STORYMIRROR

Mrs. Ranjan Deshpande

Romance

3  

Mrs. Ranjan Deshpande

Romance

सवय!

सवय!

1 min
130

सवय...नको एवढं करूस माझ्यासाठी,

तुझ्याविना जगणं असह्य होईल...

पापण्या मिटतील अपोआप,

अश्रू लपवताना जड जाईल!

केव्हा कुठे कसे भेटलो आपण...

एकमेकांचे कसे झालो कळलेच नाही!

आई बाबा होता होता आता,

आजी आजोबा झालो समजलेच नाही!

तुझा सारा वेळ घरासाठी जात होता,

माझा मात्र पैशांच्या मागे धावण्यात जात होता...

घरचं दारचं पै पाहुण्यांचं कसं गं तू निगुतीने निभावलं...

मी मात्र तुझ्या बाजूला नुसतं उभं राहायचंही नाही साधलं!

सगळ्यांचे स्वभाव आवडीनिवडी तू जोपासल्यास...

तुझ्या स्वतःचे छंद, हौशी कधीच नाही आठवल्यास!

संपले दिवस संसारासाठी तू जीव ओतून करायचे...

आता पुढचे दिवस आपण आपल्यासाठीच जगायचे...

आता तू तिथं मी असेच आपण असायचे,

चांदण्यांचे प्रेमगीत एकमेका समवेत आपणही उपभोगायचे!

तुझ्या असण्याची कितीतरी वलये, सतत आसपास राहू दे...

माझ्या प्रेमाचा पुरुषी गंध,

तुझ्या अंगावर मोहरू दे!

अशीच साथ शेवटच्या क्षणापर्यंत अखंड राहील...

आपल्या प्रेमाचा हा गोडवाही असाच वाढत राहील!

तुला माझी झालेली अशी सवय, दोघांनाही जड जाईल...

निरोप द्यायची वेळ आली की

अश्रू लपवताना जड जाईल!

अश्रू थांबवताना जड जाईल!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Mrs. Ranjan Deshpande

सवय!

सवय!

1 min वाचा

Similar marathi poem from Romance