STORYMIRROR

Smita Deshmukh

Romance

3  

Smita Deshmukh

Romance

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
42

मज वाटते ओढ पावसाची

सुंदर या नील नभमंडपी

घननीळ मेघ हे गर्जत येती

अमृतधरा या अवनीवर 

बरसण्या किती मग आतुर असती

   

जसे दोन प्रेमिंचे मिलन

होण्यास आतुर असते ते मन

पावसाचा प्रत्येक थेंब

करतो धरतीचे शांत तनमन!!


जसे वाटते क्षितिजावरती

सुंदर रम्य उभा सुदर्शन

घेऊन इंद्रधनूचे ते रंग

आशीर्वादास उभा मधुसूदन!!


का नसावी मग ओढ पावसाची

बेधुंद होऊन भिजण्याची

देण्यास आनंद सर्वतोपरी

तत्पर आहे धरतीवर मधुबन!!


मनात येते तीच आठवण

याच मधुबनी आपुले मिलन

शाश्वत सुखाची ती उधळण

त्याच पावसात पुन्हा एकदा

पुन्हा एकदा...

यावा तो क्षण

वाटे म्हणूनच मज

ओढ त्या पावसाची.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Smita Deshmukh

Similar marathi poem from Romance