भूक
भूक
पहाटेच्या देवळाच्या घंटेचा आवाजाने गण्या उठलाच.
अशी तब्बल तीन चार तास पण मुश्किल होतं झोप मिळणं.. लहानगी चार वर्षाची झाली होती सुमनं. आईच्या बिगर वाढविणं जोखमीच काम..
गण्याना सुगंधाच्या बाळंतपणात खुप खर्च केला तिला वाचविण्याचा. पण सारे कष्ट पैसे वायाच गेले.. त्याचा लहान भाऊ दहा वर्षांचा होता. आई गेल्यानंतर त्याला ही सुगंधाने आपल्या पोटाच्या पोरा सारखंच सांभाळलं होतं. सुगंधाच्या गरोदरपणात त्याच्या ही जीवाचे खुप हाल झाले होते. गण्या त्याला टाकून कामावर जाई त्यावेळी सुगंधा आधी त्याला जेवायला वाढी. खायला काही मिळत नसे अशा वेळी ती उपाशी राहून त्याला आधी जे असेल भरवी. खरी तिला पौष्टिक अन्नाची गरज होती.
दिवस जात होते. दिवसेंदिवस सुगंधाची तब्येत खराबच होत चालली होती. तरी त्या अवस्थेत ती भांडी घासण्यासाठी जात होती. कारण तिथे गेल्यावर तिथल्या मालकीणबाई उरलं सुरलं अन्न तिला देत. ते घेऊन ती घरी येई. थोडसं खाल्ल तर निदान बाळाला अन्न मिळेल... पण नशिबाचा खेळ अजून वेगळाच मांडलेला होता..
एक दिवस ती गण्या आपापल्या कामावर सोम्याला टाकून गेल्यावर अचानक जोरात पावसाला सुरूवात झाली. वारा देखील सुटला होता.. सोम्या घरात एकटाच होता. पण हातातलं काम टाकून गेली तर दुपारचं जेवणातलं उरलं सुरलं अन्न देखील खायला मिळणार नाही. म्हणून हळूहळू काम होत नव्हत तरी करत राहिली. मालकिणबाईंनी पण पावसाची कुठे जाते म्हणून थांबवलं. शेवटी निघते मी म्हणत दिलेलंअन्न पिशवित घालून सोम्या एकटाच हाय न्हवं म्हणतं बाहेर पडली. पावसाचा जोर वाढलाच होता... घराकडे जाताजाता देखील दिलेलं अन्न पदराखाली झाकत होती भिजू नये म्हणून.
तिच्या झोपडीच्या दिशेने गर्दी जमा झाली होती. आरडाओरडा ऐकू येत होता. पुढे आल्यावर सगळेच तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघू लागले. इतक्यात कुणीतरी तिला थांबवलं..
शेजारच्याच झोपडीतील निर्मला तिला बिलगून रडू लागली. आकांत करत सांगू लागली. विज पडून झोपडीला आग लागली. त्यात सोम्याचा भाजून मृत्यू झाला होता.. त्याला बाहेर आणल्यावर बघवत नव्हतं...
हातातली अन्नाची पिशवी दाखवत अपराध्यासारखं ओरडू लागली. बघ तुला जेवायला आणलयं. दोघ बी बसून जेऊ. उठ की रं...
गण्या ही काम संपवून आला होता. त्याने तर ते दृश्य पाहून हंबरडाच फोडला. डोक्यावर हात मारुन घेऊ लागला.. भूकेपायी जात होतो रे. अन्नाचा बंदोबस्त कराया. तू भूकेलाच सोबत घेऊन गेलास की रं.
ईकडे सुगंधाची ही तब्येत बिघडली.. शेवटी तिला आधी दवाखान्यात घेऊन भरती केली. तिच्या वेदना वाढत गेल्या. डॉक्टरांनी प्रयत्न करुन सुगंधाला वाचवायला त्यांना यश आलं नाही... छोट्या बाळाला गण्याच्या हातात दिलं आणि सुगंधाला वाचवता आलं नाही या बद्दल खंत व्यक्त केली. सुगंधा डोळे भरून लेकीला न बघताच निघून गेली होती. गण्याला नविन झालेल्या बाळाचा आनंद ही घेता आला नव्हता... शिवाय कर्ज झालं होतं डोक्यावर सावकाराचं.. मागील वर्षी पाउस जास्त पडला. पिकाची नासाडी झाली होती... कसंबस सुमनला वाढवतं स्वतःची भूक मारुन एक वेळ जेउन लेकीसाठी भूकेची व्यवस्था करण्यात त्याची जी मिळेल ती कमाई जात होती....
आज परत सुमनला घेउन काही काम मिळतं का ते बघायला आला होता... मजूरीचं बांधकामाचं काम होतं मिळालेलं.. पण सुमनला कुठं ठेवावं. हा प्रश्न होता.. शेवटी त्याने तिला देवळाच्या पायरीवर बसवून ईथून कुठे जायचं नाही निक्षून सांगीतलं... दोन तासाच काम.. शंभर रुपये मिळणार म्हणून गण्याने होकार दिला होता.. शिवाय झोपडीची डागडुजी होतीच. पाणी गळत होते. ताडपत्री लावायला हवी होती....
दोन तासांच काम आटोपून झाल्यावर देवळापाशी गण्या आल्यावर त्याच्या लक्षात आलं की सुमनला जिथे सोडलं होतं तिथे ती नव्हतीच.. सगळीकडे शोधून हाका मारुन बघितल्या. सुमन नव्हतीच... पुजाऱ्याला विचारल्यावर त्याने बराच वेळ कोणी ईथे दिसलं नाही असं उत्तर दिलं.
गण्या रडकुंडीला आला.
सकाळपासून शोधत शोधत आता संध्याकाळ झाली होती. गण्याने बागा रेल्वेस्थानकावर शाळेच्या आवारात मुलं खेळत होती तिथे ही बघीतलं. हाका मारल्या. पण काहीच उपयोग झाला नाही... कुणीतरी एक मयत झालं लहान मुलीचं रस्त्यात बोलत उभी होती. गण्या धावत गेला विचारपूस केल्यावर कळलं एक मृतदेह आताच स्मशानात अग्नी देण्यासाठी नेला...
कोण कुठली कोणाची कसलं भान न रहावून गण्या स्मशानाच्या दिशेने गेला.
लोकांची गर्दी. वेगवेगळे जमाव. आपली सुमन यात कशी असेल... गण्याच्या डोळ्यात अश्रू होते. ईकडेतिकडे बघत असतानात्याच लक्ष एके ठिकाणी पिंड ठेवलेला होता तिथे गेलं. पाठमोरी सुमन उभी होती. लांबून समोरच्या दिशेला जाऊन बघीतलं.. सगळे केस कपाळावर आलेले. तोंड मातीने माखलेले. दिवसभरात भटकून कपडेपण मळलेले. आणि त्याच मातीच्या हाताने ते पिंड कावळ्याला ठेवलेले ते ती खात होती. डोळे आसवांनी भरलेले.. गण्याने धावत जाऊन सुमनला मिठीच मारली.. पोरीला भूक होती अन्ना ची. अन गण्याला भूक होती लेकीची तिच्या मायेची...
गण्याने जमावाला विचारलं कोण गेलं.. तरुण होता बाप्या किडनी खराब झाली त्याची म्हणून दवाखान्यात दाखल करायच्या आतचं गेला...
गण्याच्या मुठी आवळल्या गेल्या...
चेहरा ही ताठ झाला काहीतरी गवसल्याचा आनंद झाला होता. त्याने घर गाठलं... निर्मला कडे सुमनला देऊन दोन दिवस सांभाळ जरा जाऊन येतो म्हणून तडक दवाखान्यात आला. डॉक्टर ना सांगीतलं आपली परिस्थिती... मी एक किडनी गरजवंताला द्यायला आलोय... मला नड भूकेची लेकीच्या आनि माझ्या. कोण हाय तर बघा. माझी बी नड भागेल. एक जण त्रासात होताच त्याच आॅपरेशन करायचच होतं.. गण्याने फॉरम वर अंगठा लावला.. आपली एक किडणी त्याला देऊन त्याचे प्राण वाचवले. आणि त्याची ही भूकेची नड भागली होती. जळालेल्या झोपडीला परत उभी करायची होती. लेकीला शाळेत घालायची होती. हा आनंद चेहेरऱ्यावर घेउन तो घरी आला होता. कोणालातरी जीवनदान मिळालं होतं याचा आनंद ही होता..तो आनंद त्याला सुखासमाधानाचे जगू देणारा होता.. एका भूकेचा प्रवास संपला होता.
