akshata alias shubhada Tirodkar

Comedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy

हसा

हसा

3 mins
278


राजा कृष्णदेवराय मोठ्या मोठ्याने हसत होते पण त्याच्या या हसण्याचे कारण मात्र राजाला पडलेला मोठा प्रश्न होता खुद्द राणीच त्याच्या अश्या विचित्र हसण्याने कंटाळून बाहेर गेली होती आपल्या कक्षात जोरात जोरात राजा हसत होते आणि बाहेर पहारेकरी हि हास्याने चिंतेत पडले होते त्याचे एकमेकांशी हितगुज चालू होते हि बातमी पहारेकरी आणि राणी ह्यांनाच माहित होती तशी ती पसरली नव्हती 

"काय रे राजा वेडा बिडा झाला केवढा हसतो आहे "

"हो रे आणि राणी पण चिडून गेल्या पाहिलं ना "

"हो रे काहीतरी गडबड आहे "

"हो नक्कीच "

"पहा पहा कसा हसतो काय झालं तरी काय "

"ह्यावर उपाय फक्त एकच माणूस काढू शकतो रामा .."....

तेनाली रामा नेहमी प्रमाणे राज दरबारी जातात पण तिथे राजा न दिसल्या ने थेट त्याचा कक्ष गाठतात आणि पाहतात तर काय राजा त्याला पाहून हि हसू लागला हे राजाचे विचित्र हसणे रामा ला सहन नाही झाले रामा ला पाहून राजा हसता हसता रडू लागला हे पाहून रामा च बुचकळ्यात पडला 

त्याचे राजाशी मैत्रीचे नाते असल्याने त्याने राजाचा हात पकडला व प्रेमाने विचारपूस केली राजाने रडत रडत आणि हसत हसत बोलणे सुरु केले 

"काय सांगू रामा हा हा हा अरे सकाळी सकाळी मी आपल्या बागेत फिरून आलो तेव्हा पासून मी असाच हसत आहे मलाच कळतं नाही मी का हसतो आहे ते आणि तुला माहित आहे राणी काहीतरी गंभीर विषय मला सांगत होती आणि मी तिच्याकडे हसून हसून पाहत होतो तिचा तिला खूप राग आला आणि ती निघून गेली आता मी काय करू मी हे मुद्दामून नाही करत आहे हे तिला कसे सांगू रामा मला वाचावं माझं हसणं थांबव "

रामा आताच येतो म्हणून बाहेर गेला चेहऱ्यावर कपडा गुंडाळून त्याने बागेची पाहणी केली आणि त्याला लाफिंग गॅस ची रिकामी बाटली सापडली. 

"अच्छा म्हणजे हे कोणी मुद्दामून केलं पण चोर कसा सापडेल "

लगेच रामा महालात पोहचून राजाच्या कानावर गोष्ट घातली आणि विश्वास हि दिला कि चोर सापडला जाईल 

रामा ने महालात एक दिवंडी पेटवण्यास सांगितली कि जो कोण महलातले सेवक हे प्रश्नाचे उत्तर देईल त्याला राजा तर्फ एक लाख रुपयाचे बक्षिस देण्यात येईल प्रश्न होता "कोणी कोणाला सतत विनोद न सांगता कसे हसवू शकतो "संध्यकाळ पर्यंतची वेळ देण्यात आले उत्तर रामाला मेसेज करावे असे सांगण्यात आले आणि भर बहरून रामाला मेसेज आले पण एक सेवकाचा मेसेज काही झळकला नाही रामाने त्या सेवकाला बोलवले पण त्याने आपण हुशार नाही म्हणून सांगितले पण तो रामा होता असे काही प्रश्न त्याच्यवर पडले कि त्याने आपली चूक सांगितली तर ती एक पैज होती कि राजाला कसे वेडयासारखे हसवण्याची रामा कबुली जबाब घेई पर्यंत राजा डॉक्टर कडे जाऊन आला आता तो ठीक होता त्याने राजा राणी समोर आपली चूक मान्य केली राणी ने हि राजा ना मनापासून माफ केलं राजा ने रामा चे आभार मानत नेहमी प्रमाणे "मानलं तुला तेनाली रामा तू माझ्या सोबत अशील तर कसली संकटे आणि काय "म्हणत कौतुक केलं रामा हि खट्याळ होता त्याने राणीला पाहत राजा ला म्हण्टले "राजा हसा पण जपून हा " हे ऐकताच सगळयाना हसू फुटले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy