Prakash Chavhan

Tragedy

3  

Prakash Chavhan

Tragedy

दादाचं एकतेचं बीज

दादाचं एकतेचं बीज

2 mins
217


सकाळी पक्षाचं चिवचिवाट होतं, दिवस निघालं होत जवळपास आठ वाजले होतें, आम्ही मुले नेहमीप्रमाणे दादांजवळ चिंच व लिंबाचा झाडाखाली जमा झालो होतो तशातच दादाला पोस्टमनचं निरोप मिळालं की एमपीएससीचं रिझल्टच पत्र आलं आहे तर गांधारीला येऊन सही करून घेऊन जावावं, दादाला पण माहीतच होतं,त्यावेळेस दादाचं चेहेरा शांत, संयमी दिसत होतं पण आम्हा सर्वांनाच एक आपुलकी लागली होती की दादा लवकर लागावं व त्यांच्या मार्गदर्शनान आपल्यातला एक एक लागत चालावं, तेवढ्यात दादांनी आसाराम काकाला सांगितलं की गांधारीला पत्र घायला जायचं म्हणून आधी जेवण करून जाऊ,आम्हीपण पाच सात जण तयार होतो दादासोबत जायाला, अन जेवण उरकून लगेच निघालो होतो, दादासोबत चालता चालता, आसाराम काका, संजय काका, भीमराव, ज्ञानेश्वर दादाचं गप्पा चालू होत्या, आणि आम्ही इतर लहान मुलं ऐकत त्यांच्या सोबत चालत होतो, दादा म्हणत होतें एकदा नोकरीं लागली की आपण सर्वांनी मिळून गावासाठी खुप मोठी चांगली कामे करायची आहेत, तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करा, काही अभ्यासात अडचणी आल्या तर मला सांगा, माझं रिझल्ट चांगल लागेलच पण स्पर्धा भरपूर आहे, आता नाहीतर पुढे मी नक्कीच लागेन, त्याच वर्षी आसाराम काका, संजय काका, ज्ञानेश्वर मास्तर, भीमराव दादाच 12 वीच वर्ष चालू होतं, सुभाष फोजी काका सर्वात अगोदर लागले होतें तेही त्याला दादाच्या मार्गदर्शनान शक्य झालं, दादा बोलता बोलता आम्ही गांधारीला आलो होतो अन पोस्टमन काका पण घरीच होतें आणि ते दादाला बघताच म्हणाले पत्र काढत ' या बसा, मला बघुदे सखाराम तुझ रिझल्ट, दादांनी हळूच पत्र फोडलं अन बघताच सौम्य स्मित चेहऱ्यावर दादाचं हास्य बघून आम्हला जास्त आनंद झाला होता पण दादांनी आमच्याकडे बघून म्हणाले जास्त खुश होऊ नका, मला खरेच चांगले मार्क मिळाले असले तरी शेवटी खूप स्पर्धा आहे, अजून मला खुप काही संघर्ष करावेच लागेल असं दिसत, 'आसाराम' तुम्ही जिद्दीने पेटा 12वी त चांगले मार्क मिळून ज्ञानेश्वर तुम्ही शिक्षक पदावर संजय लागलेच पाहिजे, दादा असं म्हणता म्हणता आम्ही वापस फिरलो होतो अन तळ्याच्या पाळू वर येऊन समोर झाडाच्या सावलीत बसून पुढे कुणी काय करायच, आणि आपले ध्येय कसे साकार करायचे या विषयी दादा आम्हा सर्वांन सोबत चर्चा करत होतें........ अन एकतेचं बीज आमच्या मनात रोवत होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy