कोकण ते इस्लामपूर (घर vapsi)
कोकण ते इस्लामपूर (घर vapsi)
पहिली वेळ - कोकणात
पहिल्यांदा कोकणात गेले तेव्हा वाटलं नव्हतं की अनुभव असा असेल.
आजूबाजूला फक्त डोंगर आणि दऱ्या. उंच डोंगर बघून मला चक्कर यायची. सगळीकडे घनदाट जंगल, आणि एक वेगळीच भयाण शांतता.
मी 2 ते 3 महिने सतत रडत होते. कशासाठी रडते हेच कळत नव्हतं.
हातात माझं छोटं बाळ आणि सोबत माझे मिस्टर. दोघांसाठी मला धीर धरायचा होता, पण आतून मी पूर्ण खचले होते.
दुपार तर सगळ्यात अवघड जायची. बाहेर पाऊस, आत मी आणि बाळ. वेळ काही संपायचीच नाही.
पण हळू हळू त्या जंगलानेच मला शिकवलं. जसं जंगल भयावह दिसतं पण आतून जीवन देतं, तसंच आपलं मन पण असतं.
आज इस्लामपूरला परत आल्यावर मागे वळून बघते तेव्हा वाटतं, त्या डोंगर-दऱ्यांनी मला घाबरवलं खरं, पण माझ्या बाळासाठी उभं राहायला पण शिकवलं.
तो प्रवास कोकणाचा नव्हता, तो माझा स्वतःशी लढण्याचा प्रवास होता.
