निसर्ग वेडी
निसर्ग वेडी
सुसाट वारा ,. गर्द निळ्या वणराईतून कानाला झोंबणारा पानांची सळसळ ,.वाऱ्याच्या तालावर डोलणारी डोंगरदरितील वृक्ष मृगाच्या मंद मंद सरी वातावरण अगदी मोहक,. अल्हाददायक ,.मनाला भुरळ घालणारा मातीचा मोहक सुगंध.मन बेधुंद करून टाकणारा .अश्या मनोवेधक वातावरणात मंजिरी बेभान झाली होती.वयाने जरी लहान असली तरी तिच्या बालमनाला निसर्गाने भुरळ घातली होती.तिचा जन्मच मुळी निसर्ग वनराईने दाटलेल्या एका छोट्याशा खेड्यात झाला .जन्मापासून ते आजवर ती त्याच वनराईत वाढलेली. म्हणून तिला निसर्गाचं फार वेड होत म्हणून आजच्या वातावरणात ती स्वताला हरवून बसली होती. निसर्गाने तिला भारावून सोडल आणि ती नवजात वासराणे सुसाट पळा वं तसं ती शेतावरच येणाऱ्या आईच्या दिशेने दोरीवर उड्या घेत घेत पळत सुटली. तिने आधीच विचार केला होता की आज आईजवळ मनातलं बोलूनच टाकावं. .....
.. नेहमीप्रमाणे आईं शेतावरील कामे आटोपून लगबगीने घराचा रस्ता धरला कारण वातावरण अंधारमय झालं होत.मंजुरीला आईं दिसताच तिचा पाळण्याचा वेग वाढला आई ची पावले झपझप घराच्या दिशेने आणि मंजिरीची ओढ आईच्या दिशेने! आई ज
वळ येताच ती आईला बिलांगली आईने तिचा बोट धरला व घर गाठलं .डोक्यावरील ओझ खाली उतरून चेथाऱ्यावरील पावसाची सर पुसत खाली बसली .मंजिरी कुशीत शिरून हुंदके देत रडू लागली.जणू तिच्यावर कोणी अन्याय केला होता .आईने तिला कुशीत घेतलं व कुरवाळत गोंजारत लाडिक विचारल काय झालं बाळ सांग ना!कोणी रागवल माझ्या राणीला!! तशी मंजिरी उत्तरली आई आई....मी....न...शाळेत नाही जाणार . मी शाळा नाही शिकणार!! आई म्हणाली अग अग हे काय?? का अशी बोलतेस .पण तिचा एकच सुर मला शाळा नक्को... आईने तिला दपटल . धाक दीला तशी ती हिरमुसली व खाली तरटपत्ती टाकून पुस्तक घेऊन बसली.परंतु निसर्गाने तिला वेडावून सोडलं होत. तिला निसर्गाचे वेड लागले होते.मातीचा सुगंध. घोंगवणाऱ्या वाऱ्याचा आवाज तिला मधुर वाद्यावृद वाटत होत.पानांची सळसळ.पावसाच्या थेंबाची टिप टिप . सरींची रीप रिप . ढगांचा गडगडाट .या सर्वात ती मधुर सुरेल गीतांची मैफिल शोधत होती अनुभवत होती. आणि जगण्याचा खरा आनंद म्हणजे निसर्ग आणि निसर्ग .....पुस्तक बाजूला आणि मंजिरी डोळे मिटून पहिल्या पावसाच्या वातावरणात शांत झोपी गेली होती.....