STORYMIRROR

avi zarekar

Classics

3  

avi zarekar

Classics

श्रावण

श्रावण

1 min
174

हिरव्या पाचूच्या रानात

हिरवं सपान पडलं

धुंद श्रावणसरींनी

अंग अंग मोहरलं!


गर्द वेळूच्या बनात

सोनसळीचा प्रकाश

मैना राघूला शोधते

तिचा जीव कासावीस!


शुभ्र बगळ्यांचे थवे

झेपावता खगाकडे

चिंब झिम्माड पाऊस

स्मृती लुब्ध आठवण!


असा श्रावणसरींचा

हिरवाकंच दृगोचर

मुग्ध विलासिनी सवे

आभा होय अलवार!


वाग्वसंताची गंधवेणी

मन सानंद साधन

लेकी माहेराची ओढ

लतापल्लवांची विण!


Rate this content
Log in

More marathi poem from avi zarekar

Similar marathi poem from Classics