मास्क
मास्क
ही कथा आहे एका कलाकारची ज्याची संपत्ती भरपूर आहे परुंतु एकटेपण त्याला छळत असते. त्यातून तो आनंद राहण्याचा मार्ग शोधत असतो.
एक सेलिब्रिटी असतो. तो एक गायक आणि नृत्य करणारा कलाकार असतो. त्याचे नाव विजयकुमार असते.
तो त्याच्या जीवनामध्ये मध्ये एवढा व्यस्त असतो. तो एकटा राहत असतो. फॅमिली नसते.त्याला गप्पा मारायला, फिरायला जायला वेळ मिळत नसतो आणि त्याला एकटे फिरता येत नाही. तो एवढा एकटा पडलेला असतो. त्याला नैराश्य आलेलं असतं. संपत्ती भरपूर असते,पण एकटा राहत असतो. एकदा सहज कारच्या खिडकीतून दिसते की,एक भिकारी लहान मुलगा सायकलच्या टायरसोबत हसत खेळताना दिसतो. ते पाहून तो खुश होतो पण लगेच त्याला कळत आपण सेलिब्रिटी आहोत.
काही दिवसाने तो आपल्या जुन्या पेटीतील जुन्या वस्तू बाहेर काढू लागतो. त्यात त्याला त्यात एक कार्टून मास्क आणि काही जोकर टोप्या सापडतात आणि त्याला आठवते लहानपणी वडिलांनी आणले होते बर्थडेसाठी. तो गालात हसतो. जुन्या आठवणीत रमू लागतो. त्याचे डोळे भरून येतात.
त्याला अचानक फोन येतो आणि बोलतो. त्याला एक असिस्टंट कॉल करतो. तो मुलाच्या बर्थडे साठी घरी यायला आमंत्रण देतो. विजयकुमार नाही म्हणतो पण त्याच्या मुलाला शुभेच्छा देतो आणि सांगतो मी तुला गिफ्ट देतो. असिस्टंट नाही म्हणतो आणि आभार मानतो.
त्याला अचानक मास्क आणि टोपी आठवते. आणि तो बर्थडेला जायचे ठरवतो पण तो ते मास्क घालून बसतो. काही मुले त्याला हात मिळवतात, मजा मस्ती करतात,काही लहान मुले त्याच्यासोबत मस्ती करतात पण तो मास्क काढत नाही. विजयकुमार सर्व लहान मुलांना चॉकलेट देतो.
तो त्याच्या असिस्टंट चे आभार मानतो आणि सांगतो आज मी सेलिब्रिटी नसून सामान्य माणूस आहे आणि आजचा आनंद पैसा, प्रसिद्धी, पेक्षा अधिक होता.
विजयकुमार ने बर्थडे साठी येणे स्विकारलेलं असतं .पण विजयकुमारची एक अट असते.माझी खरी ओळख सांगायची नाही असे सांगितलेले असते.
त्या माणसाला ओळख लपवून लहान मुलांसोबत आनंदी क्षण घालवण्यासाठी एक कारण सापडते ते म्हणजे कुणाचाही बर्थडे असला कि मास्क घालून जाणे आणि मजेत वेळ घालवणे. अशा प्रकारे त्याने जीवनात आनंद राहण्याचा मार्ग शोधला.
काही व्यक्तींना एवढी फिरण्याची, मजा करण्याची, माणसांत वेळ घालवणाची आवड असते पण प्रसिद्धीमुळे बहुधा शक्य होत नाही. काहीजण आनंद घालावायला काहीतरी कारण, जागा, वेळ, माणसं शोधत असतात.
