हा खेळ संघर्षाचा
हा खेळ संघर्षाचा
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही घटना अशा घडतात की ज्याने माणूस खचून जातो. जगणे कठीण वाटू लागते. नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा काही जणांची मदत, आधार आपल्या उपयोगाला येते. काही नाती अशी असतात जे वेळोवेळी आपल्याला उपयोगी पडतात. जीवन हे एक संघर्षच आहे फक्त जिद्द असावी लागते.
ही कथा आहे चार मित्रांची. ते चौघे जिवाभावाचे मित्र असतात. दिनेश, आशिष, रवी, विजय अशी त्यांची नावे असतात. त्या चारही जणांना फिरण्याची, खेळण्याची खूप आवड असते.
असेच एकदा चारही मित्र एकदा ट्रेकिंग साठी एका ठिकाणी जातात. तिकडे ते भरपूर फिरतात. एक लहान मुलगी तिकडे पायाची बाटली विकत असते. विजय ती बाटली विकत घेतो त्या मुलीची चौकशी करतो. तेव्हा कळत त्याला इथे पाण्याची कमतरता आहे. तिला रोजच्या जेवणासाठी इतका संघर्ष करावा लागतो याची जाणीव चारही मित्रांना झाली. त्यांनी त्या मुलीकडून मुद्दामपणे पाण्याच्या दहा बाटल्या विकत घेतल्या. ते चारही मित्र निसर्गात भरपूर फिरले. पण मनातून त्या पाण्याचा विषय काही जात नव्हता.
काही दिवसाने सगळेजण आपल्या कामात एवढे वस्त होऊन जातात की त्याच्या संवाद, भेटणे बंद झालेले असते. अचानक एके दिवशी आशिषचा अपघात होतो. त्यात त्याचे दोन्ही पाय मोडतात आणि तो अपंग होतो. आता त्याला जगणे नाहीसे होते कारण भटकंती म्हणजे त्याचा जीव की प्राण छंद. आशिषच्या मनात अनेकदा आत्महत्ता विषय घोळ घालू लागतो. त्याचे खाणे पिणे कमी झाले. हसणे बंद झाले. आशिष ला फक्त आई होती वडील काही वर्षांपूर्वी वारलेले होते. आता मात्र आशिषच्या आईला काळजी वाटून राहिली होती. आईने सर्व घटना त्याच्या मित्रांना सांगितली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कॅरम चा आवाज येऊ लागला होता. आशिष अंथरुणातून उठतो आणि पाहतो तर काय त्याचे जिवाभावाचे तीन मित्र कॅरम खेळत होते. ते पाहून आशिष ढसाधसा रडला. तेव्हा रवी म्हणाला आपल्याला जरी बाहेर जाता नाही आले तर काय झाले घरात बसूनही खेळू शकतोच की. दिनेश म्हणतो आपला आनंद वस्तूं वर नसावा तो आपल्या मनात असावा. कुठलीही छोटी गोष्टी आनंद देऊन जाते. विजय म्हणतो माझ्या काकाला तर अर्धांगवायू चा झटका आला होता. सारखे झोपून असतात. त्यांना तर काहीच हालचाल करता येत नाही. घराच्या छताकडे सतत बघत असतात. तू तर छान हसतोस, जेवतोस आणि कशाला एवढी काळजी. आपण एकदा फिरायला फिरायला गेलो होतो. तिथे एक मुलगी पाणी विकत होती. कितीतरी लांबून ती आणत असावी. तिने कधी हार मानली नव्हती. एकदा जिद्द, चिकाटी ठेवली ना यश नक्की मिळेल. आशिष आनंदाने रडू लागतो.आशिष म्हणतो बरोबर आहे आता यापुढे जे अपंग किंवा गरीब आहेत अशा लोकांसाठी मी काम करेल. सर्व मित्र म्हणतात आता आपल्या युवा पिढीला पुढे येऊन हे काम करावे लागेल. आपण ग्रुप तयार करू आणि जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाही अशा लोकांना मदत करू. म्हणतात ना युवा पिढी राष्ट्र घडवू उद्याचे.
आशिषच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसगाने तो एवढा बदलतो की त्याला समाजकार्य करण्यात त्याला आनंद वाटू लागतो.जीवनात काही घटना घडतात त्यातून आयुष्य बदलते पण हार न मानता ते स्विकारावे. आनंद हा कशातूनही मिळू शकतो. फक्त बगण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.
