The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

sneha salunke

Tragedy

3  

sneha salunke

Tragedy

धुमसणारा ज्वालामुखी!

धुमसणारा ज्वालामुखी!

3 mins
519


 ही कथा आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. जिथे आईवडील आणि चार मुली जिव्हाळ्याने एकत्र रहात असतात. जाई, मीना, मेघा, रूपा. आईवडीलानी मुलींना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिलेले असतात. सगळ्यांचे लाडके नांना,नानी.! जाईचे लग्न होते आणि इथेच या कुटुंबाला ग्रहण लागते.नाव मोठे आणि लक्षण खोटे असे जाईला सासर मिळते. जावई उच्च शिक्षित , श्रीमंत पण कारस्थानी असतो.

सेवानिवृत्तीनंतर कार्यालयाच्या भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या घरात नाना नानी स्थलांतर करणार असतात.एव्हाना जाईला मुलगा झालेला असतो.पण तो अपंग असतो.नाना नानी आजी आजोबांच्या ममतेने त्याला सांभाळत असतात. नानांना बऱ्या पैकी रोख रक्कम मिळालेली असते. जाईचा नवरा नाना नानीला स्वतःच्या बंगल्याच्या आवारात घर बांधून देण्याचं आश्वासन देतो. नाना बुद्धिमान असतात. त्यांना कायद्याचं सखोल ज्ञान असतं. त्यामुळे कागदोपत्री सर्व व्यवहार करून नाना नानी जाईकडे राहायला जातात.बंगल्याच्मा आवारात अतिथीगृह,मोकळी जागा असते.नाना नानी तिथे छान झाडं लावून त्यांची निगा राखत असतात.अपंग नातवाला सांभाळत असतात. नानी रूचकर स्वैपाक करून पाहुण्यांची उठबस करत असते. दिवस पटापट जात असतात.पण यांना घर मिळण्याची काही चिन्हं दिसत नाहीत.नानांचा जावयाच्या पाठी लकडा सुरू होतो.पण जावई पक्का बेरका.ताकास तूर लागू देत नाही.नानांकडे असलेल्या रोखरकमेचा अपव्यय होत असतो.सेवानिवृत्तीनंतर सुध्दा नाना खाजगी रुग्णालयात नोकरी करत असतात आणि नानी जावयाच्या घरात नोकरासारखी राबत असते आणि एक दिवस दु:खाचा प्रसंग कोसळतो.अल्पशा आजाराने जाईचा मृत्यू होतो.जाईच्या आकस्मिक निधनानंतर नाना नानी खचतात. नाना जावयाशी हक्काच्या जागेसाठी भांडतच असतात.आपण आपल्याच जावयाकडून फसले गेलो याची त्यांना चीड असते. नाना नानी मनस्वी आणि स्वाभीमानी असतात. भावनेच्या भरात जावयावर विश्र्वास टाकण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला असतो याची त्यांना खंत असते. दिवसेंदिवस त्यांची ताकद क्षीण होत जाते आणि यातच नानांना हृदयविकार होतो. घर घर करतच नाना मृत्यू पावतात. नांनी ला वृध्दाश्रमात ठेवण्यात येतं. तिथे नानीचे खूप हाल होतात. तेव्हा रुपा बंड करून उठते आणि जाईच्या नवर्याला थडा शिकवायचं ठरवते. नानांकडे असलेल्या कागदपत्रांचा आधार घेऊन ती जाईच्या नवर्याला कायदेशीर पत्र पाठवते.

पत्रात सविस्तर वर्णन केलेलं असतं. पत्र वाचल्यावर जाईचा नवरा घाबरतो आणि धावतपळत मेघा, मीनाकडे जातो.पण रूपाने निश्चयच केलेला असतो. आता ती मागे हटणार नसते.पाऊस कोसळत असतो तरीही न घाबरता रुपा वृध्दांश्रमांत जाते.रस्त्यांत रिक्क्षावाल्याला कुठे जायचं आहे सांगायला विसरते एवढ्या विमनस्क अवस्थेत ती असते. कारण आता तिला स्व:ताच्याच माणसांविरूध्द लढा द्य़ायचा असतो. वृध्दाश्रमासमोर रिक्क्षा थांबल्यावर ती आश्र्चर्य चकित होऊन रिक्क्षावाल्याला विचारते ,तुम्हांला कसे कळले मला कुठे जायचं आहे? मी तर नव्हते सांगितले .रिक्क्षावाला हसून म्हणतो ताई मला माहित होते तुम्हांला कुठे जायचं आहे.ती चमकून त्या रिक्क्षावाल्याकडे बघते.तेव्हा तिला दोन मिनिटांकरता त्या वृध्द रिक्क्षावाल्यामध्ये नानांचा चेहरा दिसतो.रूपा आईला भेटून पत्र वाचून दाखवते. त्या पत्रावरून हात फिरवून नानी म्हणते, नाना हुशार होते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागतात.रूपाला गलबलून येते.नाना,नानीला मी न्याय मिळवून देणारच असे ठरवून ती लढायला सज्ज होते.याच दरम्यान नानी मृत्यू पावते. नानीच्या मरणानंतर स्व:ताला सावरत साम,दाम, दंड, भेद वापरून नाना नानीला मरणोत्तर न्याय मिळवून देते आणि त्यांच्या नावाने वृध्दाश्रम बांधून त्यांची जीवनगाथा सर्वांसमोर वाचते. मनात धुमसणार्या रागाला अशाप्रकारे ती वाट मोकळी करुन देते.


Rate this content
Log in

More marathi story from sneha salunke

Similar marathi story from Tragedy