अस्वस्थ
अस्वस्थ
आजही सकाळी बातम्या पाहताना तो विचार आला...
आणि आता थोड्या वेळापूर्वी अजून एक बातमी कानावर पडली.. आणि काळीज सुन्न झालं...
सकाळी विचार करत होतो, की आजकाल टि.व्ही.वरील बातम्यासुद्धा घरच्यांसोबत पाहु वाटत नाहियेत याच कारण म्हणजे रोज कुठे ना कुठे तरी स्त्री वर बलात्काराच्या क्रुर घटना घडतायत....त्या घटनेची बातमी पाहताना सुद्धा अंगावर शहारे आणि काळजाचा ठोका चुकतो पण यासारखे नीच कृत्य करणारे नराधमांना काहीच कस वाटत नाही...?
कारण अशा घटनासंबंधी कठोर कायदाच नाही म्हणून हे असे नीच कृत्य करायला या नराधमांचे पाय पुढे सरसावत असतील...
पण दुर्दैव तर या गोष्टीच वाटतं, भारत देशाला सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखतात. शिवाय हे तरुण शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तिमत्वाला देव मानून(खर म्हणजे अशा महापुरुषांना देव ठरवणे ही सुद्धा लज्जास्पद गोष्ट आहे) स्वतःला भक्त म्ह
णवून घेतात. पण आज समाजात राजांच्या विचाराने जगून अशा अन्यायकारक गोष्टींविरूद्ध आवाज उठवला पाहिजे. पण दुर्दैवाने इथल्या पिढिने शिवाजी महाराजांना डोक्यात न घेता डोक्यावर घेतले आहे.
इथे प्रत्येक क्षणाला राजे तुम्ही जन्माला या, जिजाउ माता जन्माला या अशा घोषणा देतात परंतु स्त्री वर अत्याचार होत असताना मात्र त्याबद्दल ब्र सुद्धा काढला जात नाही हेच दुर्दैव आहे म्हणून त्यांच्या डोकीतील विचार अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कमी पडताहेत का...?
या पिढीच सुदैव म्हणजे यांच्या हाती सोशल मिडियासारखे प्रभावी माध्यम असताना यावर नको त्या गोष्टी शेअर होतात. पण अशा गोष्टींचा पाठपुरावा करून त्या जर शेअर केल्या तर तरुणांच्या मनात जागृती निर्माण होइल यातूनच आपल्यासारख्या तरुणांच्या हातून कायदा बदल घडवून आणून अशा नराधमांच्या शिक्षेसाठी ठोस पाउले उचलू शकतो हे इथल्या तरुण पिढीला कधी कळणार है...?