The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

pravin talole

Tragedy

3  

pravin talole

Tragedy

जखमा मनाच्या

जखमा मनाच्या

11 mins
654


गोषवारा

 

रखमा पोटासाठी मुलांना घेऊन मुंबईत येते. काहीच दिवसात करोनाचा फैलाव होतो. त्यांना स्थलांतरितांच्या निवारा केंद्रात रहावे लागते. तिथे सुंदर, स्वाती व कनकांगीवर अत्याचार होतात. सुंदर करोनाग्रस्त होतो. स्वाती अतिरक्तस्त्राव व करोना बाधेने मरण पावते. कनकांगीला सोबत घेऊन रखमा स्वातीचं प्रेत चांदुरा गावी नेते. मनाच्या जखमा भरुन याव्या म्हणून कनकांगी आणि सुकांतचे लग्न करुन देते. पण मनाच्या जखमा कधीच भरणार नाहीत, हे सत्य सांगण्याचा प्रयत्न.स्थलांतरितांच्या आधार केंद्रातील कटु वास्तवाची कथा


     सुंदर एक १५ वर्षाचा चुणचुणीत मुलगा.

     हुशार पण बापाच्या व्यसनाने शिक्षण सोडावं लागलं.

     नांदेड जिल्ह्यात किनवट – माहूर रस्त्यावरच्या एका लहानशा खेड्यात बालपण गेलं.

     कधी अति पाऊस. कधी दुष्काळ. दोन एकर शेती.

     दोन दोन फूट चिरा पडलेली काळी आई. जळलेली कपाशी.

     आईने एका खेडवळ टपरीत वडे भजी तळण्याचे काम सुरु केलं. शेतीसाठी कर्ज काढलं. बापाने दारु, जुगारात उडवलं.

     हप्ते आई फेडत होती.

     दारुसाठी रोज बायकोला रखमाला मारहाण. सुंदरला मारहाण. अंग ठणकत असे. तसंच कांबळ्यावर पडायचं.

     रोज दारुला पैसे कुठून द्यायचे ?

     जमीन करपलेली, घर मोडकळीस आलेलं.

     रोजची भांडण, मारहाण, शिव्यागाली, उपासमार ह्या साऱ्याला कंटाळून रखमा सुंदरला म्हणाली.

“ ह्या रांडच्याला इथच मरु दे, आपुण ममईला जाऊ, पोटाला दोन घास मिळतील, लाखो राहत्यात, त्यात आपुण तिचं, चार दागिने, चार लुगडी, सुंदरचे कपडे, धाकट्या स्वातीचं सामान घेऊन रातोरात घराबाहेर पडले, न तिकिटं काढताच, पैसेच नव्हते, मुंबईला आले. स्टेशनात चहाचं गुळमाट प्यायलं आणि रस्तोरस्ती भिक मागत फिरले. कोणी काय दिलं ते खाल्लं, झोपले फुटपाथवर.

     सकाळी समोर हॉटेल दिसलं, रखमाने कमाईचे पैसे दिले, चहा घेतला, आपली कर्मकहाणी हॉटेल मालकाला सांगितली, त्याने सुंदरला कपबश्या धुवायला कामावर घेतलं, खाऊन पिऊन दोन हजार, रखमाने मार्केटात भाजीच्या गोण्या, पाट्या वहायंच काम सुरु केलं, स्वाती बरोबर घेऊन दिवसाला ५/६ शे रुपये मिळायचे.

     रात्री फुटपाथवर काड्याकुड्या जाळून स्वयंपाक, कधी सुंदर हॉटेलात उरलेलं अन्न आणायचा ते खाऊन झोपायचं.     

     एक दिवस सुंदरवर पाच हजार रुपये चोरलयाचा आळ मालकाने घेतला. बेदम मारलं, नग्न करुन पा्रयव्हेट पार्टला सिगारेटचे चटके दिले. दोन हजार तोंडावर फेकले आणि हाकलून दिलं. रखमा मालकाला समजावायला गेली, “ माझा मुलगा असा नाही, तो चोरी करणार नाही.” ती गयावया करत विनवण्या केल्या, पाया पडली, मालकाने तिच्या तोंडावर लाथ मारली.

     “ आता गप जातेस का पोलिस बोलवू ? दोघंही आत जा.”

     सुंदरची नोकरी गेली, आता जगण्यासाठी काहीतरी करणं प्रप्त होतं. त्यानं दादरच्या फुल मार्केटातून मोगरा, काकडा, गुलाब ही फुलं आणायला सुरुवात केली. स्वाती त्या फुलांचे गजरे बनवायची. सिग्नलपाशी गाड्या थांबल्या की दोघंही गाड्यांकडे धावायचे. बऱ्याच बायका गजरे घ्यायच्या. गुलाबाची फुलं घ्यायच्या. संध्याकाळी खर्च वजा जाता ३-४ शे रुपये हाती पडायचे.

     एक दिवस एक मास्तरीण आली, तिने त्यांची चौकशी केली, सिग्नल पाठशाला चालू केली होती तिने. अशा मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, संध्याकाळी ते शाळेत जायचे, साक्षर झाले.

     फुलं आणणं, गजरे करणं.

     गजरे आणि गुलाब, बुके विकणं.

     संध्याकळी शाळेत जाणं.

     आई आणि त्यांची कमाई ७ ते ८ शेकडा रुपये होती. आता आधार कार्ड, रेशन कार्ड काढून घेतलं. फुटपाथवर कापडाची झोपडी केली आणि राहू लागले. रखमाला दारुड्या नारायणची तर मुलांना बापाची आठवण अजिबात येत नव्हती.

रात्री दारुडे येत असतं. रखमावर बळजबरी करायचा प्रयत्न करायचे, पण सुंदर त्यांना लाकडी दांडक्याने बदडायचा. आत स्वाती पण मोठी आणि रुपवान दिसू लागली होती. रखमाला उगीच काळजी वाटे तिची “ ही मुंबै हाय. इथं काय व्हईल कळनार बी नाय.” पोरं तशी अजाणच आहेत अजून.

     मुंबईत अचानक कोरोनाची साथ आली. दुकाने, मॉल, थिअटर्स, सारं सारं बंद झालं. भाजीपाला जिल्हा बंदीमुळे येईनासा झाला, पुन्हा उपासमारीची झळ लागू लागली. रस्त्याला माणूस दिसेना, भीक तरी कोणाकडे मागायची, करोना रुग्णांची संख्या वाढत चालली, संशयित रुग्ण बरेच वाढू लागले, रेल्वे, बस, विमान सेवा बंद झाल्या. टॅक्सी, रीक्षा बंद झाल्या.

     रखमाने गावी परतायचा विचार केला. पण रेल्वे कुठे चालू आहे. १६०१ कि.मी चालक का जायचंय? कही दानशूर माणसं अन्नदान करु लागली. तिथ झुंबड उडायची, भिकारी, फकीर, साधू, जुगारडे सगळेच तुडून पडायचे. बायकांच्या अंगाला झोबांयचे, पण अन्नासाठी दाही दिशा | अम्हा फिरवसी जगदीशा | हेच खरं. हे ही तिघे जायचे. अधाशासारखं खायचे, दुपारचं काम झालं की रात्रीचा शोध.

     एक दिवस रखमा आणि मुलांनी चंबूगवाळ आवरलं आणि गावी जायचं ठरवलं, लगेच मालगाड्यांच्या दोन डब्यांच्या शंटिगमधे बासायचे, गाई म्हशीने घाण केलेलया व्यागनमध्ये बसून घराकडे पोचण्याची वाट बघायचे. गार्डला पैसे द्यायचे आणि गावा जवळ उतरायचे, ह्यांना ते कळलं, त्यांनी पण ठरवलं असंच करायचं.

स्टेशनात प्रचंड गर्दी, श्वास गुदमरला इतकी माणसं दाटीवाटीने उभी होती, प्रचंड गोंधळ, काहीही सूचना मिळत नव्हत्या. रेल्वेच बंद तर सूचना कसल्या ? इतक्या एक पोलिसांच्या मोठ्या गाड्या आलया, त्यांनी जो दिसेल त्यांना लाठीने बदडायला सुरुवात केली, लोक सैरावैरा पळू लागले, एकमेकांच्या अंगावर पडले, पोलिस रखमाजवळ आले, दरडावू लागले.

     “ कुठं चाललीस ? मुख्यमंत्री सांगतात आहे तिथ रहा. एकत्र गर्दी करु नका. तोंडाला फडकी बांधा. कुठून आलात ? कुठे चाललात ?

     “ साब, इकडं उपासमार व्हतीया, म्हणून गावी चाललो.”

     “ गावी काय सोनं गाडलय का शेतात ? साले दुनियाभरचे मुंबईत मरायला येतात, ह्या बिनडोक्यामुळेच करोना वाढतोय.” एकजण शिवी हासडत म्हणाला.

     “ ए भिकारड्यांनो , तुमच्या मायबाप सरकारनं स्थलांतरितासाठी निवारा केंद्र उभारलीत. तिथे चला, गाव गेलं टिपरीत. आला कशाला झक मारायला मुंबैत ?”

     सुंदरच्याा ढुंगणावर एक लाठी मारलीच. “ चल रे कार्टया.”

     स्टेशन बाहेर बस गाड्या उभ्या होत्या. त्यात जनावरांसारखी ही स्थलांतरीत माणसं कोंबली. गाडी बराच वेळ चालत होती. साठ्या प्रकाराने सुंदर, रखमा, स्वाती तिथेही बिचवले होते. त्यांना तुरुंगात नेत आहेत असं वाटलं. गाडी थांबली, पोलिसाने शिटी वाजवली.

“ चला उतरा रे, आमच्यावर उपकाराला आलात इथे. मरा इथे आता,” तो लोकांकडे पाहून बोलत होता. प्रत्येकाला सॅनिटायझर बाटली, डेटॉल, साबण वड्या, मास्क देण्यात आलं. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे पत्र्याचे शेड्स निवारा केंद्र म्हणून उभे होते. प्रत्येकाला गादी, उशी, आंथरुण आणि नंबर देण्यात आला. ह्यातच काही क्वारेंटाईनचा शिक्का असलेले रुग्णही होते. तेही त्यांच्यातच ठेवले गेले. जेवणाची पाकिट मिळायची तीन वेळा, चहा दोन वेळा, जेवण अगदीच बेचव आणि कच्च असायचं, पण गरजवंताला अक्कल नसते. विडी, सिगरेट, तंबाखू, पान, दारु ह्या सगळ्यालाच मनाई होती. पण ह्या सर्व वस्तू पोलिसाला पैसे दिले की पुरवल्या जायच्या. कुठून यायच्या ते कळत नव्हतं. व्यसनीला काय वस्तू मिळाली, तलफ भागली त्याच्याही मतलब, उन्हाळ्यामुळे पत्रे तापायचे, एका शेडमध्ये हजार माणसे असायची, पंखे शेवटचे श्वास मोजत होते, उन्हाळ्याने लोक त्रस्त झाले होते.

     रात्री दहाला दिवे बंद व्हायचे, बंदोबस्ताचे पोलिस घरी पळून जायचे.

     सुंदर त्याही उकाड्यात शांत झोपला होता. गाढ झोप लागली होती. त्याच्या शेजारचा तरुण भैया त्याच्या जवळ येऊन झोपला, त्याच्याशी अश्लिल चाले करु लागला. सुंदर ओरडु नये म्हणून त्याने त्यांच तोंड गच्च रुमालाने बांधले होतं. हात पाय झाडून सुंदर त्याला विरोध करत होता. तो पिऊन बेभान झाला होता. वासनेच्या उसळ्यांचा बळी त्याने सुंदरला केला. कारण त्याची बायको स्त्रियांच्या मांडवात होती. 

त्याने बराच वेळ चाले केले. अनैसर्गिक अत्याचार केले. मग तो सरकला, शेजारी आपल्या गादीवर झोपला, सुंदर वेदनेने तळमळत होता.

     तीन रात्री त्या तरुणाने सुंदरला वासनेची शिकार केलं. सुंदर हे कुणालाही सांगू शकला नाही. मात्र त्याला टॉयलेटला गेला तेव्हा खूप वेदना झाल्या. रक्ताची धार पडली, तो घाबरला, आता तोंड उघडणं आवश्यक होतं. परिस्थिती त्याच्या सहन शक्तीच्या पलिकडे गेली होती. तो अंथरुणावर झोपला होता.

     रोज निवार केंद्रात डॉक्टराचं पथक सर्वांची तपासणी करत असे, डॉक्टर त्याच्याजवळ आले, तेव्हा तो कण्हत होता. सारखा आई ग.., आई ग.. म्हणत होता.

     “ बाळा काय होतय तुला ? तू कण्हतोस का ?”

     “ काय सांगू डॉक्टर…” आणि तो रडायला लागला.

     डॉक्टरांनी त्याला धीर दिला. थोपटलं. त्यांच अंग तापलं होतं.

     “ अरे बाळा तुला ताप आहे. घसा बघू. ”

     “ तु कुठे उन्हात गेलास का ? थंड खाल्लंस का ? मग तुला ताप कसा आला ?” सिस्टरने विचारलं.

     सुंदर खूप भेदरलेला होता. मनात काही तरी भय होतं. त्याच्या चेहऱ्यावरुन ते समजत होतं.

     “ काही न सांगण्यासारखं आहे का ? तू रडतोस का ? कण्हतोस का सांग ना तू, सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल. घाबरु नकोस, मोकळ्या मनाने, न घाबरता सांग बरं”

     “ डॉक्टर साहेब, मला इथे नाही रहायचं, मला सोडा मी कुठेही राहीन, हा शेजारचा रतनलाल भैय्या रोज रात्री माझ्यावर अत्याचार करतो. रात्री १० ला दिवे बंद होतात. मला रक्त पडतय ती जागा सुजून आलीय, तो रात्री दारुच्या नशेत असतो आणि माझ्यावर अनैसर्गिक अत्याचार करतो.”

“ तो गेला कुठे?”

     “ पलून गेलाय सकाळी. ”

     “ स्ट्रेचर मागवा सिस्टर, त्याला ॲडमिट करायला हवं, पोलिस बोलवा.” एकही पोलिस हजर नव्हता.

     सोशल डिस्टन्सचा पत्ताच नव्हता, एकेका फुटावर लोक बसलेले होते. दु:खी, तुरुंगात डांबल्यासारखे डॉक्टरना ते पाहून खूप खेद आणि संताप आला.

     “ अशाने पेशंट वाढतील, काय ही अवस्था इथली किती घाण, चारी बाजूने उघडं गरम वारे येतात, पंखे धड नाहीत, पत्रे तापलेत, कसं होणार याचं त्यात हा मुलगा भलतच सत्य सांगतोय.

     “ सर, त्याच्या हातावर क्वारेंटाइन शिक्का आहे, तरी तो आमच्यातच ठेवलाय.

     हे ऐकून डॉक्टर आणखीच संतापले. आरोग्य मंत्र्याना हे दाखवलं पाहिजे. समाजात राहात मुलांबरोबर घडतय तेच इथेही काय म्हणावं समाजाला. सुंदरला हॉस्पिटलाइज करण्यात आलं. करोनाची बाधा त्याला ह्याला रतनलालमुळे झाली होती. ह्याच्या आईला हे कळल्यावर ती वेडीपिशी झाली, डॉक्टरांच्या पाय पडली, ‘ माझं लेकरु वाचवा हो ’ टाहो फोडत होती. सुंदरची ट्रीटमेंट सुरु झाली.

     १३ वर्षाची स्वाती आईला धीर देत होती. त्या मायलेकी जवळ जवळ होत्या. आठ दिवस झाले, अंगाला पाणी लागलं नाही, पाणी बिल न भरल्याने म.न.पा.ने पाणी पुरवठा लाईट बंद केली होती. शेजारी कनकांगी नावाची तेलगू मुलगी होती, स्वातीशी तिच्याशी दोस्ती जमली.

     एका रात्री दोघींनाही बाथरुमला जायचं होतं, पण टॉयलेट दूर होते, तिथे जाण्याच्या रस्यावर दिवेही नव्हते. दोघी उठल्या, मोबाईल टॉर्चने झोपलेल्या बायकांमधून वाट काढत निघाल्या. स्वातीची आई गाढ झोपली होती. कनकांगीची आई गावी होती. दोघी जणी टॉयलेटमधे गेल्या. मनात भिती दाटली होती, इतक्या गैरसोयीच्या ठिकाणी रहाणं नरकापेक्षा बरं.

     दोघींनी आतून कड्या उघडल्या, दार उघडू लागल्या. इतक्यात अंधारातून दोन तरुण आले आणि टॉयलेटमधे घुसले, त्या दोघींनी प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी चाकूचा धाक दाखवला, दोघींवर अमानुष अत्याचार, बलात्कार केले आणि पळून गेले. इतर वेळी घडलं तेच इथेही घडलं होतं. हीच का स्त्री सुरक्षा? 

पहाटे जाग आली तेव्हा स्वातीच्या आईला ती आणि कनकांगी दोघीही दिसल्या नाहीत. तिच्या काळजात थर्रर्र झालं. रखमा कावरी बावरी झाली, तिने तिथल्या बायकांकडे विचारपूस केली, पोलिसांना विचारलं.

     “ रात्रपाळीचे पोलिस गेले, आम्ही आता आलोय. तुमच्या मुलीवर तुमचंच लक्ष नाही. फुकट खाऊ, हरामी साले, जा चाळती हो.” पोलिसाने दरडावलं.

     इतक्यात कोणी बाई सांगत आली, संडासाजवळ दोन मुली बेशध्द पडल्यात, खाळचे कपडे रक्ताने माखलेत, हे ऐकताच रखमाच्या हातपायातळं त्राणचं गेलं.

     रखमा अतिशय भेदरलेल्या अवस्थेत पळतच सुटली. संडासा बाहेर कनकांगी आणि स्वाती बेशुध्द अवस्थेत विव्हळत पडल्या होत्या. लोक ये जा करत होते. पण कुणीही ही बाब पोलिसांना कळवली नाही. ती पुन्हा धावत स्थलांतरितांच्या निवारा केंद्रात आली. व्यवस्थापकाला तिने सर्व सांगितलं. त्याने डॉक्टरना फोन केला, सरकारी डॉक्टर आले. ह्या दोघींना अँम्बुलन्समधे घातलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले.त्यांची तपासणी केली, त्यांच्यावर बलात्कार झाले होते. आंतभार्गात शस्त्राने जखमा केल्याचे लक्षात आले. म्हणजे त्यानां ठार करण्याचाही प्रयत्न झाला होता. उपचार सुरु झाले. कनकांगीच्या घरी संपर्क केला, तिला आई नव्हतीच बापाने दुसरे लग्न केले होते. यायला गाड्या नाहीत असं कारण सांगून तो आलाच नाही. पोलिसांना सकाळी फोन केला ते संध्याकाळी आले. दोघी शुध्दीवर आल्या होत्या. पण बोलण्याच्या अवस्थेत नव्हत्या. मानसिक दृष्ट्या त्या पार कोलमोडल्या होत्या, एकटक बघत होत्या, काहीच बोलत नव्हत्या, कुणाला ओळखत नव्हत्या, ह्या संधीचा फायदा पोलिसांनी घेतला.

     “ डॉक्टर, त्यांचं स्टेटमेंट घ्यावं लागेल, त्या आल्या काहीच बोलत नाहीत, आम्ही नंतर येतो.”

     “ अहो पण एफ. आय. आर तर नोंदवा, गुन्हा रेप आणि अटेंप्ट टु मर्डरचा आहे. मॅटर सिरीयस आहे, मुली अल्पवयीन आहेत.”

     पोलिसांनी थातुरमातुर लेखन केलं आणि गेले ते पुन्हा आलेच नाहीत.

     कनकांगी १७ वर्षाची मुलगी, काळी, उंच, यौवनसंपन्न ती फुलांचे गजरे विणून विकायची हातरुमाल, कंगवे, पर्सेस हे पण विकून चरितार्थ चालवायची. ती ही फूटपाथ वासिनी होती, ती आणि स्वातीवर टपोरी पोरांचा डोळा होता. एका मुलाने स्वातीचा हात पकडला. तेव्हा तिने भररस्त्यात त्याच्या कानशिलात वाजवल्या होत्या. त्याचं नाव होतं हितेश यादव.

काय खायचं ?

     कुठे रहायचं ?

     आणि किती दिवस ?

     आपत्ती एकटी येत नाही, ती अनेक समस्या, अडचणी, जगण्याची हार मानन्याची वेळ आणते. करोनाचे विश्वव्यापी संकट प्रत्येकाला पीडत आहे. त्यावर मात करण्याचे प्रयत्न निकराचे चालू आहेत, पण बेशिस्त, वैतागलेल्या नागरिकांमुळे ते असफल ठरत आहेत. भविष्याची चिंता सतावतेय, मुलांच्या पुढल्या वर्षाच्या शिक्षणाचे काय ? आज बाळ मजुरांनही काम नाही. करोनाच्या उद्रेकाने जागतिक मंदी आ वासून बसलीय. विविध क्षेत्रातील कामगारांना मोठी आर्थिक झल सोसावी लागणार आहे. जगात सर्वत्र कुपोषण, आजाराने बालमृत्युचे प्रमाण वाढण्याची शक्यताही संयुक्त राष्ट्रांच्या समुहाने आताच दिला आहे.

     सुंदर करोनाच्या प्रतिबंधित कक्षात, अतिसुरक्षेत तर स्वाती……..

     हंबरडा फोडला, धवाधव झाली, स्वाती मरण पावल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला. स्वाती करोनाची रुग्ण आहे असं समजून तिचं प्रेत प्लॅस्टिकने पॅकबंद करुन पोलिसांकडे देण्यात आलं. तिचा पण ब्लड रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता. मृत्युपश्चात रखमा एकटीच धामठोकून रडत वार्डाबाहेर आली. निरपराध जीवाची जबर शिक्षा रखमाच्या आईचं आतडं पिळवटून टाकत होते. कनकांगी तिला दिलासा देत होती, एवढ्यात दोन पोलिस एका तरुणाला घेऊन आले. तो हितेश यादव होता. आता ओळख परेड करणार कशी ? स्वाती तर मयत होती, पण कनकांगीने त्याला ओळखलं, पोलिसांनी त्याला तिथेच बेदम मारलं.

“ अरे चांडाळा, माझ्या पोरीचा जीव घेतलास रे, काय मिळालं तुला ? तू जाशील जेलमध्ये पण आमची पोर परत मिळेल का ? मनावरच्या जखमा भरुण येतील का ?” पोटविडीकीनं रखमा रडत ओरडत होती. त्यात तिला तिच्या गावचा पोलिस नामदेव चांदुरकर भेटला, त्याला हे सगळं ऐकून आणि पाहून आश्चर्य वाटले.

     रखमाने त्याच्या मदतीने स्वातीचं शव गावी नेण्यासाठी ॲम्बूलन्स मागितली, सुंदरही करोनाचा आता विलगीकरण रुग्ण होताच. डॉक्टर स्वातीचं डेथ सर्टिफिकेट आणि गाडी देण्यासाठी कुरुकुरु लागले. पाच हजाराची मागणी केली. सुंदरने कष्टाने साठवलेले पैसे डॉक्टरला दिले, प्रेत ताब्यात मिळालं.

     “ सुकांतला बोलवून घेऊ या का ?” रखमाने सुंदरला विचारलं

     “ तो दादा कसा येणार ? गाड्या बंद नाहीत का ? मोबाईल बंदी आहे इथं, चला निघू लवकर. रखमाने कनकांगीला बरोबर घेतलं.

     “ पोरी तुला तरी कोण हाय ? माझ्या घरला चल. ” 

सकाळी ५ वाजता ॲम्बूलन्स गावाच्या वेशी जवळ आली. वेशीवरुन कोणी आत येऊ नये म्हणून वेशीवर आडवे बांबू लावले होते नये ही शक्कल करोनाचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून केली होती.

     सारा गाव जमा झाला. सगळे हळहळले.

     “ गावाबाहेर झोपडी बांधलीय. तिथं रहा तुम्ही. सुंदर करोनाचा हाय ना ! अन ही कोन ?”

     “ ही बैनीची पोर हाय. इथच माझ्यासंग ऱ्हाणार हाय ”

     स्वातीच्या प्रेत संस्काराला सरपंचासह चार माणसं होती. स्वाती करोनामुळे मेली हाय त्यांचा समज पक्का झाला होता.

     सुकांतने स्वातीच्या शवाला भडाग्नि दिला. भटजी पण आला.

     सुकांत गरिबीचे चटके सोसत, दारुड्या बापाच्या राज्यात शिकून चार्टड आकऊटंट झाला होता. गावात सावकार, जमीनदार, पतसंस्था बऱ्याच होत्या. त्यामुळे ह्याने स्वता:च्या व्यवसाय सुरु केला होता. नशिबाने त्याला चांगली कमाई होत होती. सुकांतला पहाताक्षणीच कनकांगी आवडली होती, तर तिला तो. लिलगीकरणात ती गावात येऊ शकत नव्हती.

“ मी घरी जाते आपल्या आई, सुकांतला जेवणतरी करुन देईन. तुमचे डबे आणिन,” ती एका रात्री बांबूच्या खालून घरी आली.

सुकांत चकित होऊन तिच्याकडे बघतच राहिला.

     “ मी कनकांगी, स्वातीची मैत्रिण, मी अनाथ आहे, गजरे फुलं विकायला आम्ही जवळ जवळच बसत होतो. तुमच्यासाठी मी आलेय.”

     आला ते दोघंच घरात होते. लॉकडाऊनमुळे त्यालाही त्याचं काम बंद करावं लागलं होतं. स्वयपांकपाणी, केरवारे, बाजार करणं, सुकांतचे आणि रखमाने व सुंदरचे कपडे धुणं, भांडी घासणं सारं काम कनकांगी करत होती. पंधराव्या दिवशी रखमा व सुंदर घरी परतले. रखमाला कनकांगी आणि सुकांतची मनोमिलनाची गुंफण लक्षात आली.

     तसे स्वातीच्या मृत्युच्या मनावरच्या जखमा घेऊनच सर्वजण रहात होते, पण त्या कायमच्या न बुजणाऱ्या होत्या. त्याला औषधही नव्हतं.

     “ कनू, कांता या माझ्या जवळ, मला बोलायचंय तुमच्याशी.” रखमाने हळव्या स्वरात त्यानां बोलावलं.

“मी काय म्हणाते ते ऐका. काय पटलय का दोघांना सांगा, आपल्याला स्वातीचं दु:ख विसरायला एक उपाय आहे.?

“ कोणता”? दोघांनी एकदम विचारलं.

     “ मला चांगलं लक्षात आलय, तुम्ही दोघं एकमेकाच्या प्रेमात पडलाहात, तेव्हा आत तुमचं लग्न करुन टाकू, मी कामाला जाईन. शेती करु मी आणि सुंदर त्या ममईपेक्षा आपला गाव बरा, कायपरतय का ?”

     दोघेही लाजले, धार्मिकतेनुसार स्वातीच्या मृत्युनंतर वर्षभरात कार्य करणं योग्य वाटत होतं. धर्मपरायण, खेडवळ रखमाला.”

     एक गोरज मुहुर्तावर कनकांगी, सुकांतची पत्नी झाली. भजनाला आठ तर जेवायला साठ. प्रेताला कोणी आलं नाही. पण लग्नाच्या जेवणावलीला गाव हजर होता. दोघे उंबरठयावर आले. रखमाला आसवं आवरेनात, सून घरात आली. पण…..

     पण मनावरच्या जखमा तशाच ठसठसरत राहिल्या. दारुडा नवरा नारायणही मेला होता. रखमा सगळ्यातून मुक्त झाली होती. तिने दोघांनाही प्रेमाने अलिंगन दिलं. हसली, कितीतरी महिन्यांनी. 


Rate this content
Log in