STORYMIRROR

Sunisha Kulkarni

Inspirational

4  

Sunisha Kulkarni

Inspirational

मुग्धकळी

मुग्धकळी

1 min
255

मुग्ध मी कळी, सुगंध माझा, आत असे लपलेला.

तोडू नका हो,नका तोडू जगी उमलायचे मला

        खूप खूप फुलायचे हो मला----!


आकाशीची शांत चांदणी मी अधिर घरी येण्याला,

बोल बोबड्या बाललीलांनी, उधाण आनंदाला,

बनून विचारी उंचवित जगी,कुल, शील,ज्ञानाला

अभिमानाने शिर उंचावत, जवळी घ्या हो मला.

     नका नका दूर करु हो मला--- !!

 

पुजिता लक्ष्मी,सरस्वती, नवदुर्गा मातांना ,

अंशरूपाने माझ्या ठायी वसती त्यांच्या लीला,

होईन दुहिता सासर- माहेर भाग्याचे हो मला, 

जगवून मजला कन्यादाने येईल पुण्य फळाला.

     नका नका दूर करु हो मला---!!!


आई-बाबा, कन्या मी तुमची ओढ कां न तुम्हाला? 

जन्मभराची उतराई मी ,अभिमान पित्याचा मला, 

गुणी बाळ मी खरे सांगते,अपराध न मी केला,

तुम्ही जर जगता उगाच का हो टाकून देता मला?

      नका नका दूर करु हो मला------!!!!


जन्मे माझ्या मूर्तरुप ये मानव जातीला, 

जन्म मुलाला देण्यास हवी माता आधी तुम्हाला,

आजची कन्या, पत्नी उद्याची, माता परवाला,

 फुलण्या फळण्या वंशवृक्ष जगी,महत्व कन्येला,

नका नका दूर करू हो मला ---------!!!!! 


Rate this content
Log in

More marathi poem from Sunisha Kulkarni

Similar marathi poem from Inspirational