"हरवले(ले)ते क्षण"
"हरवले(ले)ते क्षण"


शांत शीतल आभाळ,किर्र अंधार, रात किड्यांची किरकिर,सर्व अगदी भयाण, भकास वाटत होत. आणि अश्या भयाण शांततेत विनू खोल खोल गर्तेत गुंतलेला,सर्व जग कसं त्याला भयाण वाटू लागलं. निरव शांततेत,स्वतःला सावरत विनू फोनची वाट बघत होता..
पण थांग पत्ता नाही..,फोन नाही की कुठली बातमी नाही.दूर उडून गेली होती ती त्याच्यापासून कायमची.दुसऱ्या घरट्यात स्थिरावली होती .तरीपण विनू ला आस होती.तो अक्षरशः त्या किर्र अंधारात एकटा गावकुसाबाहेर चिंचेच्या ओट्यावर तिच्या आठवणीत डोळे मिटून पडून होता....विनू तसा स्वभावाने अगदी नावाप्रमाणे विनयशील, कर्तबगार, प्रेमळ व जीवाला जीव देणारा.पण त्याच्या एका निर्णयाने त्याच संपूर्ण जीवन बदलून टाकलं.स्वतःला अपराधी समजू लागला.पशच्यातपाच्या आगीत होरपळून गेला. त्याला सर्व क्षण आठवू लागले.
रेणू आणि विनू अगदी बालमित्र! दोघांच्याही वडिलांची नोकरी एकाच गावात राहण एकाच वसाहतीत.
रेणू दिसायला सुंदर,गोरी,टपोरे डोळे ,विनू मात्र अगदी त्याउलट ,!रेखीव पण गडद छाया.ग्रहण लागलेल्या चंद्रगत तर रेणू शांत शीतल चांदण्या गत.पण चांदण्या च तेज अंधारातच अधिक खुलत.त्यावेळी दोघांचेही वय हसण्या खेळण्याचे.आणि या वयातही विणूच्या तरल नजरेने रेनुच सौंदर्य टिपलेले होत.ती त्याच्या मनात घर करून बसली .रेणू मात्र या बाबतीत अनभिज्ञ होती.
ती निरागस मनाने त्याच्यासोबत भातुकली करायची. मनसोक्त हसायची ,खेळायची.तिच्या मित्राच्या नजरेतील भाव तिला कळण्याचं वय नव्हत, म्हणून ती निरागस पणे त्याच्यासोबत असायची.तिला नव्हत माहीत की विनुसाठी ती कोण होती.
शाळा सुटली रे सुटली की सर्व मित्र मैत्रिणी वसाहतीतील पटांगणाकडे धूम पळायची.त्यात रेणू आणि विनू आवर्जून असायचे.रेणू अबाल मनाने तर विनू सुजाण नजरेने कटाक्ष टाकत असायचा.खेळता खेळता जर का कोणी त्याच्या वाटे गेला तर विनू त्याच्या अंगावर धाऊन जायचा व त्याला तंबी द्यायचा ,पुन्हा जर रेनुला हात लावल तर खबरदार!! रेणू मात्र अश्यावेळी निरागस हसून पळत जायची.ती पुन्हा दिसावी म्हणून विनू कुठलंही काम काढून तिच्या घरासमोरून सायकलने चकरा मारायचा .वयाने लहान असला तरी प्रेम नावाच्या बिजाणे त्याच्या मनात घर केलं होत.हळू हळू वय वाढू लागलं ,दोघेही सुजाण झाले.
कालांतराने दोघेही एकाच शाळेत दाखल झाले.त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.तो मनोमन खूप आनंदाला.या भावनेने की ,तो आता तिला दिवसभर पाहू शकेल,तिचा सुखद सहवास अनुभवू शकेल.शाळेचा पहिला दिवस,विनू रेणुजवल जाऊन बसला व मनसोक्त गप्पा मारू लागला.हळू हळू त्याच्या मनात घर करून बसलेल्या बीजाला अंकुर येण्यास खत पाणी इथूनच मिळेल याचा आभास त्याला होऊ लागला.ज्या सुखद क्षणाची तो चातकाप्रमाणे वाट बघत होता,ती वेळ आज आली याचा अनुभव तो घेत होता.रेणू अजूनही अंजान होती.ती मनसोक्त त्याच्या शि वावरू लागली.ते या भावनेने की,तो वसाहतीतील एक सभ्य मुलगा व अतीव जीव लावणारा वर्गमित्र या भावनेने.दिवसभर शाळेत एकत्र तरी पण त्याच मन मानत नव्हत.शाळेची घंटा होताच तो छतावर चढायचा,व रेणू जाण्याचा दिशेने वर जाऊन ती ओझार होईपर्यंत टक लाऊन तिच्या पाठमोऱ्या दिशेने बघत राहायचा.तिच्या गाजगमिनी चालीकडे बघून स्वतःला सुखद अनुभूती देत होता.
वर्ष निघून गेलं दहावी नंतर विनू एका प्रशिक्षणाला गेला.जाताना तो तिला भेटला व गहिवरला .तिला हे कोड कळेना .तो गेल्यापासून ती विचार करू लागली की अस का वागतो हा!????? .रेनुचा १२वी नंतर शिक्षक प्रशिक्षणाला नंबर लागला.व रेणू एका मुलाच्या प्रेमात पडली मात्र तो दूरचा असल्याने तो प्रशिक्षणानंतर निघून गेला..तो प्रसंग तिने सांभाळला .
एक दिवस अचानक विनू प्रशिक्षणानंतर त्याचं गावात नोकरीसाठी रुजू झाला.व पुन्हा त्याच्या आश्या पल्लवित झाल्या की आज मी हमखास रेनुला प्रीत मागेन. त्याचे रेणूंच्या घराशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्याची ये -जा वाढली.तो तिला एकांतात भेटला व तिला मिठी मारली तेवढ्याच आतुरतेने रेणू सुदधा समरस झाली.व दोघेही ढसा ढसा रडू लागले.दोघांच्याही मुक भावना व्यक्त होत होत्या. रेणुला आज कळलं होत की विनू अस का वागायचा!नकळत ती सुद्धा भारावली व त्याच्या बाहुत विसावली.दोघेही वयाने उपवर झाले होते.म्हणून विणूने रेणुका मागणी घालावी असे मनोमन बोलून दाखवलं.
प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं ही भावना दोघांनाही रुचली.पण जातीने विषम असल्याने अडचण येणार हे दोघांनाही माहित होत.कारण विणूच्या आईला ज्या जातीचा तिरस्कार होता त्याच जातीची रेणू होती.रेणूंच्या घरीही तोच प्रश्न जातीचा. विनुचा आईवर खूप जीव होता ,त्यामुळे दोन्ही कुटुंबातील संकट लक्षात घेउन दोघांनीही निर्णय घेतला की आपापल्या जातीत लग्न करायचं .
रेणुका सुंदर सुशील मुलगा मिळाला.लग्न पक्क झालं.विनुने रेणूला लगणाला समती दिली. मात्र स्वतः कासावीस झाला .त्याच्या स्वप्नातील परी कोणी रावण चोरून न्यावा असं त्याला वाटू लागलं.निर्मळ मनाने त्याने तिला मोकळं केलं मात्र त्याच्या हृदयातील स्पंदनात ठसलेली, स्वासात भरलेली,परी त्याला कासावीस करू लागली तिच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या .स्वतःला समजावत होता की , विनू तुझ्या आईच्या प्रेमापोटी, मर्यादे पोटी तू तुझ्या हिऱ्याला गमावलं....तुझ्या एका निर्णयाने तुझ्या सुखाला ,वेड्या प्रेमाला,बालपणापासून जपलेल्या तळहाताच्या फोडाला आज जखम दिलीस........सर्व आठवून विनू तिथेच झोपी गेला ....वेड्यागत आसवे ओघळत........पडून राहिला.....वेळ हातून गमावली.......समाजासाठी कुटुंबासाठी.....,!!!स्वतः झुरत पडला.