तिचं कटू सत्य ते
तिचं कटू सत्य ते
"नको... नाही...
नाही... नाही....
सोडा मला... नको... नाही.... असंच म्हणतं राहfली मी अन् तो नराधम थांबलाच नाही अगदी शेवटपर्यंत"....
काही गोष्टी शब्दांमधे मांडायच्या म्हणलं, की नाजूक असतात आणि समजुन घेणे म्हणजे कठीण होऊन जातं. तर मग झालं असं, की मी होते १० ते १२ वर्षाची, साधारण मुलीचं वाढतंच वय आणि वाढत्या वयातल वाढतं शरिर. माझ्या मावशीचा नवरा म्हणजे काका माझा, त्याची नजर फिरली १२ वर्षाची मला बघुन मग पुढची ४ वर्ष त्यानं नको नको ते माझ्यबरोबर केलं कारण बायको कमी पडलेली त्या नरधमाला आणि मी बिचारी सगळं हे काय होतंय माहीतच नाही, कोणी कधी काही बोललेल नाही, बस सहन करत राहिली. तोंड दाबून रडतच राहिली आणि पुढची काही वर्ष तोंड दाबून रडण्यातच गेली. कोणाला काय सांगावं माहीत नाही, कसं बोलावं माहीत नाही, कळलं तर सगळीच नाती खराब, नाव सुध्दा खराब आणि असा बराच निकामी विचार करत करत वाढली.म मग पुढे शिक्षणामुळे अशे बरेच अनुभव आले पण मग हिम्मत करून सामोरं जायला शिकली अस सगळं करत शाळा झाली, कॉलेज झालं, घर सोडलं, आयुष्य जगायला लागली पण मधे मधे हुकी यायचीच. या सगळ्या गोष्टींमुळे विश्वास मात्र नव्हता उरला कोणावरच अगदी सख्या नात्यांवर सुध्धा नाही. पुढे मैत्रीमधे पण जवळपास सारखाच अनुभव. मग तर अजूनच खचून गेली होती आणि अजूनच गुढ विश्वास बसायला लागला की सगळे पुरुष एका माळेचे मणी, प्रत्येकाला एक स्त्री म्हणली की एकच गोष्ट, दुसरं काही सुचणार नाही.
पुढे झालं असं की मीचं प्रेमात पडली. सुरवातीला विश्र्वासच बसेना पण कदाचित तो खुपच चांगला होता म्हणजे स्वप्नातला राजकुमार जसा, माझं होत प्रेम त्याच्यावर पण त्याच नाही. मित्र म्हणून खूप आवडायचा मला आणि त्याला ही मी मैत्रीण म्हणुनच हवी होती. पण त्याला हे कळलं आणि आमचं नातं सुरू होण्या आधीच संपलं. मग करिअरकडे वळली पण ह्या सगळ्या मध्ये काय घडलं, की जवळपास मला ७ वर्ष घराबाहेर राहून झालेली आणि मला वाटायचं किंवा मला जाणीव करून दिली जायची कुणास ठाऊक, पण प्रेम काही घरून भेटलं नाही ना कुठल्या गोष्टींचा आधार. त्यांना फक्त असं वाटायचं की पैसे पुरवावे बाकी तू कशी आहेस हे आजपर्यंत कान तरसतात माझे ऐकायला. मग पुन्हा करिअरच्या मागे पळणं सुरू असताना ना जाणे कोण कुठून पुन्हा एक राजकुमार आला, खूप अतुट प्रेम असं काही नव्हत बर का.. पण पहिल्यांदा त्या दुष्ट काकाची फितरत कोणाला तरी सांगायची हिम्मत झाली आणि तो काही दिवसांतच जवळचा वाटू लागला. मी पुन्हा एकदा प्रेमात पडायला लागली होती. मी पुन्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि पुन्हा सगळ्या स्वप्नांनी बहरायला सुरुवात केली. खुप दिवसांनी आज पहिल्यांदा जाणीव झाली की पुरुषांचा तेवढाच तिरस्कार आहे मला, जेवढा अगोदर होता आणि राग सुध्धा. कारण ही तशीच होती आणि झालंय असं की, बराचसा भुसा गोनी मधे दाबून दाबून भरतो तसं भरल्या सारखं झालंय माझ्या मनात सगळं आणि ते बाहेर निघालच नाही कधी. तो तिरस्कार किंवा राग म्हणा येणारच प्रेमात, शेवटी तो ही एक पुरुषच. पुन्हा कधी मी प्रेमळ आणि शांत होईल ह्या बद्दल विचार असतोच पण मग आमच्या नात्यात माझं प्रेम तर आहेच आणि आमची भांडण तर होतच असतात. कळत नकळत खूप काही बोलल्या जात माझ्याकडून
आणि भांड्याला भांडं वाजाव तसं होऊन जातं. बऱ्याच वेळी ते नातं त्या दोन लोकांना नकोशी वाटू लागतं पण ते माघार घेत नाही तरीही प्रयत्न करतं नातं सावरत राहतात. माझ्या मनातला तिरस्कार कोण जाणे केव्हा निघेन पण म्हणून नात तुटत नाही आणि तुटणार सुध्धा नाही कारण प्रेम खुप आहे आणि एकमेकाना दिला जाणारा वेळ खूप कमी त्यामुळे भांडणं किंवा गैरसमज हा प्रकार घडणारच आणि ते साहजिकच आहे.
त्यात मधल्या काही काळात काही कारणांमुळे तो ही चुकला, त्याची ही दिशाभुल झाली. प्रेम नाही, दुसरं कुणी आवडलं किंवा समोरच्या व्यक्तीच्या तो प्रेमात वैगेरे पडला अश्यातला काही भाग नाही. ते म्हणतात ना इंग्रजी मधे इफॅच्युएशन तसला काही प्रकार असावा. कारण आमची भांडणं, वेळ दिला गेला नाही म्हणून आमचं नातं तसं काही फुललं नाही. आपणं माणसंच चुका करणार, आणि प्रत्येक जण कुठे ना कुठे चुकतो पण आपण माफ करायचं, की सोडून जायचं अश्या व्यक्तीला हे आपल्याच हातात असतं. कारण मला सतत असं वाटतं की, प्रेम ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना अनुभवता येते. जी खूप साधी आहे, सरळ आहे, आणि नाजुक सुद्धा म्हणजे जपावं तेवढं बहरणारी. प्रत्येक नात्यात प्रेम हे असतचं आणि त्यात मग काही नाती ओढ लावतात, अन् प्रत्येक नातं हे प्रेमाचं असावं अशीही काही गरज नाही. प्रेम हे करण्यासाठी असतं मग तिथे आकर्षण,आपुलकी, भावना, आनंद, सुख, दया, करुणा, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, काळजी, समजून घेणे, परिपक्वता, स्वत: ची प्रतिष्ठा, स्वाभिमान, स्वत: ची अखंडता, नीतितत्वे किंवा तत्त्वे ह्या सगळ्या भारी भक्कम शब्दांचा जन्मचं का होऊ द्यायचा ना? एक साधा शब्द "प्रेम", अन् त्याचा जन्म सुद्धा दुसऱ्यांवर करण्यासाठी झालायं तरी सुध्दा आयुष्य किचकट वाटतं लोकांना. प्रेम हे करण्यासाठी असतं, मग करावं... नाही का? प्रेम म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात खोल सहभाग. मी सुध्धा तेच केलं, मी प्रेम केलंय त्याच्यावर, आणि आहे माझं खुप प्रेम त्याच्यावर. मग का अन् कोणासाठी सोडायचं त्याला..? चुक झाली आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला सोडून देणं हे मला नाही पटत. कारण एकदा अनुभवलय खूप जवळुन, वेळ दिला नाही नात्यांमध्ये तर पश्चातपाची वेळ येते. म्हणूनच वेळ द्यायचं ठरवलं आणि चुका सुधारुन पुढे जाणारं असेल तर नक्कीच संधीचा हकदार आहे तो, नाही का? शेवटी माणूस हा संधीचा भुकेला आणि प्रेमाचा सुध्धा. ह्या सगळ्यांमध्ये त्याच दुर्लक्ष झालं होतं हे खरंय पण त्याचं प्रेम तर कमी नव्हतं ना, आधार ही होताच, सोबत तर होताच, दरवेळी बोलायचा मल तू हवी आहे २४ तास माझ्यासोबत आणि मी ही त्याच्या डोळ्यात प्रेम बघितलंय माझ्यासाठी मग मी का नको एक संधी द्यायला, मग दिली एक संधी. कारण थोडाफार त्यानं सुध्दा सिध्द केलंय की सगळेच पुरुष सारखे नसतात आणि हे मला सुध्धा पटलंय. हळुहळु माझ्या मनातला तिरस्कार कमी होतोय आणि आमचं प्रेम अजूनच खुलतय. अश्या पदधतीने जवळपास सुरळीत सुखी संसार थाटयला सुरुवात झाली आमची.
तात्पर्य: एवढंच की, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असे बरेचसे छोटे मोठे क्षण असणारच, थोडंसं धाडस आणि प्रेम याची गरज आहे फक्त प्रत्येक मुलीला. थोड कठीण असतं बोझ घेऊन जगणं पण मन मोकळं करून जगणं सोपं होतं कारण आयुष्य खुप सुंदर आहे हे फक्त ज्याचं त्यानं जगायला हवं.