गझल-माणसे
गझल-माणसे


माणसे :
जनावरापरी जगात, वागतात माणसे.
तरी कशी घरात सांग, नांदतात माणसे ?
मना मनात काजळी, मुखात बोल लाघवी.
क्षणोक्षणी सदाकदाच, भांडतात माणसे.
सुखात साथ द्यायला, न लागती निमंत्रणे.
उगाच संकटात हीच, पांगतात माणसे ?
कधी कधी प्रकोप माजतो, असा चराचरी.
पणास प्राणही खुशाल, लावतात माणसे.
सदाकदा जळीस्थळी, समानता उगाळती.
नको तिथेच जात धर्म, आणतात माणसे.
मुलास जन्म देवुनी, जगात माय आणते.
तरी कशी भ्रुणात लेक, मारतात माणसे ?
नसेल खायला जरी, दुजास घास भरविती.
उदार धर्म राखण्यास, जागतात माणसे.