की इथेच काहीतरी गडबड असणार. पोलिस म्हणाले "तुम्हीच शिवा दराडे का?", शिवाने मान होकारार्थी हलवली. घ्या रे ह्याला ताब्यात म्हणत त्याला गाडीत टाकले. कोठडीत शिवाने कबुली दिली की
त्याच्या हातून चूक झाली. त्याची कंपनी मिनरल्स युक्त फूड प्रोडक्ट बनवायची. त्यात सर्व काही चेक केल्या शिवाय ते प्रोडक्ट समोर जात नसतात. परंतू एकदा शिवाच्या बेजबाबदार पणा मुळे प्रोडक्ट ची एक बॅच तशीच मार्केट मध्ये गेली, नशिबाने साथ दिली आणि कोणाला काही नुकसान झाले नाही.
परंतू यावेळेस मी अडकलो साहेब असे म्हणत शिवा पोलिसांचे पाय धरू लागला. पैसे देऊन, बोलून शिवा कसाबसा सुटला होता. परंतु तो विसरला की त्याने तेच प्रोडक्ट एका मुलाला खाऊ घातले होते.
एका महिन्याने फाईल परत उघडल्या गेली नवीन आलेल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की हे काय आहे. त्या निष्पाप मुलाचा जीव हा शिवाच्या निष्काळजीपणा मुळे गेला होता. शिवा ला मात्र याची भनक पण लागली नाही तो पैशासाठी आता काहीही करायला तयार झाला होता. तो हालअपेष्टा सोसून आलेला शिवा आता श्रीमंत आणि लोभी झाला होता. त्याला कोणाच्या मनाची कोणाच्या जीवाची पर्वा नव्हती. पण त्या नविन आलेल्या अधिकाऱ्याने बरोबर पुरावे गोळा करून साखरपुड्याच्या दिवशी शिवाला घेरलं ते म्हणजे सर्व सत्य रमा ला सांगून...
रमा फार हताश झाली, मी ओळखते तो हा शिवा नाही असे म्हणून रमा साखरपुडा तोडून त्याला सोडून गेली. आज शिवाला कळले होते की पैसा, गाडी, श्रीमंती ही आपल्या जवळच्या माणसापेक्षा जास्त नाही, कोणाच्या जीवावर उठावे असं शिवाला वाटलं ते म्हणजे फक्त लालाची वृत्तीमुळे. रमाशी सुद्धा तो प्रामाणिक नाही राहिला. आज ह्या सर्व कारणांमुळे तो आतल्याआत जळतो आहे आणि कारावासात आपल्या चुकांना रोज झेलतो आहे.
