akshata alias shubhada Tirodkar

Comedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy

अकबर चे गिफ्ट

अकबर चे गिफ्ट

2 mins
338


"महाराज काय झाले आज चक्क तुम्ही मोबाईल वर नाही आहात "

"बरं झालं बिरबल तू आलास तुझीच वाट पाहत होतो "

"बोला महाराजा"

" बिरबल पुढच्या महिन्यात राणी साहेबाचा वाढदिवस आहे "

"हो महाराजा त्याची सगळी व्यवस्था होईल चिंता नसावी डेकोरेटर पासून कॅटरिंग पर्यंत तुम्ही निश्चित राहा "

"त्याची काळजी नाही मला "

"मग कसली काळजी "

"अरे राणीसाहेबाना गिफ्ट काय द्याचे हे समजत नाही "

"अहो महाराज द्या एक महागडा नेकलेस "

"नको बिरबल तिचे कपाट दागिन्यांनी भरलेले आहे "

"मग एक महागडा फोन "

"अरे ह्याच अंनिव्हर्सरीला तिला आय फोन दिला" 

"बरं मग मर्सडीच देऊन टाका" 

"काय मर्सडीच"

'"नॉट बॅड आयडिया खुश होईल ती "

"बिरबल आजच बुक करून टाक "

असेच दिवस गेले. वाढदिवसाचा दिवस उजाडला संध्यकाळी ७ वाजता राजमहल सजला होता. मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते. राणी ने छानसा लेहंगा परिधान केला होता राणी आल्यावर सगळयांनी टाळ्यांच्या कडकडाट सह स्वागत गेले. ठरलेल्या प्रमाणे मनोरंजन कार्यक्रम सुरु झाले. 

भला मोठा केक आणला. राणी ने केक कापला. अकबर राजा खुश होता कि त्याचे गिफ्ट सगळ्यात भारी असणार म्हणून तेवढ्यात बिरबल मर्सडीच सह तिथे पोहचला. 

अकबरने फिल्मी स्टाईल मध्ये राणीला गिफ्ट देण्याचे ठरवले होते 

"राणी साहेब तुमच्या समोर तर चंद्र पण फिका आहे, माझ्या आयुष्यात तर तुम्हीच माझे सर्वसव आहात माझ्या कडून हि तुम्हला छोटीशी गिफ्ट "

"मर्सडीच पाहून त्या लाजल्या "

"थँक क्यू अकु सो स्वीट ऑफ यु "

"चला आता किटी पार्टी मध्ये माझाच तोरा असेल अश्या मनातल्या मनात म्हणाल्या "

"वाह महाराज आज तर राणी साहेबाना तुम्ही सात अस्मान उपर बसवलं "

"करावं लागत बाबा मी राजा तुमच्यासाठी, तिचा तर मी गुलाम आहे ना "


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy