Pranali Salve

Tragedy

2  

Pranali Salve

Tragedy

भाग २ - तिचं ते कटू सत्य...

भाग २ - तिचं ते कटू सत्य...

3 mins
266


तिची काय चुक ना...? प्रश्न जेवढा साधा.. गांभीर्य तेवढंच उत्तराचं. बालपण असचं हिरमुसण्यात गेलं. तेव्हाच प्रेम हा प्रकार नव्हताच आणि काही झालं की राग काढण्याचं साधन म्हणजे मी. हाच प्रकार पुढे त्यांच्या सोबत माझ्याही अंगलट आला. कारण चुक तर माझीच नाही का? त्या नरधमाने जे काही केलं त्यात सुध्धा चुक माझीच, कारण मी वयात आली नसतानाही त्याला माझं शरीर खुणावत होत... त्याला तर बायको होती हो ती पण लग्नाची.  असो.... पुढे अशी बरीच प्रसंग आली त्यावेळी सुध्धा चुक माझीच नाही का...? कारण एकदा माणसाला लागलेली चटक जाते कुठे लवकर. खरं म्हणजे चुक कोणाची आहे हेच शोधता शोधता... जगण्याची इच्छा मरून गेली होती. फारसा काही रस नव्हताच आयुष्यात आणि सहजासहजी विसरण्या इतपत चुका नव्हत्याच म्हणा... पण चालायचं म्हणुन पुढे निघायचं.

मी बोलली ना मागे की प्रेमात पडली होती मी त्याच्या. हो ते माझं पहिलं प्रेम. कदाचित त्याला माहीत नाही तेव्हापासूनच होतं ते. अजूनही मला त्याची की काळजाला भिडणारी नजर आठवते. मारलेल्या गप्पा, थोडाफार सोबत घालवलेला वेळ, मस्ती, रुसवे फुगवे, हसणं, खिदाळणं. एकंदरीत खुश होती मी आणि हवाहवासा होता त्याचा सहवास पण फक्त मित्र म्हणून कारण मैत्री गमवायची नव्हती मला प्रेमाच्या नादात. आणि तसचं झालं. तिथे पण चुक माझीच ना..? मी प्रेमात पडली, दुसरी कडून कळु नये आणि मैत्री संपु नये म्हणूनच मीच कबुल झाली तर काय तुटली मैत्री. त्यानं समजुन घ्यायचा प्रयत्न सुध्धा नाही केला आणि तो करणारही नव्हता कारण चुक माझी.

असच पुढे काही दिवस गेले आणि पुन्हा प्रेमात पडली त्यात सुध्धा चुक माझीच. तो बिचारा निष्पाप, एकनिष्ठेने राहिला माझ्या सोबत आणि मी काय केलं तर त्याला समाधानी नाही ठेवू शकले म्हणून त्या बिचाऱ्याचं लक्ष्य पांगलं. होय तिथे सुध्धा चुक माझीच होती. कारण मला जमतं नव्हतं त्याला भेटायला, त्याच्या सोबत बोलायला, मी कामा मधे खुपचं गुंतली होती आणि त्याला हवी तशी मी नव्हती राहत. आता इथे प्रॉब्लेम असा होता की घरची परिस्थिती बेताचीच म्हणून मी कधी कुठल्याही प्रकारचा हट्ट केलाच नाही तरी सुध्दा उलट बोलणी खायची नखरे खुप असतात म्हणून. साधं पार्लर नाही, मेकपच काही समान नाही, कपडे नाही फारसे. स्वतः कमवत असताना सुध्धा हीच परिस्थिती. म्हणून तो समाधानी नव्हता आणि जिथे तो समधनी नसतो तिकडे तो राहत नाही. तरी सुध्दा त्यानं लग्नासाठी प्रयत्न केले हो आमच्या... किती कौतुकास्पद. आभार मानावे अश्या मुलाचे नाही का..? कारण चुक माझी होती ना. समजदार पणा माझ्याकडे कमी होता त्यात मला पुरुषांचा तिरस्कार, मी शिव्या खुप देते आणि आपला समाज कुठे स्वीकार करतो अश्या शिव्या वैगेरे देणाऱ्या मुलीला. मुलांचं काय... १० ठिकाणी तोंड मारू किंवा लाखो शिव्या देऊ... अरे पण तो मुलगा नाही का.? त्याचा तो हक्कचं ना. मग शिवीगाळ असो वा मुलीनं मागे फिरणं असावं. पण मुलगी सुसंस्कारित पाहिजे, खाली मान घालून ऐकणारी कारण चुक माझीच नाही का? हो... हो.... हो... हो चुक माझीच. मी त्या दुष्ट काकाला अडवण्यात असफल झाले, त्या प्रत्येक प्रसंगावर मात करण्या ऐवजी सहन करत राहिली. प्रेम तर केलं होतं ना फक्त.? पण मैत्री हवी होती सांगुन चुकले मी... आणि नंतर आलं समाधान.... समजुन घेण्यापेक्षा समाधान महत्त्वाचं. खरंच मीच चुकले सगळीकडे... समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy