STORYMIRROR

Laxman Shivanekar

Romance

4  

Laxman Shivanekar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
364

काय असते कुठे असते 

प्रेम नावाची चीजवस्तू कुठे असते? 

प्रेम जड नसतं तसं ते हलकंही नसतं

ओझं मात्र त्याचं अफाट असतं

खरं तर प्रेमाला किंमत 

तशी काहीच नसते

फेडता न येणारं ते एक ऋण असतं

अमृत मध गंध लाल रंग

हे सगळं सगळं प्रेमात असतं

शोधूनही सापडत नाही 

बघूनही दिसत नाही 

असं ते निर्गुण निराकार 

ईश्वरी साक्षात्कार 

एक उत्कट अनुभव देऊन जातं

तिळामध्ये तेल असतं

अंड्यामध्ये मूल असतं

बी मध्ये नाजूकशी वृक्षवेल असते

तृणपात्यात एक पान असतं

प्रत्येक पानात नाजूक पान असतं

तसंच प्रेमवेड्या एका मनात

दुसरं मन रुतलेलं असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Laxman Shivanekar

Similar marathi poem from Romance